शहरं
Join us  
Trending Stories
1
श्रेयस अय्यरचं अर्धशतक, पंजाबकडून चेन्नईचा ५ विकेट्सनं पराभव, आयुषच्या मेहनतीवर फेरलं पाणी!
2
अफगाणिस्तानला भूकंपाचा भीषण धक्का; जम्मू-काश्मीर आणि दिल्लीतही जमीन हादरली
3
"ही वृत्ती संपुष्टात आणण्याची शिवसेनेची भूमिका"; अशोक खरातचे एकनाथ शिंदेंना फोनच्या दाव्यावर उदय सामंतांची प्रतिक्रिया
4
इराणने आमचे लढाऊ विमान पाडले, वैमानिकही बेपत्ता; अमेरिकेने दिली कबुली
5
Mumbai Indias: मुंबई इंडियन्सची ताकद वाढली, स्टार ऑलराउंडरची संघात एन्ट्री, दिल्लीविरुद्ध खेळण्याची शक्यता!
6
Ashok Kharat Case : भोंदूबाबा खरातचा 'महाप्रताप'! भक्तांच्याच नावे उघडली १०० बोगस खाती; 'समता' आणि 'जयदंबा' पतसंस्था रडारवर
7
'फोनवर संभाषण झाले म्हणून वरिष्ठ मंत्र्यांवर आरोप करणे योग्य नाही';अंजली दमानियांच्या आरोपांवर दीपक केसरकरांचे प्रत्युत्तर
8
धुळे-सोलापूर महामार्गावर प्रचंड वाहतूक कोंडी; ७ तासांपासून वाहने खोळंबली, नागरिकांचे हाल
9
ज्याची भीती तेच घडलं, युद्ध आणखी पेटलं; इराणच्या सर्वात मोठ्या ब्रिजवर हल्ला, ८ मृत्यू ९५ जखमी
10
IPL 2026: ५ षटकार, ६ चौकार, १६९.७७ चा स्ट्राईक रेट; पंजाबविरुद्ध आयुष म्हात्रेची विस्फोटक इनिंग!
11
US Israel Iran War : इराणचा यू-टर्न! आधी म्हणालं 'वैमानिक ताब्यात', आता शोधण्यासाठी बक्षीस; अमेरिकेच्या पायलटबाबत सस्पेन्स
12
IPL 2026: रोहित शर्माचा फिटनेस तर बघा, चक्क एका हातानं पकडला झेल, व्हिडीओ व्हायरल
13
India Oil Supply News: भारतासाठी 'संजीवनी' ठरला हा छोटा देश; युद्ध असो की संकट, अविरत करतोय तेल अन् गॅस पुरवठा
14
"आणखी थोडा वेळ मिळाला, तर अमेरिका सहज होर्मुझ सामुद्रधुनी...", डोनाल्ड ट्रम्प यांचे इराणची चिंता वाढवणार विधान
15
म्हाडाचं घर घ्यायचा विचार? फॉर्म किती रुपयांना, अनामत रक्कम किती भरावी लागणार?
16
US Israel Iran War : डोनाल्ड ट्रम्प यांना विरोध केल्याचे फळ! इराणने उघडला फ्रान्ससाठी होर्मुझचा रस्ता; मॅक्रॉन यांना खास 'बक्षीस'
17
IPL 2026: चेन्नईच्या संघात एक मोठा बदल; कोण इन, कोण आउट? पाहा दोन्ही संघाची प्लेईंन इलेव्हन
18
MS Dhoni: सीएसकेच्या चाहत्यांसाठी गूड न्यूज? ट्रेनिंग सेशनसाठी धोनी मैदानात, पण खेळण्याबाबत सस्पेन्स कायम
19
फक्त एका दिवसासाठी अमेरिकेतून युवक भारतात आला; ताजमहाल पाहून निघून गेला, Video व्हायरल
20
Latest Marathi News LIVE Updates: अमेरिकेला पुन्हा झटका! इराणने दुसरे एफ-३५ लढाऊ विमान पाडले
Daily Top 2Weekly Top 5

पंतप्रधान, आपल्याच शेतकऱ्यांशी युद्ध?; दिल्लीच्या सीमांवरील प्रवेशबंदी पाहून राहुल-प्रियंका गांधींचा सवाल

By जयदीप दाभोळकर | Updated: February 2, 2021 12:39 IST

सीमांवर पोलिसांकडून बॅरिकेडिंग, रस्त्यांवर खिळेही ठोकले

ठळक मुद्देसीमांवर पोलिसांकडून बॅरिकेडिंग, रस्त्यांवर खिळेही ठोकले६ फेब्रुवारी रोजी शेतकऱ्यांच्या चक्का जामचा इशारा

गेल्या दोन महिन्यांपासून दिल्लीच्या निरनिराळ्या सीमांवर नव्या कृषी कायद्यांच्या विरोधात शेतकऱ्यांचं आंदोलन सुरू आहे. दरम्यान, प्रजासत्ताक दिनी शेतकऱ्यांनी काढलेल्या ट्रॅक्टर रॅलीलाही हिंसक वळण लागल्याचं पाहायला मिळालं होतं. त्या घटनेनंतर सरकारही आंदोलकांचा कठोरपणे सामना करण्याची तयारी करण्याच्या तयारीत दिसत आहे. दिल्लीच्या सीमांवर आंदोलकांना रोखण्यासाठी पोलिसांद्वारे अनेक पावलं उचलण्यात येत आहेत. यावरून काँग्रेसचे नेते राहुल गांधी आणि प्रियंका गांधी यांनी सरकारवर निशाणा साधला आहे.काँग्रेसचे नेते राहुल गांधी यांनी दिल्लीच्या सीमांवर पोलिसांद्वारे करण्यात येत असलेल्या तयारीची काही छायाचित्र आपल्या ट्विटर अकाऊंटवरू शेअर केली आहे. "भारत सरकार, भिंती उभारू नका, पूल उभारा," असं कॅप्शनही त्यांनी या फोटोंना दिलं आहे. तर दुसरीकडे काँग्रेसच्या महासचिव प्रियंका गांधी यांनीदेखील एक व्हिडीओ शेअर करत सरकारवर निशाणा साधला आहे. तसंच पंतप्रधान महोदय, आपल्याच शेतकऱ्यांशी युद्ध? असं कॅप्शनही त्यांनी त्याला दिलं आहे.  प्रजासत्ताक दिनी दिल्लीत झालेल्या हिंसाचारानंतर पोलिसांकडून सुरक्षा व्यवस्था अधिक मजबूत करण्यात येत आहे. अशातच ६ फेब्रुवारी रोजी शेतकऱ्यांनी अनेक ठिकाणी चक्का जाम करण्याचा इशारा दिला आहे. दिल्ली पोलिसांनी गाझीपूर, टिकरी आणि सिंघु सीमेवर या पार्श्वभूमीवर तयारी सुरू केली आहे. तसंच या ठिकाणी सीमांवर बॅरिकेडिंग करण्यात आली आहे. तसंच सीमेंटचेही मोठी बॅरिकेड्स तयार करण्यात आले आहेत. रस्त्यांवर खिळेही लावण्यात आले आहे. तसंच आंदोलकांचे ट्रॅक्टर पुढे जाऊ नयेत यासाठी तारांचाही वापर करण्यात येत आहे. राऊतांकडूनही टीका"दिल्लीपेक्षा भारत-चीन सीमेवरील रस्त्यांवर सळ्या लावल्या असत्या, खिळे ठोकले असते, तर चीनी भारतात घुसले नसते, असा चिमटा राऊत यांनी केंद्र सरकारला काढला. शेतकऱ्यांच्या ट्रॅक्टर रॅलीत तिरंग्याचा अपमान झाल्याचा मुद्दा भाजपकडून वारंवार उपस्थित करण्यात येतो. त्यालाही राऊत यांनी प्रत्युत्तर दिलं. 'आम्ही शेतकऱ्यांची भेट घेणार आहोत. महाविकास आघाडीचं सरकार तुमच्या पाठिशी असल्याचा विश्वास आम्ही शेतकरी नेते राकेश टिकैत यांना देऊ. शेतकरी केवळ स्वत:साठीच नाही, तर आपल्यासाठीही आंदोलन करत आहेत. त्यांच्या लढ्याला बळ देणं हे आम्ही आमचं कर्तव्य समजतो. हाच तिरंग्याचा सन्मान आहे," असं राऊत म्हणाले.

टॅग्स :Farmer strikeशेतकरी संपFarmerशेतकरीdelhiदिल्लीPoliceपोलिसcongressकाँग्रेसRahul Gandhiराहुल गांधीPriyanka Gandhiप्रियंका गांधी