पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हत्येचा कट, सोलापुरातून एकास अटक ?

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 25, 2018 06:45 IST2018-06-24T21:50:33+5:302018-06-25T06:45:05+5:30

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हत्येचा कटातील संशियत एकास दिल्ली पोलिसांनी सोलापूरातून एकास अटक केली आहे.

Prime Minister Narendra Modi's assassination plot, one arrested from Solapur? | पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हत्येचा कट, सोलापुरातून एकास अटक ?

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हत्येचा कट, सोलापुरातून एकास अटक ?

- आप्पासाहेब पाटील
सोलापूर - देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हत्येचा कटातील संशियत एकास दिल्ली पोलिसांनी सोलापूरातून एकास अटक केली आहे. या घटनेबाबत सोलापूर पोलिसांकडुन दुजोरा मिळत नसला तरी भाजपचे माजी जिल्हाध्यक्ष शंकरराव वाघमारे यांनी फेसबुक वर पोस्ट केलेल्या मजकूरामुळे एकच खळबळ उडाली आहे. 

याबाबत भाजपचे माजी जिल्हाध्यक्ष शंकरराव वाघमारे यांच्याशी संपर्क केला असता त्यांनी अशी माहिती दिली की, ते म्हणाले की पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हत्येचा कटातील एक जण सोलापूर जिल्ह्यातील टेंभुर्णी परिसरातील एका गावात राहत असल्याची माहितीवरून दिल्ली पोलिसांनी त्या राजगुरू नामक व्यक्तीचा शोध घेऊन त्याच्यावर पाळत ठेवत होते. त्या दरम्यान त्यावर संशय आल्यामुळे त्यास दिल्ली पोलिसांनी ताब्यात घेऊन दिल्ली ला नेल्याचे त्यांनी सांगितले.  बापू कुबेर राजगुरू वय 25 असे आहे ताब्यात घेतलेल्या संशियत व्यक्तीचे नाव असल्याचे वृत्त आहे. या प्रकरणाचा तपास करण्यासाठी दिल्लीहुन पाच जणांची टीम सोलापुरात दाखल झाली होती. 

Web Title: Prime Minister Narendra Modi's assassination plot, one arrested from Solapur?

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.