शहरं
Join us  
Trending Stories
1
पश्चिम बंगालमध्ये निवडणूक निकालापूर्वीच 'हायव्होल्टेज ड्रामा'! स्ट्राँग रूम बाहेर पोहोचल्या CM ममता, EVM सोबत छेडछाडीचा आरोप
2
शिवाजीराव, तुमचे शिक्षण किती, पूर्वायुष्य काय..? मंत्री मुश्रीफ यांचे प्रत्युत्तर
3
'प्रिन्स'च्या विकेटनंतर 'किंग'चा जल्लोष; पण शेवटी RCB ला पराभवाचा धक्का देत GT नं मारली बाजी!
4
रिलायन्सचा मोठा धमाका! अंबानींनी खरेदी केली प्रियांका चोप्राची कंपनी अन् तिलाच बनवलं 'बॉस'; संपूर्ण कंट्रोल कुणाकडे राहणार?
5
जबलपूर हादरले! वादळामुळे बर्गी धरणात क्रूझ उलटली; ४० पैकी ५ जणांचे मृतदेह सापडले
6
Bhuvneshwar Kumar: बुमराहपेक्षा भारी ठरला भुवी! असा पराक्रम करणारा पहिला भारतीय जलदगती गोलंदाज
7
तो, ती आणि खळबळजनक पोस्ट! IPL मधील स्टार क्रिकेटर मैदानाबाहेरील गोष्टीमुळे चर्चेत, काय आहे प्रकरण?
8
धिरेंद्र कृष्ण शास्त्रीचा खरात होऊ शकतो! त्यांनी दिव्यशक्ती सिद्ध करावी, १० व्यक्ती अन् १०...; शाम मानव यांचं आव्हान
9
Exit Poll 2026: टुडेज चाणक्यचा एक्झिटपोल आला...! भाजपचं वादळ, ममतांसोबत 'खेला'; धक्कादायक आहे आकडेवारी
10
GT vs RCB : रजत पाटीदारच्या विकेटवरुन वाद; विराट कोहलीनं पंचांसोबत घातली हुज्जत! नेमकं काय घडलं?
11
म्हाडाने लॉटरीतील १२२१ घरांच्या किंमती ७.५ टक्क्यांनी कमी केल्या
12
जर कच्चे तेल नाही मिळाले तर चीन होर्मुझ ताब्यात घेणार? अमेरिकेच्या हातातून बाजी निसटणार, इराण अन्...
13
आता आरपारची लढाई! मोज्तबा खामेनेईंचा ट्रम्प यांना सज्जड इशारा; म्हणाले "समुद्रात गाडून टाकू..."
14
GT vs RCB : किंग कोहलीनं ५ चेंडूत केली गेलच्या विक्रमाशी बरोबरी; रबाडानं असा घेतला बदला (VIDEO)
15
रील स्टार पाटलाचा कारनामा, १२ वर्षांपूर्वीच्या अपहरण-खून प्रकरणाचा गुन्हे शाखेने केला उलगडा
16
“शिंदेंकडून मलाही ऑफर, पण मी फडणवीसांचा निष्ठावान कार्यकर्ता”; रवी राणांचा मोठा खुलासा
17
बुद्ध पौर्णिमा-पुष्टिपती विनायक जयंती २०२६: ९ राशींची इच्छा पूर्ण अन् धनलाभ; काळजी दूर होईल!
18
"उद्धव ठाकरेंनी स्वतःचा राजकीय बळी न देता.."; विधानपरिषद निवडणुकीवरून भाजपची घणाघाती टीका
19
‘मिसिंग लिंक’ नाव कसे पडले? ‘मुंबई-पुणे एक्स्प्रेस वे’ची विशेष मार्गिका, वैशिष्ट्ये आहेत खास!
20
डाव उलटा पडलाय! प्रतिष्ठा जपायची असेल तर हार्दिक पांड्याला संघाबाहेर काढा; दिग्गजाचा MI ला सल्ला
Daily Top 2Weekly Top 5

ओला कच-याची समस्या वाढली शेतक-यांनी कचरा घेणे कमी केल्याने पालिकेच्या अडचणी वाढल्या

By admin | Updated: June 12, 2015 17:37 IST

पुणे : महापालिकेकडून शहरातील ओला कचरा जिल्ह्यातील शेतक-यांना शेतीसाठी खत म्हणून गेल्या चार महिन्यांपासून दिला जात आहे. मात्र, जिल्ह्यात पूर्वमोसमी पाऊस सुरू झाल्याने तसेच मान्सूनची चाहूल लागल्याने शेतक-यांकडून घेण्यात येणा-या या कच-याचे प्रमाण शंभर ते दिडशें टनांनी घटले असून त्यामुळे या कच-याची विल्हेवाट लावण्याची नवी समस्या महापालिका प्रशासनासमोर उभी राहीली आहे.

पुणे : महापालिकेकडून शहरातील ओला कचरा जिल्ह्यातील शेतक-यांना शेतीसाठी खत म्हणून गेल्या चार महिन्यांपासून दिला जात आहे. मात्र, जिल्ह्यात पूर्वमोसमी पाऊस सुरू झाल्याने तसेच मान्सूनची चाहूल लागल्याने शेतक-यांकडून घेण्यात येणा-या या कच-याचे प्रमाण शंभर ते दिडशें टनांनी घटले असून त्यामुळे या कच-याची विल्हेवाट लावण्याची नवी समस्या महापालिका प्रशासनासमोर उभी राहीली आहे.
जानेवारी 2015 मध्ये उरूळी देवाची येथील कचरा डेपो बंद करण्यासाठी फुरसुंगी आणि उरूळी देवाची येथील ग्रामस्थांनी कचराबंद आंदोलन पुकारले होते. त्यानंतर महापालिकेकडून शहरात निर्माण होणारा केवळ सुका कचराच डेपोवर टाकण्यात येत असून ओला कचरा महापालिकेचे बायोगँस प्रकल्प तसेच दिशा आणि अजिंक्य प्रकल्पात जिरविला जात आहे. तर उर्वरीत कचरा महापालिकेच्या हददीजवळील 75 किलोमीटरच्या परिसरातील गावांमधील शेतक-यांसाठी दिला जात आहे. महापालिकेच्या माहितीनुसार गेल्या चार ते पाच महिन्यात तब्बल 80 हजार टन ओला कचरा शेतक-यांना पुरविण्यात आला आहे. मात्र, पावसाळा केव्हाही सुरू होण्याची शक्यता असल्याने आता शेतक-यांकडून कच-याची मागणी कमी आल्याने दररोज सुमारे 400 ते 450 टन शेतक-यांसाठी जाणारा कचरा 250 ते 300 टनांवर येऊन पोहचला आहे. त्यामुळे या शिल्लक राहणा-या जवळपास 150 ते 200 टन कच-याचे करायचे काय हा प्रश्न महापालिका प्रशासनासमोर पावसाळयाच्या तोंडावर उभा आहे.
पालिकेस नवीन प्रकल्पांचा आधार मिळणार असला तरी, तूर्तास सध्या निर्माण होणारा ओला कचरा पालिकेसाठी डोकेदुखी ठरणार आहे.
==========================
प्रकल्प पूर्ण क्षमतेने चालवा अन्यथा कारवाई
शहरात महापालिकेचे जवळपास 25 बायोगँस प्रकल्प असून त्यांनी क्षमता 100 ते 110 टन ओल्या कच-यावर प्रक्रीया करण्या एवढी आहे. मात्र, या प्रकल्पांना क्षमते एवढा पुरेसा ओला कचरा मिळत नसल्याने हे प्रकल्प अर्धवट क्षमतेवरच सुरू आहेत. त्यामुळे हा नव्याने शिल्लक राहणारा कचरा या प्रकल्पांमध्ये जिरविला जाणार आहे. त्यासाठी आपल्या परिसरात असलेल्या बायोगँस प्रकल्पासाठी पूर्ण क्षमते एवढा ओला कचरा पुरविण्याची जबाबदारी संबधित आरोग्य निरिक्षकांवर सोपविण्यात आली आहे. तसेच प्रकल्पासाठी ओला कचरा न मिळाल्यास संबधित आरोग्य निरिक्षकांवर कारवाई करण्यात येणार असल्याचे परिपत्रक घनकचरा व्यवस्थापन विभागाने काढले आहे.
====================================
नवीन प्रकल्प दोन महिन्यात
दरम्यान, प्रभागातील कचरा प्रभागातच जिरविला जावा यासाठी भवानीपेठ आणि कसबा विश्रामबागवाडा क्षेत्रीय कार्यालयाच्या हददीत 14 प्रकल्प उभारण्यात येत आहेत. त्याचीं एकून क्षमता 60 टनांची आहे. पुढील दोन महिन्यात हे प्रकल्पही सुरू होतील असा दावा महापालिका प्रशासनाकडून करण्यात आलेला आहे. त्यामुळे भविष्यात ओल्या कच-यासाठी