हा घ्या विरूष्काच्या लग्नाचा पुरावा!

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 11, 2017 13:12 IST2017-12-08T13:02:55+5:302017-12-11T13:12:39+5:30

गेल्या काही दिवसांपासून टीम इंडियाचा कॅप्टन विराट कोहली आणि अभिनेत्री अनुष्का शर्मा यांच्या लग्नाच्या चर्चेचा बोलबाला आहे.

This is the proof of marriage of virat-anushka | हा घ्या विरूष्काच्या लग्नाचा पुरावा!

हा घ्या विरूष्काच्या लग्नाचा पुरावा!

ठळक मुद्देगेल्या काही दिवसांपासून टीम इंडियाचा कॅप्टन विराट कोहली आणि अभिनेत्री अनुष्का शर्मा यांच्या लग्नाच्या चर्चेचा बोलबाला आहे.विराट-अनुष्काच्या फॅन्सबरोबरच मीडियामध्येही लग्नाचा विषय सध्या जोरदार चर्चेत आहे.

मुंबई- गेल्या काही दिवसांपासून टीम इंडियाचा कॅप्टन विराट कोहली आणि अभिनेत्री अनुष्का शर्मा यांच्या लग्नाच्या चर्चेचा बोलबाला आहे. विराट-अनुष्काच्या फॅन्सबरोबरच मीडियामध्येही लग्नाचा विषय सध्या जोरदार चर्चेत आहे. गुरूवारी रात्री उशिरा अभिनेत्री अनुष्का शर्मा तिच्या कुटुंबीयांबरोबर मुंबई एअरपोर्टवर दिसली. शर्मा कुटुंबीय इटलीला जात असल्याची माहिती सुत्रांकडून मिळाली होती. इटलीला विरूष्का डेस्टिनेशन वेडिंग करणार असल्याची चर्चा आहे. या दोघांनी लग्नाची बातमी मीडियापासून दूर ठेवली असली तर काही माहिती हळूहळू समोर येते आहे. विरूष्काच्या लग्नाचं निमंत्रण अनुष्काच्या काही शेजाऱ्यांना मिळाल्याचं समजतं आहे. वर्सोवामधील बद्रीनाथ टॉवरमध्ये अनुष्का शर्मा राहते. त्या इमारतीमधील काही जवळच्या लोकांना आमंत्रण दिल्याचं वृत्त 'मीड डे'ने दिलं आहे. अनुष्का शर्माचे वडील अजय कुमार शर्मा यांनी स्वतः काही शेजाऱ्यांना फोन करून लग्नाचं निमंत्रण दिलं आहे. 

सुत्रांच्या माहितीनुसार, अनुष्काच्या वडिलांनी इमारतीत राहणाऱ्या काही जवळच्या लोकांना फोन करून पुढील आठवड्यात होणाऱ्या लग्नाचं निमंत्रण दिलं. लग्न इटलीला असल्याने प्रत्येक जण इटलीला येऊ शकत नाही, म्हणून नवं दाम्पत्याला आशिर्वाद देण्याची विनंती अनुष्काच्या वडिलांनी केली आहे. विरूष्काच्या लग्नाबद्दलची मीडियामध्ये असलेली चर्चा लक्षात घेता ज्या शेजाऱ्यांना लग्नाचं निमंत्रण देण्यात आलं त्यांना ही गोष्ट गुप्त ठेवण्याच सांगितलं आहे. 
विराट कोहलीने श्रीलंकेविरुद्धच्या आगामी वन-डे आंतरराष्ट्रीय सामन्यांच्या मालिकेसाठी खासगी कारण देऊन विश्रांती घेण्याचा निर्णय घेतला. विराट कोहलीच्या या निर्णयानंतर विराट-अनुष्काच्या लग्नाच्या चर्चा सुरू झाल्या. त्यातच काही दिवसांपूर्वी प्रसिद्ध फॅशन डिझायनर सब्यासाची मुखर्जी अनुष्काच्या घरी गेले होते. त्यानंतर सब्यासाची अनुष्काच्या लग्नाचा ड्रेस डिझाईन करणार असल्याची चर्चा सुरू झाली. विराटचे क्रिकेट गुरू राजकुमार शर्मा यांनी सुट्टीसाठी अर्ज केल्याची माहिती समोर आल्याने सगळ्यांच्याच भुवया उंचावल्या आहेत.

इटलीमध्ये 13 ते 15 डिसेंबर असे तीन दिवस विराट-अनुष्काचा लग्नसोहळा असेल. 13 डिसेंबरला संगीत, 14 डिसेंबरला हळद आणि 15 डिसेंबरला लग्नाचा मुख्य सोहळा असेल, अशी माहिती सूत्रांनी दिली आहे. 

Web Title: This is the proof of marriage of virat-anushka

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.