पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या आई हीराबेन यांची प्रकृती बिघडली, अहमदाबादमधील रुग्णालयात उपचार सुरू
By ऑनलाइन लोकमत | Updated: December 28, 2022 13:53 IST2022-12-28T13:47:01+5:302022-12-28T13:53:14+5:30
PM Narendra Modi's mother Heeraben Modi: पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची आई हीराबेन यांची प्रकृती बिघडल्याने त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. हीराबेन यांचं वय १०० वर्षांहून अधिक आहे.

पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या आई हीराबेन यांची प्रकृती बिघडली, अहमदाबादमधील रुग्णालयात उपचार सुरू
अहमदाबाद - पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची आई हीराबेन यांची प्रकृती बिघडल्याने त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. हीराबेन यांचं वय १०० वर्षांहून अधिक आहे. त्यांनी याचवर्षी जून महिन्यात वयाची १०० वर्षे पूर्ण केली होती. तेव्हा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी त्यांची भेट घेऊन आशीर्वाद घेतले होते. नरेंद्र मोदी हे नियमितपणे आईच्या भेटीसाठी अहमदाबादमध्ये येत असतात. दरम्यान, त्यांची प्रकृती स्थिर असल्याची माहिती समोर येत आहे.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या आई हीराबेन यांच्यावर अहमदाबादमधील यू. एन. मेहता रुग्मालयात उपचार सुरू आहेत. त्यांची प्रकृती स्थिर असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. हल्लीच झालेल्या गुजरात विधानसभा निवडणुकीवेळी नरेंद्र मोदी यांनी गुजरात दौऱ्यावर असताना आईची भेट घेतली होती. अहमदाबाद विमानतळावर उतरल्यावर ते गांधीनगरमध्ये भेटण्यासाठी घरी गेले होते. तसेच त्यांचा आशीर्वाद घेतला होता.
दरम्यान, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे भाऊ प्रल्हाद मोदी हे कालच एका अपघातात जखमी झाले होते. प्रल्हाद मोदी हे एका कार अपघातात जखमी झाले होते. कर्नाटकातील म्हैसूरजवळील कडकोला येथे त्यांच्या कारचा अपघात झाला होता. यावेळी प्रल्हाद मोदींसोबत त्यांचे कुटुंबीय होते. या अपघातात सर्वजण जखमी झाले आहेत. मंगळवारी दुपारी हा अपघात झाला होता.