शहरं
Join us  
Trending Stories
1
Video - अमेरिकेत मोठी दुर्घटना टळली! टेकऑफ दरम्यान लँडिंग गियरला आग, विमानात होते १७९ जण
2
ती तरुणी ओळखीच्या दुकानदारासोबत एक रात्र होती; लोणावळ्यात तिघांनी अत्याचार करून कारमधून फेकल्याच्या घटनेवर मोठा खुलासा
3
‘धनुष्यबाण-घड्याळ’ वाटपात कौशल्य; महायुतीच्या कामी आल्याचे राहुल नार्वेकरांना बक्षीस मिळणार!
4
हायव्होल्टेज ड्रामा! पोराला घेऊन बॉयफ्रेंडच्या घरी गर्लफ्रेंड; बायको म्हणते "माझा नवरा असा नाही, हीच..."
5
भयंकर! अचानक लिफ्ट बंद पडली, आवाज देण्यासाठी डोकं बाहेर काढताच...; व्यावसायिकाचा मृत्यू
6
पंतप्रधान नरेंद्र मोदीच पुन्हा जगात नंबर वन! सर्वाधिक लोकप्रिय लोकशाही नेत्यांमध्ये अव्वल
7
साप्ताहिक राशीभविष्य: ११ राशींना शुभ, चौफेर दुप्पट लाभ; सुबत्ता-भरभराट, ऑगस्टची सुरुवात ऑसम!
8
आजचे राशीभविष्य २७ जुलै २०२५ : नवीन कार्यारंभ करण्यास अनुकूल, कसा जाईल आजचा रविवार...
9
राजकीय हस्तक्षेपामुळे राज्याचे उद्योगविश्व त्रस्त; विकासकामांना करतात विरोध, दादागिरीही वाढली
10
मंत्रिमंडळात फेरबदल होण्याची शक्यता नाही! निर्णय फक्त कृषिमंत्री माणिकराव कोकाटेंबाबतच
11
ऑपरेशन सिंदूरवर संसदेच्या दोन्ही सभागृहांत विशेष चर्चा; शिष्टमंडळातील खासदारही सहभागी होणार
12
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याशी चर्चा करण्यासाठी मालदीवच्या नेत्यांची लगबग, भेटी अन् चर्चा
13
सूतगिरण्यांच्या अर्थसाहाय्याबाबत आता समान निकष; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचे निर्देश
14
अनिल अंबानी यांच्यावर सलग तिसऱ्या दिवशी ईडीचे छापे; विविध कार्यालयांतून कागदपत्रे जप्त
15
विजयदिनी शहीद जवानांच्या शौर्याला सलामी; कारगिलमध्ये २६ जुलै १९९९ रोजी फडकावला तिरंगा
16
दहशतवादी प्रकरणांतील फरारी गुन्हेगारांना परत आणण्यासाठी उपाययोजना करा: अमित शाह
17
‘निसार’ मोहीम पृथ्वी निरीक्षण क्षेत्रात आणणार क्रांती: इस्रो; उपग्रहाची वैशिष्ट्ये काय?
18
शाळेतील सुरक्षा उपायांचे ऑडिट आता अनिवार्य; केंद्र सरकारने सर्व राज्य सरकारांना दिले आदेश
19
वादग्रस्त न्यायाधीश यशवंत वर्मांप्रकरणी सर्वोच्च न्यायालयात उद्या सुनावणी
20
थायलंड-कंबोडिया संघर्षात ३३ ठार, हजारो विस्थापित; पुरातन मंदिरावरून पेटला संघर्ष

"मोदींच्या मतदारसंघात कामगारांची परिस्थिती अत्यंत वाईट, घर गहाण ठेवून काढताहेत दिवस"

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 1, 2020 17:01 IST

लॉकडाऊनमुळे अनेक उद्योग-धंदे बंद झाले आहेत. हातावर पोट असणाऱ्यांचे हाल झाले आहेत. याच दरम्यान काँग्रेसच्या नेत्या प्रियंका गांधी यांनी मोदी सरकारवर जोरदार टीका केली आहे.

नवी दिल्ली - देशात कोरोनामुळे गंभीर परिस्थिती निर्माण झाली आहे. देश कोरोनाच्या संकटाचा सामना करत असतानाच दुसरीकडे कोट्यवधींचे रोजगारदेखील धोक्यात आले आहेत. अर्थव्यवस्थेच्या वाढीसाठी महत्त्वपूर्ण योगदान देणाऱ्या क्षेत्रांवर कोरोनामुळे प्रचंड मोठं संकट निर्माण झालं आहे. त्यामुळे कित्येकांच्या डोक्यावर बेरोजगारीची टांगती तलवार आहे. लॉकडाऊनमुळे अनेक उद्योग-धंदे बंद झाले आहेत. हातावर पोट असणाऱ्यांचे हाल झाले आहेत. याच दरम्यान काँग्रेसच्या नेत्या प्रियंका गांधी यांनी मोदी सरकारवर जोरदार टीका केली आहे.

प्रियंका गांधी यांनी आपल्या ट्विटर अकाऊंटवरून भाजपावर जोरदार निशाणा साधला आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा मतदारसंघ असणाऱ्या वाराणसीमधील कामगारांची आर्थिक परिस्थिती अत्यंत बिकट असल्याचं त्यांनी म्हटलं आहे. एका हिंदी वृत्ताची लिंक शेअर करत त्यांनी टीकास्त्र सोडलं आहे. पंतप्रधान मोदींबरोबरच उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्यावरही हल्लाबोल केला आहे. "उत्तर प्रदेशच्या मुख्यमंत्र्यांनी पंतप्रधानांना लघू उद्योगांमध्ये लाखो रोजगार उपलब्ध असल्याचे सांगितले. मात्र खरं काय आहे ते पाहा" असं म्हटलं आहे. 

"पंतप्रधान ज्या मतदारसंघामधून खासदार झाले आहेत तेथील शान असणाऱ्या विणाकाम कामगारांची अवस्था पाहा. या कामगारांना आज दागिने विकून, घर गहाण ठेवून दिवस काढावे लागत आहेत, जगावं लागत आहे. लॉकडाऊनच्या कालावधीमध्ये यांच्याकडे काम नाही. छोटे व्यवसायिक आणि कामगारांची परिस्थिती अत्यंत वाईट आहे. वादळी प्रचार नाही तर आर्थिक मदत देणारे एखादे पॅकेजच त्यांना या संकटातून वर काढू शकतं" असं ट्विट प्रियंका गांधी यांनी केलं आहे.

उत्तर प्रदेशातही सत्ताधारी विरुद्ध विरोधकांमध्ये जुंपली आहे. तिथे भाजपाची सत्ता आहे आणि काँग्रेसच्या नेत्या प्रियंका गांधी यांनी मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ सरकारविरोधात मोर्चा उघडला आहे. स्थलांतरित मजुरांसाठी बस सोडण्याच्या मुद्द्यावरून त्यांच्यात बरीच 'तू तू मैं मैं' सुरू आहे. काही दिवसांपूर्वी हवं तर बसवर भाजपाचे झेंडे लावा, पण मजुरांसाठी बससेवा सुरू करा, असा टोला प्रियंका गांधींनी लगावला होता. काँग्रेसने आत्तापर्यंत 67 लाख लोकांना वेगवेगळ्या माध्यमातून मदत केलीय, आमच्या बसेस मजुरांसाठी आजही तयार आहेत, पण योगी सरकार मंजुरी देत नाहीए, असा दावाही त्यांनी केला होता.

महत्त्वाच्या बातम्या

"महाराष्ट्रात लॉकडाऊन की अनलॉक?, हे भ्रमित ठाकरे सरकार"; चंद्रकांत पाटलांचा हल्लाबोल

तामिळनाडूच्या लिग्नाइट पॉवर प्लान्टमध्ये बॉयलरचा स्फोट; 6 जणांचा मृत्यू, 17 जखमी

CoronaVirus News : मृत्यूनंतरही होताहेत हाल! खड्ड्यात फेकले कोरोनाग्रस्तांचे मृतदेह, धक्कादायक Video ने खळबळ

CoronaVirus News : बापरे! '...तर दिवसाला 1 लाख नवे रुग्ण सापडतील'; तज्ज्ञांचा गंभीर इशारा

Video - संतापजनक! मास्क लावण्याचा सल्ला दिला म्हणून कार्यालयातील दिव्यांग महिलेला बेदम मारहाण

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याNarendra Modiनरेंद्र मोदीBJPभाजपाPriyanka Gandhiप्रियंका गांधीcongressकाँग्रेसyogi adityanathयोगी आदित्यनाथ