शहरं
Join us  
Trending Stories
1
बारामतीची लढत थांबणार? पोटनिवडणुकीत काँग्रेसने उमेदवारी मागे घेण्यासाठी ठेवली 'ही' अट!
2
मेल, एक्स्प्रेस तक्रारी ‘कमी’ दाखवण्यासाठी १३९ हेल्पलाईन ऐवजी व्हॉट्सॲपचा वापर
3
Gold Silver Price Today: सोन्या-चांदीच्या किमतीत मोठी घसरण; मोठ्या चढ-उतारादरम्यान पाहा दिल्ली, मुंबई, चेन्नईतील नवे दर
4
"उद्या सुट्टी आहे, माझ्या अंत्ययात्रेला या"; पतीसाठी भावनिक चिठ्ठी लिहून विवाहितेने संपवलं जीवन!
5
सुरक्षित आणि करमुक्त गुंतवणुकीसाठी PPF उत्तम पर्याय; दरमहा ११,००० रुपयांच्या गुंतवणुकीवर मिळवा इतका परतावा
6
जागतिक संकेतांमुळे शेअर बाजारात घसरण; सेन्सेक्स ३८४ अंकांनी तर निफ्टी ११६ अंकांनी कोसळला
7
उन्हाच्या तडाख्यामुळे मुंबईकरांचा जलसाठा १० टक्क्यांनी घटला, आता ३७ टक्केच शिल्लक
8
११५ वर्षे जुना एल्फिन्स्टन पूल अखेर इतिहासजमा; महारेलच्या विलंबामुळे ब्लॉक दीड तासांनी लांबला
9
'तुमच्या तपस्येतच नाही तर फोटोशॉपमध्येही उणीव', हिमंता बिस्वा सरमांच्या पत्नीचा पवन खेडा यांना टोला
10
‘मेट्रो २ बी, मेट्रो ९’ला पुन्हा नवीन तारीख; आता मंगळवारपासून दोन्ही मार्गिका सेवेत
11
वैद्यकीय महाविद्यालयाचा कारभार कसा आहे, फीडबॅक द्या! राष्ट्रीय वैद्यकीय आयोगाची मोहिम
12
Crude Oil Price Hike: कच्च्या तेलाच्या किमतीत जोरदार तेजी; ट्रम्प यांच्या धमक्यांनी सातत्यानं बिघडतंय सामान्यांचं बजेट
13
मुंबई पालिका क्षेत्रात महिलांकरता मोफत स्वच्छतागृहांच्या सुधारित धोरणासाठी प्रयत्नशील! - महापौर
14
आजचे राशीभविष्य, ०६ एप्रिल २०२६: घरात शांती व समाधानाचे वातावरण; अचानक पैसा खर्च होईल
15
भोंदू अशोक खरात प्रकरणाची EDमार्फत चौकशी; CDR प्रकरणातही मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश
16
Gaurav More: 'हास्यजत्रा' फेम गौरव मोरेने गुपचुप केलं लग्न? ऋतुजा बागवे लिहिते- "Mr. & Mrs मोरे"
17
लेख: मुंबईकरांची लोकलराणी वारंवार का अडखळतेय? आजकाल धाप लागल्यासारखी करतेय...
18
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
19
लेख: शिक्षिकेऐवजी नेत्याचा, पोलिसाचा मुलगा असता तर..? चार वर्षांच्या विघ्नेशची उपचारासाठी फरफट
Daily Top 2Weekly Top 5

प्रियंका गांधींच्या एन्ट्रीचा उत्तर प्रदेशात काँग्रेसला फायदा; पण...

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 7, 2019 07:25 IST

प्रियंका गांधींच्या सक्रीय राजकारणातील प्रवेशामुळे काँग्रेसच्या मतांमध्ये वाढ होण्याचा अंदाज

लखनऊ: प्रियंका गांधींच्या राजकारणातील एन्ट्रीचा फायदा उत्तर प्रदेशातकाँग्रेसला होणार असल्याचा अंदाज एका सर्वेक्षणातून व्यक्त करण्यात आला आहे. प्रियंका गांधींकडेउत्तर प्रदेशच्या पूर्व भागाची जबाबदारी देण्यात आली आहे. प्रियंका राजकारणात सक्रीय झाल्यानं काँग्रेसला फायदा होऊ शकतो, असा अंदाज इंडिया टीव्ही-सीएनएक्सनं यांच्या सर्वेक्षणातून समोर आला आहे. मात्र यामुळे समाजवादी पार्टी आणि बहुजन समाज पार्टी यांच्या महाआघाडीला बसणार आहे. विशेष म्हणजे प्रियंका गांधींची सक्रीय राजकारणातील एन्ट्री भाजपाच्या पथ्यावर पडणार आहे. प्रियंका गांधींच्या सक्रीय राजकारणातील प्रवेशामुळे काँग्रेसच्या मतांमध्ये वाढ होण्याचा अंदाज आहे. मात्र यामुळे काँग्रेसच्या जागा फारशा वाढणार नाहीत. उत्तर प्रदेशच्या पूर्व भागात लोकसभेच्या 43 जागा आहेत. यातील जवळपास सर्वच जागांवर काँग्रेसच्या मतांमध्ये वाढ होईल, असा अंदाज सर्वेक्षणातून वर्तवण्यात आला आहे. याचा फटका महाआघाडीला बसू शकेल. उत्तर प्रदेशच्या पूर्व भागातील 43 पैकी 19 जागांवर महाआघाडीला, 20 जागांवर भाजपाला यश मिळेल, असा अंदाज आहे. तर काँग्रेसला अवघ्या 4 जागांवर समाधान मानावं लागू शकतं. आधीचा अंदाज काय?प्रियंका गांधी सक्रीय राजकारणात येण्यापूर्वी एक सर्वेक्षण करण्यात आलं होतं. त्यात पूर्वांचलमध्ये (उत्तर प्रदेशचा पूर्व भाग) काँग्रेसला रायबरेली आणि अमेठी या दोनच जागांवर यश मिळेल, असा अंदाज व्यक्त करण्यात आला होता. तर सपा-बसपाच्या महाआघाडीला 26 आणि भाजपाला 15 जागा मिळतील, अशी शक्यता वर्तवण्यात आली होती. प्रियंका गांधींच्या एन्ट्रीमुळे कोणाचा किती फायदा? किती नुकसान?प्रियंका गांधी सक्रीय झाल्यानं काँग्रेसच्या मतांमध्ये वाढ होईल, असा अंदाज आहे. मात्र त्यामुळे काँग्रेसच्या जागा फारशा वाढणार नाहीत. आधी काँग्रेसला दोन जागा मिळण्याचा अंदाज होता. प्रियंका गांधींमुळे त्यात फक्त दोननं वाढ होईल. काँग्रेसची मतं वाढल्याचा मोठा फटका महाआघाडीला बसू शकतो. त्यांना आधी 26 जागा मिळण्याचा अंदाज होता. त्या आता 19 वर येऊ शकतात. म्हणजेच 7 जागांचं नुकसान होऊ शकतं. काँग्रेसची मतं वाढल्यानं भाजपाच्या मतांवरही परिणाम होईल. मात्र महाआघाडीला सर्वाधिक फटका बसल्यानं भाजपाचा फायदा होऊ शकतो. त्यांना आधी 15 जागा मिळतील, असा अंदाज होता. मात्र आता त्यांना 20 जागा मिळू शकतात. म्हणजेच 5 जागांचा फायदा होऊ शकतो.  

टॅग्स :Priyanka Gandhiप्रियंका गांधीUttar Pradeshउत्तर प्रदेशLok Sabha Election 2019लोकसभा निवडणूक २०१९congressकाँग्रेसBahujan Samaj Partyबहुजन समाज पार्टीSamajwadi Partyसमाजवादी पार्टीBJPभाजपा