काँग्रेस नेत्या प्रियंका गांधी वड्रा यांनी मंगळवारी केरळमधील दुग्ध उत्पादक शेतकऱ्यांच्या एका गटाशी संवाद साधला. विशेष म्हणजे त्यांना या संवादादरम्यान आलिया भट नावाची गाय भेटली. प्रियंका यांनी केरळमधील कोडेनचेरी येथील एका दुग्ध उत्पादक शेतकऱ्यांशी अलिकडेच झालेल्या संवादाबद्दल X वरील एका पोस्टमध्ये असामान्य भेटीचा आवर्जून उल्लेख केला.
बॉलिवूड अभिनेत्री आलिया भटला टॅग करून प्रियंका गांधी म्हणाल्या की, "एका अतिशय गोड कुटुंबाने चालवलेल्या डेअरी फार्मच्या दुग्ध उत्पादक शेतकऱ्यांच्या एका गटाला भेटले. त्यावेळी तिथे आलिया भट नावाची गायही भेटली. अभिनेत्री आलिया भटची मी माफी मागते, पण ती खरोखरच खूप गोड होती. दुर्दैवाने, दुग्ध उत्पादक शेतकऱ्यांना अनेक अडचणी येत आहेत आणि त्यापैकी बरेच जण उदरनिर्वाह करण्यासाठी संघर्ष करत आहेत."
"मी संबंधित मंत्रालयाला पत्र लिहून त्यांना भेडसावणाऱ्या अनेक समस्यांबद्दल जागरूक करू इच्छिते, ज्यात पशुवैद्यकीय औषधांच्या वाढत्या किमती, पुरेशा विमा संरक्षणाचा अभाव आणि चांगल्या दर्जाच्या पशुखाद्याचा वापर करण्यात येणाऱ्या अडचणींचा समावेश आहे. या समस्या मला समजावून सांगण्यासाठी वेळ काढणाऱ्या सर्व शेतकऱ्यांची मी आभारी आहे. मी शक्य ती सर्व मदत करेन" असंही प्रियंका गांधी यांनी ट्विटमध्ये म्हटलं आहे.
Web Summary : Priyanka Gandhi met dairy farmers in Kerala and encountered a cow named Alia Bhatt. She apologized to the actress, noting the cow's sweetness while highlighting the struggles of dairy farmers. Gandhi pledged to address their issues, including rising costs and lack of insurance.
Web Summary : केरल में प्रियंका गांधी डेयरी किसानों से मिलीं और आलिया भट्ट नाम की एक गाय से सामना हुआ। अभिनेत्री से माफी मांगते हुए, उन्होंने डेयरी किसानों के संघर्षों को उजागर किया। गांधी ने बढ़ती लागत और बीमा की कमी सहित उनकी समस्याओं का समाधान करने का संकल्प लिया।