शहरं
Join us  
Trending Stories
1
गणेशभक्तांना घेऊन जाणारी बस कशेडी बोगद्याजवळ पेटली; प्रवासी झोपेत असतानाच उडाला आगीचा भडका
2
ये नया हिंदुस्तान है...! केवळ पुतिनच नाही, झेलेंस्कीसुद्धा भारतात येणार...; तिकडे अमेरिकेचा 'यू-टर्न', इकडे वेगळाच 'पिक्चर' दिसणार?
3
'राहुल गांधी बोलायला लागले की त्यांचे खासदार घाबरतात कारण...'; किरेन रिजिजूंची विरोधी पक्षावर जोरदार टीका
4
मुकेश किंवा नीता अंबानी नाही तर रिलायन्समध्ये सर्वात जास्त शेअर्स कोणाकडे आहेत?
5
गणेशमूर्ती प्राणप्रतिष्ठेला ऐन वेळी धावाधाव नको, म्हणून 'ही' घ्या पूजासाहित्याची इत्थंभूत यादी आणि विधी! 
6
Video - राजस्थानमध्ये पुराचे थैमान; बचावकार्यासाठी येणाऱ्या NDRF जवानांच्या गाडीचा अपघात
7
ऑनलाइन गेमिंगच्या जाळ्यात तुमचाच ‘गेम’ तर होत नाही ना?
8
तीन हजार महिला सेवा सहकारी संस्थांना सरकारी कामे देणार,मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची घोषणा
9
"या गोष्टी खेळाशी जोडू नयेत म्हणणारे लोक...";भारत-पाक सामन्यावरून गोंधळावरुन अजित पवारांचे स्पष्ट मत
10
अमेरिकेत ५.५ कोटी व्हिसाधारकांची चौकशी; ५० लाख भारतीयांचाही समावेश, आता ट्रक चालकांनाही व्हिसा नाही
11
पालिका बँक निवडणुकीत ठाकरे, दरेकर गटाला धक्का, सहकार पॅनलने मारली बाजी
12
चालू शूटिंगमध्ये कोसळले, सेटवरच ४७ वर्षीय दिग्दर्शकाचा हृदयविकाराच्या झटक्याने मृत्यू
13
आजचे राशीभविष्य, २४ ऑगस्ट २०२५: दैनंदिन कामे निर्विघ्नपणे पार पडतील; संसारात समाधान राहील
14
काँग्रेसच्या गॅम्बलर आमदाराला अटक; १२ कोटींची राेकड जप्त
15
अनिल अंबानी सीबीआयच्या रडारवर; मुंबईतील घरी छापे, ३,०७३ कोटींचे कथित कर्ज घोटाळा प्रकरण
16
निवडणूक लढवायची? मग मतदारयाद्या तपासायला घ्या, राज ठाकरे यांची इच्छुकांना सूचना
17
"मी मांसाहार खाल्लेलं माझ्या पांडुरंगाला चालतं, तुम्हाला काय प्रॉब्लेम..?"; सुप्रिया सुळेंच्या विधानानं नवा वाद
18
गणेशोत्सवात परीक्षा नको, अमित ठाकरे यांनी केली मागणी
19
वन नेशन, वन इलेक्शन...! भाजपानं रणनीतीत केला बदल; विरोधकांना शह देण्यासाठी नवा 'मेगा प्लॅन'
20
दीड वर्षाच्या मुलाला मिठीत घेऊन BSF जवानानं मारली गंगा नदीत उडी; कारण ऐकून डोळ्यात पाणी येईल

'रुपया मजबूत करण्यासाठी नोटांवर देवी लक्ष्मीचा फोटो छापावा'

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 15, 2020 21:13 IST

देशातील चलनी नोटांवर माता लक्ष्मीचा फोटो छापल्यास आंतराष्ट्रीय बाजारात भारतीय रुपया मजबूत होईल

नवी दिल्ली - भाजपचे ज्येष्ठ नेते सुब्रमण्यम स्वामी यांनी पुन्हा एकदा अजब-गजब विधान केले आहे. देशाची खालावेलली अर्थव्यवस्था सुधारण्यासाठी स्वांमींनी भयंकर असा उपाय सुचवला आहे. डॉलरच्या तुलनेत भारतीय रुपयांची जी घसरण सुरू आहे. ती रोखण्यासाठी तसेच भारतीय रुपयांना मजबूत करायचे असेल तर भारतीय नोटांवर लक्ष्मीचा फोटो लावण्यात यावा, असे स्वामींनी म्हटले आहे. 

देशातील चलनी नोटांवर माता लक्ष्मीचा फोटो छापल्यास आंतराष्ट्रीय बाजारात भारतीय रुपया मजबूत होईल, असा दावाही सुब्रमण्यम स्वामींनी केला आहे. स्वामींच्या या दाव्यावर आता अर्थतज्ञांकडून काय प्रतिक्रिया येतात, हे पाहणे औत्सुक्याचे ठरेल. इंडोनेशियात नोटांवर गणपती बाप्पाचा फोटो आहे, या प्रश्नावर सुब्रमण्यम स्वामी म्हणाले की, या प्रश्नाचे उत्तर पंतप्रधान नरेंद्र मोदी देऊ शकतात. नोटावर गणपती असल्याने अनेक संकट दूर करतात. त्यामुळे मला वाटते की, भारतीय नोटांवरही देवी लक्ष्मी यांचा फोटो असायला हवा, असे विधान स्वामींनी केले आहे. मध्य प्रदेशमधील खंडवा येथे आयोजित करण्यात आलेल्या स्वामी विवेकानंद व्याख्यानमाला कार्यक्रमात त्यांनी हे अर्थव्यवस्थेला मजुबती देणारे निरीक्षण नोंदवले आहे. 

दरम्यान, गत काही काळापासून आर्थिक आघाडीवर एकामागोमाग एक झटके सहन करीत असलेल्या नरेंद्र मोदी सरकारला आणखी एक तगडा झटका बसला आहे. जागतिक बँकेने बुधवारी ‘जागतिक आर्थिक संभावना’ या शीर्षकाचा अहवाल जारी केला. त्यामध्ये 2019-20 या आर्थिक वर्षात भारताचा आर्थिक विकास दर पाच टक्क्यांपर्यंत घसरण्याचा अंदाज व्यक्त केला आहे. जागतिक बँकेने यापूर्वी भारताचीअर्थव्यवस्था 2019-20 मध्ये सहा टक्के दराने वाढेल, असा अंदाज व्यक्त केला होता, हे उल्लेखनीय आहे.

टॅग्स :Subramanian Swamyसुब्रहमण्यम स्वामीEconomyअर्थव्यवस्थाIndian Currencyभारतीय चलनNote BanनोटाबंदीBJPभाजपा