शहरं
Join us  
Trending Stories
1
‘पीओके’मधील दहशतवादी नेटवर्कवर भारत करणार प्रहार; उच्चस्तरीय विचारविनिमय सुरू; ४२ सक्रिय दहशतवादी तळ केंद्राच्या रडारवर
2
आजचे राशीभविष्य, २९ एप्रिल २०२५: सार्वजनिक क्षेत्रात मानहानी होण्याची शक्यता
3
तीन देशांत एकाच वेळी वीज गायब; सर्व काही थांबले; देशभरातील वाहतूक सिग्नलवर परिणाम
4
१६ पाकिस्तानी यूट्युब चॅनेलवर सरकारची बंदी; केंद्रीय गृहमंत्रालयाच्या शिफारशींनुसार बंदी
5
त्यांची जबाबदारी माझ्यावर होती, मी माफी कशी मागू, शब्द नाहीत; मुख्यमंत्री ओमर अब्दुल्ला यांनी दिली कबुली
6
नौदलाच्या ताफ्यात येणार फ्रान्सची २६ राफेल विमाने; ६४ हजार कोटींच्या खरेदी करारावर देशांच्या स्वाक्षऱ्या
7
गूढ कायम.. खरं, खोट्याचा होईना उलगडा; डॉ. वळसंगकरांच्या आत्महत्येला दहा दिवस ओलांडले
8
‘म्हाडा’चे ५ हजार घरांचे दिवाळी गिफ्ट; जुन्या इमारतीचाही पुनर्विकास होणार
9
१९ चाळींचा पुनर्विकास एमएमआरडीए करणार; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत महत्त्वपूर्ण निर्णय
10
‘लिव्ह इन’, उत्तराखंड आणि समान नागरी संहिता
11
बुलेट ट्रेन २०२८ अखेरीस मुंबईतून धावणार सुसाट, नवी मुंबई विमानतळ गेम चेंजर ; मुख्यमंत्री फडणवीस
12
मुलांचा ताबा देताना धर्म विचारात घेतला जाऊ शकत नाही : हायकोर्ट
13
कान टोचले, बरे झाले ! केंद्राने विशेष पत्रक काढून माध्यमांना काही मार्गदर्शक सूचना दिल्या
14
पाण्यासाठी भारत-पाक युद्ध पेटण्याची वेळ येऊन ठेपली ?
15
मोठमोठे रस्ते बांधत आहात, इकडे लाेकांचा जीव जाताेय; जखमींवर कॅशलेस उपचारांवरून सर्वाेच्च न्यायालयाने केंद्राला फटकारले
16
'भारतीय सैन्य कधीही हल्ला करू शकते...', पाकिस्तानी संरक्षण मंत्र्याने व्यक्त केली भीती
17
बोगस डॉक्टरांविरोधात प्रशासनाने कसली कंबर; तालुकापातळीवरही समिती सक्षम होणार!
18
जिल्हा पोलिस दलातील सांगलीच्या सहा जणांना महासंचालक सन्मानचिन्ह; १ मे रोजी प्रदान सोहळा

पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या आई हीराबेन यांची प्रकृती बिघडली, अहमदाबादमधील रुग्णालयात उपचार सुरू 

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 28, 2022 13:53 IST

PM Narendra Modi's mother Heeraben Modi: पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची आई हीराबेन यांची प्रकृती बिघडल्याने त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. हीराबेन यांचं वय १०० वर्षांहून अधिक आहे.

अहमदाबाद - पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची आई हीराबेन यांची प्रकृती बिघडल्याने त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. हीराबेन यांचं वय १०० वर्षांहून अधिक आहे. त्यांनी याचवर्षी जून महिन्यात वयाची १०० वर्षे पूर्ण केली होती. तेव्हा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी त्यांची भेट घेऊन आशीर्वाद घेतले होते. नरेंद्र मोदी हे नियमितपणे आईच्या भेटीसाठी अहमदाबादमध्ये येत असतात. दरम्यान, त्यांची प्रकृती स्थिर असल्याची माहिती समोर येत आहे. 

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या आई हीराबेन यांच्यावर अहमदाबादमधील यू. एन. मेहता रुग्मालयात उपचार सुरू आहेत. त्यांची प्रकृती स्थिर असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे.  हल्लीच झालेल्या गुजरात विधानसभा निवडणुकीवेळी नरेंद्र मोदी यांनी गुजरात दौऱ्यावर असताना आईची भेट घेतली होती. अहमदाबाद विमानतळावर उतरल्यावर ते गांधीनगरमध्ये भेटण्यासाठी घरी गेले होते. तसेच त्यांचा आशीर्वाद घेतला होता.  

दरम्यान, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे भाऊ प्रल्हाद मोदी हे कालच एका अपघातात जखमी झाले होते. प्रल्हाद मोदी हे एका कार अपघातात जखमी झाले होते. कर्नाटकातील म्हैसूरजवळील कडकोला येथे त्यांच्या कारचा अपघात झाला होता. यावेळी प्रल्हाद मोदींसोबत त्यांचे कुटुंबीय होते. या अपघातात सर्वजण जखमी झाले आहेत. मंगळवारी दुपारी हा अपघात झाला होता.

टॅग्स :Narendra Modiनरेंद्र मोदीFamilyपरिवारGujaratगुजरात