शहरं
Join us  
Trending Stories
1
'फोनवर संभाषण झाले म्हणून वरिष्ठ मंत्र्यांवर आरोप करणे योग्य नाही';अंजली दमानियांच्या आरोपांवर दीपक केसरकरांचे प्रत्युत्तर
2
धुळे-सोलापूर महामार्गावर प्रचंड वाहतूक कोंडी; ७ तासांपासून वाहने खोळंबली, नागरिकांचे हाल
3
ज्याची भीती तेच घडलं, युद्ध आणखी पेटलं; इराणच्या सर्वात मोठ्या ब्रिजवर हल्ला, ८ मृत्यू ९५ जखमी
4
US Israel Iran War : इराणचा यू-टर्न! आधी म्हणालं 'वैमानिक ताब्यात', आता शोधण्यासाठी बक्षीस; अमेरिकेच्या पायलटबाबत सस्पेन्स
5
IPL 2026: रोहित शर्माचा फिटनेस तर बघा, चक्क एका हातानं पकडला झेल, व्हिडीओ व्हायरल
6
India Oil Supply News: भारतासाठी 'संजीवनी' ठरला हा छोटा देश; युद्ध असो की संकट, अविरत करतोय तेल अन् गॅस पुरवठा
7
"आणखी थोडा वेळ मिळाला, तर अमेरिका सहज होर्मुझ सामुद्रधुनी...", डोनाल्ड ट्रम्प यांचे इराणची चिंता वाढवणार विधान
8
म्हाडाचं घर घ्यायचा विचार? फॉर्म किती रुपयांना, अनामत रक्कम किती भरावी लागणार?
9
US Israel Iran War : डोनाल्ड ट्रम्प यांना विरोध केल्याचे फळ! इराणने उघडला फ्रान्ससाठी होर्मुझचा रस्ता; मॅक्रॉन यांना खास 'बक्षीस'
10
IPL 2026: चेन्नईच्या संघात एक मोठा बदल; कोण इन, कोण आउट? पाहा दोन्ही संघाची प्लेईंन इलेव्हन
11
MS Dhoni: सीएसकेच्या चाहत्यांसाठी गूड न्यूज? ट्रेनिंग सेशनसाठी धोनी मैदानात, पण खेळण्याबाबत सस्पेन्स कायम
12
फक्त एका दिवसासाठी अमेरिकेतून युवक भारतात आला; ताजमहाल पाहून निघून गेला, Video व्हायरल
13
Latest Marathi News LIVE Updates: अमेरिकेला पुन्हा झटका! इराणने दुसरे एफ-३५ लढाऊ विमान पाडले
14
जीवाशी खेळ! एक्स्पायरी डेट बदलून विकत होते कोल्ड ड्रिंक्स, बिस्किट; मोठ्या रॅकेटचा पर्दाफाश
15
Bhagwant Mann : "समोसा-पिझ्झाचा मुद्दा..."; राघव चड्ढांवर पंजाबचे मुख्यमंत्री भगवंत मान कडाडले, आतिशींचा गंभीर आरोप
16
'सिंधू' करार स्थगितीनंतर पाकिस्तानला आणखी एक धक्का! पुन्हा सुरू होतोय 'मोहरा प्रकल्प', जाणून घ्या
17
IPL 2026: चेन्नईला होतोय पश्चाताप! ज्याला संघातून काढलं, तोच खेळाडू दिल्लीसाठी ठरतोय मोठा जॅकपॉट
18
पाकव्याप्त काश्मीर लवकरच भारतात समाविष्ट होणार; AIIO चे मुख्य इमाम उमर इलियासी यांची भविष्यवाणी
19
युद्धभागात १०,००० हून अधिक कर्मचारी! टाटा समूहाच्या ३० कंपन्यांच्या सीईओंना तयार राहण्याचे आदेश
20
इराणमध्ये दिसली अमेरिकेची लढाऊ विमाने आणि हेलिकॉप्टर, कमी उंचीवर घिरट्या; व्हिडीओ आले समोर
Daily Top 2Weekly Top 5

पंतप्रधानांचा पहिला निर्णय शेतकरी अन् गरिबांसाठी! नरेंद्र मोदी ॲक्शन मोडमध्ये

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 11, 2024 07:22 IST

Narendra Modi News:

- संजय शर्मानवी दिल्ली - तिसऱ्यांदा पंतप्रधान झाल्यानंतर नरेंद्र मोदी यांनी किसान सन्मान निधीचा १७ वा हप्ता जारी करण्याचा पहिला आदेश दिला. सायंकाळीच मंत्रिमंडळाची बैठक बोलावून प्रधानमंत्री आवास योजनेचे बजेट वाढवून तीन कोटी नवीन घरे देण्यास मंजुरी देण्यात आली.

मोदी सरकार ३.० च्या शपथविधीसोबतच पंतप्रधान नरेंद्र मोदी पहिल्याच दिवसापासून पूर्ण ॲक्शन मोडमध्ये दिसत आहेत. पहिल्याच दिवशी पंतप्रधानांनी किसान सन्मान निधीचा १७ वा हप्ता जारी करण्यासाठी फाइलवर स्वाक्षरी केली. पंतप्रधानांच्या स्वाक्षरीनंतर ९.३ कोटी शेतकऱ्यांच्या किसान सन्मान निधीचा दोन हजार रुपयांचा हप्ता थेट त्यांच्या बँक खात्यात जमा केला जाईल. किसान सन्मान निधीचा हा १७ वा हप्ता असेल. ९.३ कोटी शेतकऱ्यांच्या खात्यात अंदाजे २० हजार कोटी रुपये ट्रान्सफर केले जातील. शेतकऱ्यांचे जीवन सुकर करण्यासाठी वचनबद्ध आहोत, असे मोदींनी स्वाक्षरी केल्यानंतर म्हटले. 

गरिबांना कायमस्वरूपी घरेसायंकाळी मंत्रिमंडळाची बैठक बोलावून प्रधानमंत्री आवास योजनेचे बजेट वाढवून तीन कोटी गरिबांना कायमस्वरूपी घरे देण्याच्या निर्णयाला मंजुरी देण्यात आली. मोदी सरकार ३.० ची ही पहिलीच कॅबिनेट बैठक होती. 

आमचे सरकार शेतकऱ्यांच्या हितासाठी पूर्णपणे कटिबद्ध आहे. त्यामुळे पदभार स्वीकारल्यानंतर स्वाक्षरी केलेली पहिली फाईल ही शेतकरी कल्याणाशी संबंधित आहे. - नरेंद्र मोदी, पंतप्रधान 

शेतकऱ्यांचे उत्पन्न दुप्पट करणारमोदींनी शेतकऱ्यांना त्यांचे उत्पन्न दुप्पट करण्याचे आश्वासन दिले होते. रब्बी आणि खरीप पिकांच्या किमान आधारभूत किमतीतही मोदी सरकार सातत्याने वाढ करत आहे. किसान सन्मान निधीचे प्रत्येकी २,००० रुपयांचे तीन हप्ते दरवर्षी शेतकऱ्यांना दिले जात आहेत. त्यावर केंद्र सरकार ६ हजार कोटी रुपये खर्च करत आहे. 

राष्ट्रपतींना संसदेचे अधिवेशन बोलावण्याची विनंतीमोदी मंत्रिमंडळाने राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांना संसदेचे अधिवेशन बोलावण्याची विनंती केली आहे. १८ जूनपासून संसदेचे अधिवेशन बोलावणे, १८ आणि १९ जून रोजी खासदारांचा शपथविधी आणि २० जून रोजी नवीन लोकसभा अध्यक्षांसाठी निवडणूक घेण्याबाबत चर्चा सुरू असल्याचे सरकारने म्हटले आहे. राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू २१ जून रोजी संसदेच्या संयुक्त बैठकीला संबोधित करू शकतात. 

 

टॅग्स :Narendra Modiनरेंद्र मोदीCentral Governmentकेंद्र सरकारPM Kisan Schemeप्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजना