शहरं
Join us  
Trending Stories
1
Breaking: मोठी बातमी! शिक्षक, पदवीधर विधान परिषद निवडणूक पुढे ढकलली
2
सध्याचे चित्र बघून मोदींचा चेहरा काळा पडलाय, शाह यांची दाढी जळाली; शिंदेंवरही राऊतांचा मोठा गौप्यस्फोट
3
भीषण! इंडोनेशियामध्ये नवी आपत्ती... Cold Lava चा कहर; 52 जणांचा मृत्यू, 249 घरं उद्ध्वस्त
4
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे प्रस्तावक होणारे ते चार लोक कोण? राम मंदिरासोबत आहे कनेक्शन!
5
सत्तेच्या हॅटट्रिकसाठी भाजपाची नजर सायलेंट वोटरवर; २०२४ निवडणुकीत करणार करिष्मा?
6
Monsoon Update : आनंदाची बातमी! वेळेआधीच दाखल होणार मान्सून; महाराष्टात कधी बरसणार?
7
'भिडू' शब्दावर जग्गूदादाचा कॉपीराईट ? अभिनेता जॅकी श्रॉफ यांची दिल्ली हायकोर्टात धाव!
8
पंतप्रधान मोदींनी वाराणसीतून तिसऱ्यांदा दाखल केला उमेदवारी अर्ज, शाह-राजनाथ यांच्यासह हे दिग्गज होते उपस्थित
9
रानू मंडलसोबत गौरव मोरेची तुलना; रंगरुपावरुन ट्रोल झाल्यानंतर म्हणाला, 'चकर मारा फिल्टरपाड्याला मग..'
10
Haldiram's वर ब्लॅकस्टोनसह 'या' दिग्गज कंपन्यांची नजर, हजारो कोटींची होणार डील
11
IPL 2024 : रिंकू सिंगचा अतिउत्साही चाहता; चेंडू अशा ठिकाणी लपवला की पोलिसही गोंधळले
12
कोरेगाव भीमा प्रकरणः गौतम नवलखा यांना जामीन, प्रक्षोभक भाषणाच्या आरोपावरून होते नजरकैदेत
13
"दिल्लीच्या 'त्या' बैठकीत मोदींनी ठाकरेंना पुन्हा एकत्र येण्याची ऑफर दिली होती"
14
...म्हणून शरद पवार आपला पक्ष काँग्रेसमध्ये विलीन करतील, मोदींनी पुन्हा एकदा डिवचले
15
T20 World Cup 2024 साठी बांगलादेशचा तगडा संघ; २२ वर्षीय खेळाडूला संधी!
16
सोनं -चांदी खरेदी करणाऱ्यांसाठी खुशखबर! दुसऱ्या दिवशीही दर कोसळले; वाचा आजचे दर
17
Fact Check: PM मोदींच्या विजयावर शंका घेणारा नितीश कुमारांचा व्हायरल व्हिडिओ जुना; पाहा, सत्य
18
4 जूनला किती वेळ राहिलाय, थोडा धीर...; पृथ्वीराज चव्हाणांच्या अंदाजावर भुजबळांचा सल्ला
19
'तू आई होऊ शकत नाहीस'; डॉक्टरांनी रुपाली गांगुलीला दिला होता IVF चा सल्ला, पण..
20
Fact Check : हैदराबादमध्ये मोदींनी AIMIM ला पाठिंबा दिल्याच्या Video दिशाभूल करणारा; जाणून घ्या 'सत्य'

देशात ७८ लाख टन साखरेचे उत्पादन

By ऑनलाइन लोकमत | Published: January 02, 2020 11:15 PM

गेल्या वर्षीच्या तुलनेत ३४ लाखांनी उत्पादनात घट

ठळक मुद्देराज्यात साडेसोळा लाख टन साखर उत्पादितराज्याचा सरासरी साखर उतारा देखील साडेदहा टक्के महाराष्ट्रात यंदा एक महिना उशीरा गाळप हंगाम सुरु

पुणे : डिसेंबर महिना अखेरीस देशभरात ७७.९५ लाख टन साखरेचे उत्पादन झाले असून, गेल्या वर्षीच्या तुलनेत त्यात तब्बल ३३.७७ लाख टनांनी घट झाली आहे. त्यात उत्तरप्रदेशचा वाटा ३३.१६ आणि महाराष्ट्राचा १६.५० लाख टन असल्याची माहिती इंडियन शुगर मिल्स असोसिएशनने (इस्मा) दिली.  देशात ४३७ साखर कारखाने गाळप हंगामात सहभागी झाले आहेत. गेल्यावर्षी याच काळात ५०७ साखर कारखाने सुरु होते. तर, डिसेंबर २०१८ अखेरीस १११.७२ लाख टन साखर उत्पादित झाली होती. महाराष्ट्र, कर्नाटक या राज्यांमधे ऊस पिकाला फटका बसल्याने साखरेचे उत्पादन घटले आहे. गेले सलग दोन हंगाम १०७ लाख टनांहून अधिक साखर उत्पादन घेणाऱ्या महाराष्ट्रात यंदा एक महिना उशीरा गाळप हंगाम सुरु झाला. डिसेंबर अखेरीस महाराष्ट्रात १३७ साखर कारखाने सुरु झाले असून, साडेसोळा लाख टन साखरेचे उत्पादन झाले आहे. गेल्यावर्षी याच काळात १८७ कारखान्यांनी ४४.५७ लाख टन साखर उत्पादित केली होती. तसेच, राज्याचा सरासरी साखर उतारा देखील साडेदहा टक्के होता. यंदा साखर उतारा १० टक्क्यापर्यंत खाली आला आहे. तसेच, अहमदनगर व औरंगाबाद जिल्ह्यातील प्रत्येकी एका कारखान्याचे धुराडे बंद झाले आहे. उत्तरप्रदेशातील ११९ साखर कारखाने सुरु झाले असून, ३३.१६ लाख टन साखर उत्पादित झाली आहे. तर, सरासरी साखर उतारा १०.७१ टक्के आहे. डिसेंबर २०१८ साली येथे ३१.०७ लाख टन साखरेचे उत्पादन झाले होते. तर, साखर उतारा १०.८४ टक्के इतका होता. कर्नाटकातील ६३ कारखान्यांनी १६.३३ लाख टन साखर उत्पादित केली आहे. गेल्यावर्षी याच काळात २१ लाख टन साखरेचे उत्पादन झाले होते. गुजरातमधील १५ कारखान्यांनी २.६५, आंध्रप्रदेशातील १८ कारखान्यांनी ९६ हजार टन व तमिळनाडूतील १६ कारखान्यांनी ९५ हजार टन साखरेचे उत्पादन घेतले आहे. बिहारमधे २.३३, हरयाणा १.३५, पंजाब १.६०, मध्यप्रदेशात १ व उत्तराखंडमधे १.०६ लाख टन साखर उत्पादित झाली आहे. यंदा साखरेच्या उत्पादनात घट होणार असल्याने साखरेचे टिकून आहेत. सध्या उत्तरभारतात ३२५० ते ३३५० आणि दक्षिण भारतात ३१०० ते ३२५० रुपये प्रतिक्विंटल साखरेचे दर आहेत. --साखरेची २५ लाख टनांची निर्यातआॅक्टोबर ते डिसेंबर २०१९ या तिमाहीमधे देशातून २५ लाख टन साखर निर्यातीचे करार झाले असून, साखरेचा पुरवठा वेगात सुरु आहे. काही कारखान्यांनी मिळालेल्या कोट्यानुसार शंभरटक्के साखर निर्यात केली आहे. ज्या कारखान्यांनी अद्याप साखर निर्यात केलेली नाही, त्यांचा कोटा इतर कारखान्यांना द्यावा अशी मागणी करण्यात येत आहे. 

टॅग्स :PuneपुणेSugar factoryसाखर कारखानेFarmerशेतकरी