शहरं
Join us  
Trending Stories
1
भारत द्वेष्टा...! डोनाल्ड ट्रम्प यांचा भारतावर पहिला वार; ६ भारतीय ऑईल कंपन्यांवर निर्बंध लादले...
2
दोस्तीत कुस्ती! भारताला २५% टॅरिफचा धक्का देत डोनाल्ड ट्रम्प यांची पाकिस्तानशी हातमिळवणी; केली मोठी डील 
3
जुनी मैत्रिण ४ वर्षांनी पुन्हा भेटली, एकांतात भेटायला बोलावलं; बंद खोलीत तिला कायमचं संपवलं, मग... 
4
Video - क्रूरतेचा कळस! 'ती' जीव वाचवण्यासाठी हाता-पाया पडली पण 'तो' अमानुषपणे मारत राहिला
5
Video - पावसाचे थैमान! पुरामध्ये ३० तास अडकली शाळेची बस, १०० जणांना वाचवण्यात यश
6
ट्रम्प यांचा भारतावर २५ टक्के टॅरिफ बॉम्ब; १ ऑगस्टपासून लागू होणार आयात शुल्क, दंडही आकारणार
7
धक्कादायक! ४००० देऊन भीक मागणाऱ्यांचे स्पर्म गोळा केले, टेस्ट ट्यूब बेबीसाठी लाखो रुपये आकारून लोकांना फसवले! 
8
आजचे राशीभविष्य ३१ जुलै २०२५ : या राशीला धनलाभाचा दिवस, या राशीला काहीसा प्रतिकूल
9
भारत-पाक युद्ध तिसऱ्या देशाने थांबवले नाहीच; परराष्ट्रमंत्री एस. जयशंकर यांनी खोडला दावा
10
‘लाडकी बहीण’च्या लाभार्थी महिला कर्मचाऱ्यांवर कारवाई; राज्य सरकारने जारी केले आदेश
11
मालेगाव खटल्याचा निकाल आज; १७ वर्षांनी विशेष NIA कोर्ट निर्णय देणार, संपूर्ण देशाचे लक्ष
12
संघर्षाचा शेवट गोड! तिसऱ्या मजल्यावरून ३९ व्या मजल्यावर; बीडीडीवासीयांचा आनंद गगनात मावेना
13
सर्वांत महाग-शक्तिशाली निसार उपग्रहाचे यशस्वी प्रक्षेपण; पृथ्वीची प्रत्येक इंच जमीन मॅप करणार
14
“मोदी यांच्या आचारसंहिता भंगप्रकरणी कोर्टात जाणार, निवडणूक आयोगाची कारवाईस टाळाटाळ”: चव्हाण
15
कृषी खात्यातील कथित भ्रष्टाचाराची चौकशी करा!; सुरेश धस यांचे मुख्यमंत्र्यांना पुन्हा पत्र
16
डिझेल दर सवलतीमुळे एसटीचे ११.८ कोटी वाचणार; स्पर्धात्मक निविदेमुळे महामंडळाला फायदा
17
देशातील विमानांमध्ये सुरक्षेच्या २६३ त्रुटी! सर्वाधिक एअर इंडिया, तिसऱ्या क्रमांकावर इंडिगो
18
मुंडेंचे नाव आले अन् माझा छळवाद सुरू झाला: अण्णा डांगे; भाजपात फेरप्रवेश, मन केले मोकळे
19
अनिलकुमार पवार हे दादा भुसे यांचे नातेवाईक, शिफारशीने नियुक्ती; संजय राऊत यांचा आरोप
20
अतिक्रमित जमिनींचा मिळणार मालकी हक्क, ३० लाख कुटुंबांना लाभ; चंद्रशेखर बावनकुळेंची माहिती

प्रियंका गांधींचा फोन झाला हॅक, काँग्रेसचा मोदी सरकारवर गंभीर आरोप

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 3, 2019 18:53 IST

काँग्रेसच्या महासचिव प्रियंका गांधी यांचा फोन हॅक झाल्यानं राजकीय वर्तुळात एकच खळबळ उडाली आहे.

नवी दिल्लीः काँग्रेसच्या महासचिव प्रियंका गांधी यांचा फोन हॅक झाल्यानं राजकीय वर्तुळात एकच खळबळ उडाली आहे. इस्राएली कंपनीनं हेरगिरीच्या कारणास्तव प्रियंका यांचा फोन हॅक केल्याचा आरोप काँग्रेसकडून करण्यात येत आहे.  व्हॉट्सअ‍ॅपच्या माध्यमातून होत असलेल्या हेरगिरीत मोदी सरकारचा हात आहे. फोन हॅक होण्याच्या आधी संबंधित व्यक्तीला व्हॉट्सअ‍ॅपवर मेसेज पाठवण्यात येतो. प्रियंका गांधींनाही अशाच प्रकारचा मेसेज आला होता, असं म्हणत काँग्रेसचे प्रवक्ते रणदीप सुरजेवाला यांनी भाजपावर थेट निशाणा साधला आहे. 'अबकी बार जासूसी सरकार' आणि भाजपाचे नवे नाव 'भारतीय जासूसी पार्टी' असं म्हणत त्यांनी मोदींनाही टोला लगावला आहे. पत्रकार, नेते आणि सामाजिक कार्यकर्त्यांच्या व्हॉट्सअ‍ॅपवरील हेरगिरीमागे केंद्राचा हात असल्याचा काँग्रेसला दाट संशय आहे. कारण पिगॅसस सॉफ्टवेअर हे सरकारच्या परवानगीशिवाय विकता येत नाही. तसेच ते अन्य कुणालाही विकता येत नाही, असा आरोपही काँग्रेसनं केला आहे. 2019च्या लोकसभा निवडणुकीदरम्यान पिगॅसस सॉफ्टवेअरच्या माध्यमातून पत्रकार, नेते आणि सामाजिक कार्यकर्त्यांचे फोन हॅक केल्याची प्रकरणं समोर आली आहेत, याची आठवणही सुरजेवालांनी करून दिली आहे. जगात 1400 ग्राहकांची इस्राएलच्या पिगॅसस सॉफ्टवेअरच्या माध्यमातून हेरगिरी करण्यात येत असल्याचा धक्कादायक आरोप काँग्रेसनं केला आहे. यात भारतातील अनेक पत्रकार, नेते सामाजिक कार्यकर्त्यांचा समावेश आहे. पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री आणि तृणमूल काँग्रेसच्या अध्यक्ष ममता बॅनर्जी यांनीही केंद्र सरकारवर शनिवारी हेरगिरीचा आरोप केला होता. पिगॅसस सॉफ्टवेअरद्वारे कोणकोणते इंटरनेट, ब्रॉडबँड नेटवर्क करप्ट केले, याची माहिती काँग्रेसला आहे. या हेरगिरीत सर्वोच्च न्यायालयापासून ते खासदार, राज्य सरकारांची यंत्रणाही पिगॅसस सॉफ्टवेअरद्वारे हॅक करता येते.

टॅग्स :Priyanka Gandhiप्रियंका गांधीcongressकाँग्रेसBJPभाजपाNarendra Modiनरेंद्र मोदी