शहरं
Join us  
Trending Stories
1
"आमचे सैन्य पुन्हा युद्धासाठी सज्ज, डोनाल्ड ट्रम्प यांच्या आदेशाची वाट बघतोय", अमेरिकेच्या संरक्षण मंत्र्यांचे विधान
2
"आज चाणक्य असते तर तेही थक्क झाले असते..."; महिला आरक्षण विधेयकावरून प्रियंका गांधी यांचा थेट निशाणा
3
"संसदेत अनेकदा राहुल गांधींची खिल्ली उडवली जाते, पण...!"; प्रियंका गांधींचा भाजपवर घणाघात
4
MI vs PBKS : पॉवर प्लेमध्ये 'सिंग इज किंग' शो! सूर्यावर ओढावली 'गोल्डन डक'ची नामुष्की
5
खळबळजनक खुलासा! पाकिस्तानने भडकवली नोएडामधील हिंसा; तंत्र बघून सुरक्षा यंत्रणा हादरल्या
6
कोणी विचारेना...! किंमत होती ५.५० लाख, मारुतीवर आठ वर्षांतच कार बंद करण्याची वेळ आली...
7
नेपाळने लादला भारतावर कर! १०० रुपयांहून अधिकच्या खरेदीवर आता द्यावा लागणार 'भंसार' कर; बालेन सरकारचा मोठा निर्णय
8
BJP मंत्र्यांच्या मुलाने पाच जणांना उडवले, उलट त्यांच्यावरच ओरडला- मी सायरन वाजवले, बाजूला का सरकला नाहीत?
9
युट्यूबवर ५ लाख व्ह्यूज आले तर बँक खात्यात किती पैसे जमा होणार? जाणून घ्या कमाईचं नेमकं गणित
10
ममता बॅनर्जींचा मोठा विजय! 'ट्रिब्यूनल'कडून क्लीन चिट मिळालेल्यांना बंगालमध्ये मतदानाचा अधिकार; सुप्रीम कोर्टाचा कलम १४२ अंतर्गत विशेष आदेश
11
कोण आहे Mayank Rawat? मुंबई इडियन्सनं एका षटकात ५ षटकार मारणाऱ्या भिडूला दिली पदार्पणाची संधी
12
भयंकरच घडलं! वाद सोडवायला गेला आणि जीव गेला; मध्यस्थी करणाऱ्याची चाकूने वार करत हत्या
13
हरियाणा काँग्रेसमध्ये मोठा भूकंप! राज्यसभा निवडणुकीत 'क्रॉस वोटिंग' करणाऱ्या ५ आमदारांचे निलंबन; हायकमांडचा कडक इशारा
14
आधी मेलेनिया-ट्रम्प यांचं लग्न जमवलं, आता फिक्स करतोय ट्रम्प यांच्यासोबत नेत्यांच्या मीटिंग; कोण आहे हा व्यक्ती?
15
राजकीय फायद्यासाठी महिला आरक्षण विधेयक आणले; प्रियांका गांधींची केंद्र सरकारवर टीका
16
महिलांना लग्नासाठी सोनं, दरमहा २५००, तरुणांसाठीही बरंच काही! बघा, अभिनेता विजय यांच्या जाहीरनाम्यात काय काय खास
17
RSS मध्ये महिला कुठे? अखिलेश यादव यांच्या प्रश्नाला बांसुरी स्वराज यांचं थेट उत्तर, स्पष्टच समजावलं
18
Travel : कमी बजेटमध्ये परदेशाचा फील! भारताचं पहिलं हिल स्टेशन कसं वसलं? एका झोपडीपासून सुरू झालेला रंजक प्रवास
19
Akshaya Tritiya 2026: चैत्रगौरीच्या हळदीकुंकू समारंभाला असते विशेष महत्त्व; तुमचे राहून गेले असेल तर 'हा' आहे पर्याय!
20
पती, पत्नी और वो! सब-इन्स्पेक्टरच्या प्रेमात आकंठ बुडालेल्या पोलिसाने पत्नीचा काढला काटा
Daily Top 2Weekly Top 5

विधानसभेत भाजपा आमदार बघत होते प्रियांका गांधींचा फोटो

By admin | Updated: December 11, 2014 12:57 IST

कर्नाटक विधानसभेत उसाच्या प्रश्नासंबंधी गंभीर चर्चा सुरू असताना भाजपाचे एक आमदार प्रियांका गांधी यांचा फोटो पाहताना पकडले गेले आहेत.

ऑनलाइन लोकमत

बंगळुरू, दि. ११ -  कर्नाटकमध्ये भाजपाला पुन्हा एकदा आपल्या आमदारांमुळे मान खाली घालावी लागली आहे. बुधवारी विधानसभेत उसाच्या प्रश्नासंबंधी  गंभीर चर्चा सुरू असताना भाजपाचे एक आमदार मात्र प्रियांका गांधी यांचा फोटो पाहताना पकडले गेले आहेत. एका स्थानिक वृत्तवाहिनीवर आमदारांच्या या कृत्याचा हा व्हिडीओ प्रसारित झाला आहे.
कर्नाटकमधील औराद भागातील भाजपाचे आमदार प्रभू चव्हाण बुधवारी आपल्या स्मार्टफोन काँग्रेस अध्यक्ष सोनिया गांधी यांची कन्या प्रियांका गांधी-वड्रा यांचे फोटा पाहताना टीव्ही कॅमे-यात कैद झाले आहेत. ज्यावेळी विधानसभेत उसाच्या दराच्या मुद्यावर गंभीर चर्चा सुरू होती तेव्हा चव्हाण यांचे लक्ष चर्चेकडे नव्हे तर त्यांच्या मोबाईलमध्ये होते. तर दुसरे एक आमदार यु. बी. बनकर हे मोबाईलवर कँडी क्रश हा गेम खेळण्यात व्यस्त होते. या व्हिडीओनंतर त्यांच्यावर चहूबाजूंनी टीका होत आहे. या संपूर्ण प्रकाराचा तपास करुन योग्य ती कारवाई केली जाईल, असे भाजपने स्पष्ट केले आहे. मात्र आपण फोटो बघत नव्हतो तर एक मेसेज वाचत होतो, असे स्पष्टीकरण चव्हाण यांनी दिले आहे. एक मेसेज वाचण्यासाटी मी माझा मोबाईल सुरू केला. त्यानंतर मी माझे कुटुंबिय, नरेंद्र मोदी व बाबा रामदेव यांचे फोटो बघत होतो. त्याचवेळी मला प्रियांका गांधी यांचा एक फोटो दिसला. त्याच्याखाली काहीतरी लिहीलेले दिसत होते, मात्र ते वाचता येत नसल्याने मी फोट झूम केला, सारवासरव चव्हाण यांनी केली.
यापूर्वी कर्नाटक विधानसभेत भाजपचे दोन मंत्री मोबाईल फोनवर अश्लिल व्हिडीओ पाहताना सापडले होते.