शहरं
Join us  
Trending Stories
1
...तेव्हा राज ठाकरेंवर प्राणघातक हल्ला करण्याचा प्लॅन रचला होता; मनसे नेत्याचा मोठा दावा
2
Digvijaya Singh : "तुम्हाला निराश करणार नाही, ही माझी शेवटची..."; दिग्विजय सिंह निवडणूक लढवणार नाहीत?
3
भारत दौरा टाळून एलॉन मस्क पोहोचले थेट चीनमध्ये, चिनी पंतप्रधानांच्या भेटीनंतर दिले सूचक संकेत
4
उद्धवसेना, शिंदेसेना मुंबईत आज आमनेसामने! भव्य रॅलीत CM शिंदे vs आदित्य ठाकरे येणार, मोठा फौजफाटा
5
रत्नागिरीच्या सभेत मनसेची उद्धव ठाकरेंवर खोचक टीका; "ज्यांनी आयुष्यभर दुसऱ्याचं..."
6
कल्याण लोकसभा मतदारसंघात एकनाथ शिंदेंकडून काँग्रेसला धक्का, बड्या नेत्यासह माजी नगसेवक शिंदे गटात 
7
Israel-Hamas War : इस्त्रायलचा रफाह शहरावर हवाई हल्ला; १३ जणांचा मृत्यू, अनेक जखमी
8
भाजपा खासदार व्ही. श्रीनिवास प्रसाद यांचं निधन, चार दिवसांपासून ICUमध्ये घेत होते उपचार  
9
Blog : ऋतुराज गायकवाड T20 WC मध्ये का नको? डावा-उजवा असा खेळ बस्स करा...
10
"काय गं तुला खूप माज आलाय का?", जुई गडकरीला तरुणीकडून धमकी; अभिनेत्री म्हणाली, आता थेट पोलीस…
11
"अजून मी प्रचारालाही सुरुवात केली नाही, तोवर...; उज्ज्वल निकमांचा विरोधकांना टोला
12
पिकअप व्हॅन आणि कारचा भीषण अपघात, १० जणांचा मृत्यू, २३ जण जखमी   
13
काँग्रेसच्या झेंड्याला ठाकरेंच्या मताची काठी; तब्बल दहा वर्षानंतर लोकसभेसाठी काँग्रेसला मुंबईत खाते उघडण्याची संधी
14
पैशांच्या अवैध वाहतुकीवर तिसरा डोळा; निवडणूक आयोगाचे मुंबई आणि परिसरातील रेल्वे स्थानकांवर विशेष लक्ष
15
निवडणुकीत जातीपातीच्या जाणिवा टोकदार ; एकाच जातीचे उमेदवार; तिथे पाहतात पोटजात
16
देवेगौडांचा नातू ‘सेक्स स्कँडल’मध्ये; विदेशात पलायन? एसआयटी चौकशी
17
साताऱ्यातील प्रचारात मुंबई बाजार समितीतील भ्रष्टाचाराचा मुद्दा ‘हॉट’ ; उदयनराजे भोसले आणि शशिकांत शिंदे यांच्यात थेट लढत
18
भाजप अन् बीजेडीची ओडिशात मिलीभगत; निवडक लोकांसाठी काम : राहुल गांधी
19
मोटारीला चपलांचा हार आणि आरोप-प्रत्यारोपांचे प्रहार; जरांगे पाटलांनी केला आरोप
20
तरुणाई का संतापली? निराश तरुण मतदानाकडेच पाठ फिरवताना दिसताहेत

लोकसभेच्या निकालांपूर्वी नेत्यांमधील अंतर्गत विरोधाने वाढवल्या काँग्रेसच्या अडचणी

By ऑनलाइन लोकमत | Published: May 22, 2019 11:45 AM

लोकसभा निवडणुकीच्या निकालांपूर्वी विविध वृत्तवाहिन्यांनी प्रसिद्ध केलेल्या एक्झिट पोलमधील अंदाजांमुळे भाजपाच्या नेतृत्वाखालील एनडीएमध्ये उत्साहाचे वातावरण आहे. तर काँग्रेस आणि यूपीएची चिंता वाढवली आहे.

नवी दिल्ली - लोकसभा निवडणुकीच्या निकालांपूर्वी विविध वृत्तवाहिन्यांनी प्रसिद्ध केलेल्या एक्झिट पोलमधील अंदाजांमुळे भाजपाच्या नेतृत्वाखालील एनडीएमध्ये उत्साहाचे वातावरण आहे. तर काँग्रेस आणि यूपीएची चिंता वाढवली आहे. मात्र एक्झिट पोलमध्ये वर्तवलेल्या अंदाजानुसार प्रत्यक्ष निकाल लागल्यास काँग्रेसची चिंता दोन पातळ्यांवर वाढणार आहे. एकीकडे केंद्रात सरकार न बनल्यास पक्षाचा संघर्ष अधिकच वाढणार आहे, तर दुसरीकडे काही राज्यांमध्ये सुरू असलेली पक्षांतर्गत गटबाजी रोखण्याचे आव्हान काँग्रेससमोर असेल. जर ही गटबाजी रोखली गेली नाही तर काही राज्यांत काठावरच्या बहुमतासह स्थापन केलेली सरकारे संकटात येऊ शकतात.  पंजाबमध्ये काँग्रेस बहुमतासह सत्तेवर आहे. मात्र मुख्यमंत्री कॅप्टन अमरिंदर सिंह आणि कॅबिनेटमंत्री नवज्योत सिंह सिद्धू यांच्यात उघड वाद सुरू आहे. सिद्धू हे मला मुख्यमंत्रिपदावरून हटवून स्वत: मुख्यमंत्री होऊ इच्छित आहे, असे अमरिंदर सिंह यांनी जाहीरपणे सांगितले होते. 

अशीच परिस्थिती मध्य प्रदेश आणि राजस्थानमध्येही अशीच परिस्थिती आहे. या दोन्ही राज्यांमध्ये विधानसभा निवडणुकीदरम्यान सर्व नेत्यांनी दाखवलेले ऐक्य लोकसभा निवडणुकीदरम्यान दिसून आले नाही. राजस्थानमध्ये सचिन पायलट आणि मध्य प्रदेशमध्य ज्योतिरादित्य शिंदे यांच्या समर्थकांनी लाय निवडणुकीत तितक्याशा उत्साहाने काम केले नाही. ज्यांना मुख्यमंत्रिपदासाठी योग्य मानले गेले त्यांच्यावरच पक्षाला निवडणूक जिंकून देण्याची जबाबदारी आहे, असा दावा त्यांच्याकडून करण्यात येत होता. ज्योतिरादित्य शिंदे यांचा राज्यातील वावर कमी करण्यासाठी त्यांना पश्चिम उत्तर प्रदेशच्या प्रभारीपदाची जबाबदारी देण्यात आली. तसेच भाजपाचा बालेकिल्ला असलेल्या भोपाळ लोकसभा मतदारसंघात दिग्विजय सिंह यांना उभे करण्याची कल्पानाही कमलनाथ यांनीच दिली, असे सांगितले जात आहे. काँग्रेसने दणदणीत विजय मिळवलेल्या छत्तीसगडमध्येही अशीच परिस्थिती आहे. त्यामुळे 23 मे रोजी प्रत्यक्ष निकाल हाती आल्यानंतर काय परिस्थिती उदभवेल,याची चिंता काँग्रेस नेतृत्वाला आहे.  

टॅग्स :congressकाँग्रेसLok Sabha Election 2019लोकसभा निवडणूक २०१९PoliticsराजकारणMadhya Pradesh Lok Sabha Election 2019मध्य प्रदेश लोकसभा निवडणूक निकाल 2019Rajasthan Lok Sabha Election 2019राजस्थान लोकसभा निवडणूक निकाल 2019Punjab Lok Sabha Election 2019पंजाब लोकसभा निवडणूक निकाल 2019