शहरं
Join us  
Trending Stories
1
अफगाणिस्तान-पाकिस्तान सीमेवर गोळीबार, युद्धजन्य परिस्थिती; शरीफ सरकारवर नवं संकट
2
फॉर्च्युनर, मोबाईल घेऊन हगवणेंच्या मनाला शांती नाही; अधिक महिन्यात सोने, चांदीची ताट मागितली - अनिल कस्पटे
3
सुपेकरांच्या अडचणीत वाढ; नाशिक, संभाजीनगर, नागपूरचा कारागृह उपमहानिरीक्षक पदाचा कार्यभार काढला
4
पहलगाम हल्ल्याचा मास्टरमाइंड पाकिस्तानात दिसला; भारतविरोधी रॅलीत हाफिज सईदच्या मुलाचीही उपस्थिती
5
तपासणीदरम्यान कारमध्ये सापडलं घबाड, रोकड मोजण्यासाठी मागवावी लागली मशीन, आता इन्कम टॅक्स विभागाकडून तपास सुरू   
6
"ही बघा पावती! मी हेक्टर देत होतो, पण त्यांनी फॉर्च्युनरच मागितली"; वैष्णवीच्या वडिलांनी सगळंच सांगितलं
7
"दहशतवादी इकडे तिकडे फिरताहेत आणि आपले खासदारही...", जयराम रमेश यांच्या विधानावरून वाद
8
क्रेडिट कार्डचे नियम, एलपीजी सिलेंडरच्या...; १ जूनपासून हे ५ मोठे बदल होणार; तुमच्या खिशावर परिणाम होणार
9
Astro Tips: शुक्रवारी 'या' कुबेर मंत्राचा जप करा, दु:ख, दरीद्र्याला घरातून कायमचे घालवा!
10
पतीच्या मृत्यूनंतर दीरासोबत लावलं जातं लग्न; काय आहे 'करेवा विवाह'?, दिल्ली हायकोर्टासमोर पेच
11
शशांक, लता, करिश्माला १४ दिवसांची न्यायालयीन कोठडी; सासू, नणंदेचा लगेचच जामिनासाठी अर्ज
12
धक्कादायक! गर्लफ्रेंडचा नकार ऐकून बॉयफ्रेंडने कहरच केला, घरावर ग्रेनेड फेकला अन्... 
13
कुख्यात नक्षलवादी कुंजम हिडमाला पकडण्यात यश; AK-47 सह मोठा शस्त्रसाठा जप्त
14
 ५२ लाख रुपये मिळवण्याची हाव, पतीने मित्रांसोबत मिळून आखला भयानक कट, त्यानंतर...
15
"ऑपरेशन सिंदूर'च्या नावाखाली राजकीय होळी...", मुख्यमंत्री ममता बॅनर्जींचे पंतप्रधान मोदींना प्रत्युत्तर
16
वाहन उद्योग केव्हाही बंद पडू शकतो...! चीनने रेअर अर्थ मेटल रोखले, प्रकरण मोदींपर्यंत पोहोचले
17
ड्रॅगनची नवी खेळी, शाहबाज शरीफ अन् असीम मुनीरची झोप उडाली; चीनची पाकिस्तानात थेट एन्ट्री?
18
"युती सरकारच्या भ्रष्टाचारामुळेच मुंबई तुंबली; जबाबदार अधिकाऱ्यांवर कारवाई कधी?’’ काँग्रेसचा सवाल   
19
PM Narendra Modi : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना मिळणाऱ्या भेटवस्तूंचे पुढे काय होते?
20
Maharashtra Politics : "ज्यांना अर्थसंकल्प कळत नाही, त्यांनी..."; लाडकी बहीण योजनेच्या निधीवरुन फडणवसांनी स्पष्टच सांगितलं

लोकसभेला प्रस्ताव नाकारलेला; कमल हसन राज्यसभेवर जाणार? डीएमकेने एक जागा सोडली

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 28, 2025 12:09 IST

Rajya Sabha Election: द्रमुकने चारपैकी तीन जागा आपल्या पक्षातील उमेदवारांना ठेवल्या असून लोकसभेला साथ दिल्याने राजकीय क्षेत्रात उतरलेला कमल हसनच्या मक्कल निधी मय्यमला एक जागा सोडली आहे.

राज्यसभेच्या निवडणुकीसाठी उमेदवारांच्या घोषणांना सुरुवात झाली आहे. १९ जूनला ही निवडणूक होत असून तामिळनाडूमधून एक मोठे नाव समोर येत आहे. सत्ताधारी पक्ष डीएमकेने सहापैकी चार जागांवर निवडणूक लढविण्याची घोषणा केली आहे. यात प्रसिद्ध अभिनेता कमल हसन यांना उमेदवारी जाहीर करण्यात येण्याची शक्यता आहे. 

द्रमुकने चारपैकी तीन जागा आपल्या पक्षातील उमेदवारांना ठेवल्या असून लोकसभेला साथ दिल्याने राजकीय क्षेत्रात उतरलेला कमल हसनच्या मक्कल निधी मय्यमला एक जागा सोडली आहे. आता हा पक्ष कमल हसन यांना उमेदवारी देतो की अन्य कोणा नेत्याला याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. 

डीएमकेने पी. विल्सन यांना पुन्हा उमेदवारी दिली आहे. याचबरोबर एसआर शिवलिंगम, लेखक रुकय्या मलिक उर्फ ​​कविगनर सलमा यांनाही तिकीट दिले आहे. 

लोकसभा नाकारलेली...लोकसभा निवडणूक २०२४ मध्ये कमल हसन यांच्या मक्कल निधी मय्यम पक्षाने तामिळनाडूमध्ये द्रमुकला साथ देत आघाडीत प्रवेश केला होता. यावेळी हसन यांना लोकसभा किंवा राज्यसभेचा प्रस्ताव डीएमकेने ठेवला होता. परंतू, हसन यांनी लोकसभा निवडणुक लढविण्यास नकार दिला होता. यामुळे हसन आता राज्यसभा लढविणार की नाही याकडे सर्व सिनेजगतासह राजकारण्यांचे लक्ष लागले आहे. 

पक्षीय बलाबल काय...

विधानसभेत द्रमुककडे १३४ आमदार आहेत. यामुळे राज्यसभेच्या सहा जागांपैकी चार जागा जिंकू शकतात. उर्वरित दोन जागा अण्णाद्रमुककडे जाण्याची शक्यता आहे. या पक्षाने भाजपाशी युती केली आहे. आसाममधील दोन आणि तामिळनाडूमधील सहा राज्यसभा सदस्यांचा कार्यकाळ जून आणि जुलैमध्ये संपत असल्याने या निवडणुका होत आहेत. निवडणूक आयोगाने सोमवारी द्वैवार्षिक निवडणुकांची घोषणा केली. यासाठीची अधिसूचना २ जून रोजी जारी केली जाणार आहे. 

टॅग्स :Kamal Hassanकमल हासनRajya Sabhaराज्यसभाTamilnaduतामिळनाडू