शहरं
Join us  
Trending Stories
1
ट्रम्प यांची 'पीस-डील' धोक्यात! इराणच्या कट्टर धोरणामुळे मध्यपूर्वेत पुन्हा युद्धाचे सावट
2
ट्रम्प यांना खूश करण्यासाठी युक्रेनचा नवा डाव; डोनबासचा काही भाग आता होणार 'डोनीलँड'?
3
इराणनं अमेरिकेची नाकाबंदी तोडली, नाकाखालून घेऊन गेला ३४ टँकर्स; ९० कोटी डॉलर्सचं तेल 'होर्मुज'बाहेर! असा दिला चकमा
4
कॅप्टन रियान परागची चाल अन् गोलंदाजांची कमाल! RR नं पंतच्या LSG ला घरच्या मैदानात दिला पराभवाचा दणका
5
उकाड्याने हैराण पुण्यात अचानक पावसाचा वर्षाव; स्वारगेट, शास्त्री रोड परिसरात मध्यम सरी
6
LSG vs RR :अवघ्या ११ धावांत पंतसह तिघांच्या पदरी भोपळा! बडोनीनं स्वतःच्या पायावर मारून घेतली कुऱ्हाड
7
खर्गे मोदींना म्हणाले 'दहशतवादी'; निवडणूक आयोगाची मोठी कारवाई, २४ तासांत मागवलं उत्तर
8
एव्हीएशन सेक्टरमध्ये हाहाकार! या विमान कंपनीने अचानक २०,००० विमानफेऱ्या रद्द केल्या; एवढे काय घडले...?
9
Vaibhav Suryavanshi Fastest 500 : छोट्याखानी खेळीत महारेकॉर्ड! वैभव सूर्यवंशीनं रचला इतिहास
10
मालेगाव बॉम्बस्फोट खटल्यात मोठा निकाल; पुराव्याअभावी ४ आरोपींची निर्दोष मुक्तता!
11
LSG vs RR : शमीचा जलवा! यशस्वीपाठोपाठ ध्रुव जुरेल ठरला झिरो! लगेच संजीव गोएंकांनी काढला फोटो
12
प्रियकर मुलीच्या खोलीतून निघाला; चिडलेल्या बापाने पोटच्या १७ वर्षीय मुलीला संपवले
13
इराण-अमेरिका युद्धाचा फटका आता थेट 'फॅमिली प्लॅनिंग'ला! ३० टक्क्यांपर्यंत वाढू शकतात कंडोम्सचे भाव
14
उल्हासनगर महापालिकेत 'डम्पिंग'वरून रणकंदन; भाजप नगरसेवकांचे ठिय्या आंदोलन
15
कल्याणमध्ये ७० हजार रुपयांचा सायबर क्राईम : हेल्पलाईन तक्रार करुन दाद नाही
16
पाकिस्तानमधून इराणमध्ये दहशतवादी घुसले! रास्क सीमेवर मोठी चकमक; १२ दहशतवादी ठार
17
ममता बॅनर्जींचा हस्तक्षेप लोकशाहीसाठी धोकादायक! आयपॅक-ईडी कारवाईवरून सर्वोच्च न्यायालयाचे ताशेरे
18
WhatsApp वापरता? मग 'हे' सेटिंग्ज माहीतच हवेत; ९०% लोक अजूनही वापरतच नाहीत!
19
Top Marathi News LIVE Updates: बुलढाणा: उपसरपंचाच्या कुटुंबावर हल्ला; पत्नीला विष पाजल्याचा आरोप
20
टी-२० इंटरनॅशनलमध्ये या विक्रमाची केवळ बरोबरीच होऊ शकते; मोडणं अशक्य! केवळ २ गोलंदाजांनाच जमलाय हा अद्भुत चमत्कार
Daily Top 2Weekly Top 5

समीरच्या ठाण्यातील खोलीवर छापा; कागदपत्रे, पुस्तके जप्त : सात दिवसांनंतर झाला उलगडा

By admin | Updated: September 23, 2015 00:06 IST

कोल्हापूर : ज्येष्ठ नेते कॉ. गोविंद पानसरे हत्याप्रकरणी पोलिसांनी अटक केलेल्या संशयित समीर गायकवाड हा राहत असलेल्या ठाण्यातील एका खोलीवर कोल्हापूर पोलिसांनी मंगळवारी सकाळी छापा टाकला. या छाप्यात पोलिसांच्या हाती सनातन संस्थेची कागदपत्रे तसेच पुस्तके आदी दोन बॅगा भरून साहित्य मिळाले.

कोल्हापूर : ज्येष्ठ नेते कॉ. गोविंद पानसरे हत्याप्रकरणी पोलिसांनी अटक केलेल्या संशयित समीर गायकवाड हा राहत असलेल्या ठाण्यातील एका खोलीवर कोल्हापूर पोलिसांनी मंगळवारी सकाळी छापा टाकला. या छाप्यात पोलिसांच्या हाती सनातन संस्थेची कागदपत्रे तसेच पुस्तके आदी दोन बॅगा भरून साहित्य मिळाले. पानसरे यांच्या हत्येसंदर्भात कोल्हापूर पोलिसांनी गेल्या मंगळवारी (दि. 16) संशयित म्हणून समीर गायकवाड या सनातन संस्थेच्या साधकाला सांगलीत अटक केली. गेली सात दिवस कोल्हापूर पोलिसांसह, एसआयटी, एनआयए, कर्नाटक सीआयडीचे पोलीस हे समीर गायकवाडकडे चौकशी करून त्याच्याकडून माहिती घेण्याचा प्रयत्न करत आहेत पण त्याने तपासकामात पोलिसांना कोणतेही सहकार्य केलेले नाही. त्याच्या प्रेयसीलाही पोलिसांनी चौकशीसाठी ताब्यात घेतल्यानंतर अनेक गोष्टी तपासात उघड झाल्या. तिने तपासात पोलिसांना पूर्णत: सहकार्य केले आहे. त्यामुळे तिला दररोज तपासासाठी पोलीस अधीक्षक कार्यालयात आणले जाते, सायंकाळी तिच्या इचलकरंजीतील नातेवाईकांच्या घरी सोडले जाते. समीरची ठाण्यात खोली होती. त्याची माहिती कोल्हापूर पोलिसांना मिळाली. त्यानुसार पोलिसांचे एक पथक सोमवारी मध्यरात्रीच ठाण्याकडे रवाना झाले. या पथकाने मंगळवारी सकाळी ठाण्यातील समीर राहत असलेली खोली शोधून काढली, त्या खोलीत तो एकटाच राहत असल्याचे निदर्शनास आले. त्या खोलीला असलेले कुलूप तोडून पोलिसांनी खोलीची झडती घेतली. त्या खोलीत पोलिसांना सनातन संस्थेची काही कागदपत्रे, संस्थेचा प्रसार करणारी पुस्तके तसेच अनेक संशयास्पद कागदपत्रे मिळाल्याचे समजते. पोलिसांनी ही सर्व कागदपत्रे, काही साहित्य जप्त करून ते दोन बॅगामध्ये भरून हे पथक कोल्हापूरला मंगळवारी मध्यरात्री परतले. जप्त केलेल्या कागदपत्रांवरून अनेक गोष्टींचाही उलगडा होण्याची शक्यता आहे. (प्रतिनिधी).....पोलिसी खाक्या दाखविताच ठाण्यातील वास्तव्य उघडतपास कामात पोलिसांना समीर गायकवाडने म्हणावे तितके सहकार्य केलेले नाही त्यामुळे पोलिसांना गेल्या सात दिवसांत त्याच्याकडून अपेक्षित माहिती मिळाली नसल्याचे समजते. त्याने ठाण्यात एक खोली भाड्याने घेतल्याची माहिती पोलिसांपासून लपवली होती पण त्याच्या मोबाईल कॉल डिटेल्सवरून त्याचे ठाण्यात वास्तव्य असल्याचे तपासात स्पष्ट झाले होते. ठाण्यातील त्याच्या ठावठिकाणाबद्दल त्याला विचारले असता त्याने उडवा-उडवीची उत्तरे दिली. सोमवारी मध्यरात्री त्याला पोलिसी ‘खाक्या’ दाखविल्यानंतर त्याने ठाण्यातील वास्तव्याबद्दल माहिती दिल्याचे समजते.