शहरं
Join us  
Trending Stories
1
"ही वृत्ती संपुष्टात आणण्याची शिवसेनेची भूमिका"; अशोक खरातचे एकनाथ शिंदेंना फोनच्या दाव्यावर उदय सामंतांची प्रतिक्रिया
2
Ashok Kharat Case : भोंदूबाबा खरातचा 'महाप्रताप'! भक्तांच्याच नावे उघडली १०० बोगस खाती; 'समता' आणि 'जयदंबा' पतसंस्था रडारवर
3
'फोनवर संभाषण झाले म्हणून वरिष्ठ मंत्र्यांवर आरोप करणे योग्य नाही';अंजली दमानियांच्या आरोपांवर दीपक केसरकरांचे प्रत्युत्तर
4
धुळे-सोलापूर महामार्गावर प्रचंड वाहतूक कोंडी; ७ तासांपासून वाहने खोळंबली, नागरिकांचे हाल
5
ज्याची भीती तेच घडलं, युद्ध आणखी पेटलं; इराणच्या सर्वात मोठ्या ब्रिजवर हल्ला, ८ मृत्यू ९५ जखमी
6
IPL 2026: ५ षटकार, ६ चौकार, १६९.७७ चा स्ट्राईक रेट; पंजाबविरुद्ध आयुष म्हात्रेची विस्फोटक इनिंग!
7
US Israel Iran War : इराणचा यू-टर्न! आधी म्हणालं 'वैमानिक ताब्यात', आता शोधण्यासाठी बक्षीस; अमेरिकेच्या पायलटबाबत सस्पेन्स
8
IPL 2026: रोहित शर्माचा फिटनेस तर बघा, चक्क एका हातानं पकडला झेल, व्हिडीओ व्हायरल
9
India Oil Supply News: भारतासाठी 'संजीवनी' ठरला हा छोटा देश; युद्ध असो की संकट, अविरत करतोय तेल अन् गॅस पुरवठा
10
"आणखी थोडा वेळ मिळाला, तर अमेरिका सहज होर्मुझ सामुद्रधुनी...", डोनाल्ड ट्रम्प यांचे इराणची चिंता वाढवणार विधान
11
म्हाडाचं घर घ्यायचा विचार? फॉर्म किती रुपयांना, अनामत रक्कम किती भरावी लागणार?
12
US Israel Iran War : डोनाल्ड ट्रम्प यांना विरोध केल्याचे फळ! इराणने उघडला फ्रान्ससाठी होर्मुझचा रस्ता; मॅक्रॉन यांना खास 'बक्षीस'
13
IPL 2026: चेन्नईच्या संघात एक मोठा बदल; कोण इन, कोण आउट? पाहा दोन्ही संघाची प्लेईंन इलेव्हन
14
MS Dhoni: सीएसकेच्या चाहत्यांसाठी गूड न्यूज? ट्रेनिंग सेशनसाठी धोनी मैदानात, पण खेळण्याबाबत सस्पेन्स कायम
15
फक्त एका दिवसासाठी अमेरिकेतून युवक भारतात आला; ताजमहाल पाहून निघून गेला, Video व्हायरल
16
Latest Marathi News LIVE Updates: अमेरिकेला पुन्हा झटका! इराणने दुसरे एफ-३५ लढाऊ विमान पाडले
17
जीवाशी खेळ! एक्स्पायरी डेट बदलून विकत होते कोल्ड ड्रिंक्स, बिस्किट; मोठ्या रॅकेटचा पर्दाफाश
18
Bhagwant Mann : "समोसा-पिझ्झाचा मुद्दा..."; राघव चड्ढांवर पंजाबचे मुख्यमंत्री भगवंत मान कडाडले, आतिशींचा गंभीर आरोप
19
'सिंधू' करार स्थगितीनंतर पाकिस्तानला आणखी एक धक्का! पुन्हा सुरू होतोय 'मोहरा प्रकल्प', जाणून घ्या
20
IPL 2026: चेन्नईला होतोय पश्चाताप! ज्याला संघातून काढलं, तोच खेळाडू दिल्लीसाठी ठरतोय मोठा जॅकपॉट
Daily Top 2Weekly Top 5

हिंसाचार, बलात्कार, स्थलांतर...मणिपूर मुद्द्यावरुन प्रियंका गांधींचा मोदी सरकारवर निशाणा

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 8, 2025 17:31 IST

Priyanka Gandhi: पंतप्रधानांनी मणिपूर अशा अवस्थेत का सोडले आहे? प्रियंका गांधींचा प्रश्न

Priyanka Gandhi on Manipur: गेल्या काही महिन्यांपासून शांत असलेल्या मणिपूरमध्ये पुन्हा एकदा हिंसाचार उफाळून आला आहे. शनिवारी रात्री मेतेई संघटनेच्या नेत्या अरामबाई टेंगोल आणि इतर अनेक नेत्यांना पोलिसांनी अटक केल्यानंतर हिंसाचार सुरू झाला. निदर्शकांनी रस्त्यांवर उतरुन बसेस जाळल्या, मालमत्तेची तोडफोड केली. या पार्श्वभूमीवर प्रशासनाने बिष्णुपूर जिल्ह्यात कर्फ्यू लागू केला असून, पाच जिल्ह्यांमध्ये इंटरनेटवर बंदी घातली आहे. दरम्यान, आता या हिंसाचारावर काँग्रेस नेत्या प्रियंका गांधी यांची प्रतिक्रिया आली आहे.

काँग्रेस खासदार प्रियांका गांधी यांनी मणिपूरबाबत सरकारवर निशाणा साधला आहे. एका ट्विटमध्ये प्रियांका गांधी यांनी लिहिले की, मणिपूर पुन्हा एकदा हिंसाचाराच्या विळख्यात सापडला आहे. गेल्या दोन वर्षांपासून राज्यातील जनता हिंसाचार, खून, बलात्कार आणि स्थलांतराला तोंड देत आहे. शेकडो लोक मृत्युमुखी पडले आहेत, हजारो लोक बेघर आहेत. केंद्राचे राज्य असूनही तिथे शांतता प्रस्थापित होत नसल्याचे कारण काय? पंतप्रधानांनी मणिपूर अशा अवस्थेत का सोडले आहे? असा प्रश्न त्यांनी विचारला.

आजपर्यंत पंतप्रधान मणिपूरला गेले नाहीत, राज्याच्या कोणत्याही प्रतिनिधीला भेटले नाहीत, कधीही शांततेचे आवाहन केले नाही किंवा कोणतेही ठोस प्रयत्न केले नाहीत. ही असंवेदनशील आणि बेजबाबदार वृत्ती कोणत्याही लोकशाहीसाठी अत्यंत दुर्दैवी आहे. देशवासीयांना शांतता आणि सुरक्षितता सुनिश्चित करणे, ही पंतप्रधानांची जबाबदारी आहे. यापासून मागे हटणे म्हणजे कर्तव्यापासून दूर जाणे होय, अशी टीकाही प्रियंका गांधी यांनी केली. 

२०२३ पासून संघर्ष सुरूमणिपूरमध्ये २०२३ पाहून तीव्र संघर्ष पेटला आहे. एका रिपोर्टनुसार, या संघर्षात २५० हून अधिक लोकांचा मृत्यू झाला आहे, तर हजारो लोक विस्थापित झाले आहेत. मणिपूर विधानसभेत ६० जागा आहेत, त्यापैकी एक जागा अजूनही रिक्त आहे. भाजपच्या नेतृत्वाखालील आघाडीत ३२ मेइतेई आमदार, तीन मणिपुरी मुस्लिम आमदार आणि नऊ नागा आमदार आहेत. त्यांची एकूण संख्या ४४ आहे. याशिवाय काँग्रेसकडे पाच मेइतेई जागा आहेत, तर उर्वरित १० आमदार कुकी आहेत, ज्यात भाजपचे सात बंडखोर, कुकी पीपल्स अलायन्सचे दोन आणि एक अपक्ष आहे. तुम्हाला सांगतो की मेइतेई गट मणिपूरची प्रादेशिक अखंडता राखण्याचा आग्रह धरत आहे, तर कुकी-झो प्रतिनिधी डोंगराळ जिल्ह्यांमध्ये स्वतंत्र प्रशासनाची मागणी करत आहेत. त्यामुळे मे २०२३ पासून तणाव सुरू आहे.

टॅग्स :Manipur Violenceमणिपूर हिंसाचारPriyanka Gandhiप्रियंका गांधीBJPभाजपाcongressकाँग्रेस