देशात बरे झालेल्या कोरोना रुग्णांचे प्रमाण 96 टक्क्यांवर

By ऑनलाइन लोकमत | Published: January 3, 2021 05:45 AM2021-01-03T05:45:55+5:302021-01-03T05:46:05+5:30

Corona Virus: शनिवारी २० हजारांहून कमी रुग्ण;  अडीच लाखांवरच उपचार सुरू

proportion of corona patients cured in the country is 96 per cent | देशात बरे झालेल्या कोरोना रुग्णांचे प्रमाण 96 टक्क्यांवर

देशात बरे झालेल्या कोरोना रुग्णांचे प्रमाण 96 टक्क्यांवर

googlenewsNext

लोकमत न्यूज नेटवर्क 
नवी दिल्ली : देशात कोरोनाच्या नव्या रुग्णांच्या संख्येत सातत्याने घट होत आहे. शनिवारी २० हजारांपेक्षा कमी नवे कोरोना रुग्ण आढळून आले. या संसर्गातून ९९ लाखांपेक्षा अधिक जण बरे झाले असून, त्यांचे प्रमाण ९६.१२ टक्के आहे. सध्या अडीच लाख रुग्णांवरच उपचार सुरू
आहेत.


केंद्रीय आरोग्य खात्याने दिलेल्या माहितीनुसार, देशात १,०३,०५,७८८ कोरोना रुग्ण असून, त्यापैकी ९९,०६,३८७ जण बरे झाले. शनिवारी १९,०७९ नवे रुग्ण सापडले व २२४ जण मरण पावले. त्यामुळे बळींची एकूण संख्या १,४९,२१८ झाली. देशात २,५०,१८३ सक्रिय रुग्ण असून, त्यांचे प्रमाण २.४३ टक्के आहे.


जगभरात ८ कोटी ४३ लाख कोरोना रुग्ण आहेत. त्यातील ५ कोटी ९६ लाख लोक बरे झाले. भारतामधील कोरोना बळी व सक्रिय रुग्णांची संख्या अमेरिकेपेक्षा कमी आहे. अमेरिकेत २ कोटी ६ लाख कोरोना रुग्ण असून, त्यापैकी १ कोटी २१ लाख जण बरे झाले आहेत. त्या देशात ८० लाख सक्रिय रुग्ण आहेत व ३ लाख ५६ हजार जणांचा कोरोनामुळे बळी गेला.

जर्मनीत नवा विषाणू आढळला नोव्हेंबरमध्ये
ब्रिटनमधील नवा कोरोना विषाणू जर्मनीमध्ये नोव्हेंबर महिन्यात आढळला होता. जर्मनीमध्ये १७ लाख कोरोना रुग्ण असून, त्यातील १३ लाख लोक बरे झाले. 

Web Title: proportion of corona patients cured in the country is 96 per cent

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.