पंतप्रधान मोदींनी लिहिले ‘गरबा’ गाणे; दुर्गादेवीच्या शक्तीचे वर्णन, सोशल मीडियावर केले शेअर

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 8, 2024 06:07 IST2024-10-08T06:04:10+5:302024-10-08T06:07:27+5:30

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सोमवारी सोशल मीडिया प्लॅटफॉर्म ‘एक्स’वर एक ‘गरबा’ गाणे शेअर केले.

prime minister narendra modi wrote a garba song | पंतप्रधान मोदींनी लिहिले ‘गरबा’ गाणे; दुर्गादेवीच्या शक्तीचे वर्णन, सोशल मीडियावर केले शेअर

पंतप्रधान मोदींनी लिहिले ‘गरबा’ गाणे; दुर्गादेवीच्या शक्तीचे वर्णन, सोशल मीडियावर केले शेअर

लोकमत न्यूज नेटवर्क, नवी दिल्ली : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सोमवारी सोशल मीडिया प्लॅटफॉर्म ‘एक्स’वर एक ‘गरबा’ गाणे शेअर केले. हे गाणे त्यांनी स्वतः दुर्गादेवीसाठी लिहिले आहे. 

मोदींनी ‘एक्स’ वर लिहिले की, “दुर्गादेवीच्या भक्तीशी संबंधित लोक नवरात्रीच्या दरम्यान वेगवेगळ्या प्रकारे उत्सव साजरा करत आहेत. या श्रद्धेच्या आणि आनंदाच्या भावनेने, ‘आवती कलाय’ गरबा लिहिला आहे. हा गरबा मी दुर्गादेवीच्या शक्तीबद्दल लिहिला आहे. देवीचे आशीर्वाद सदैव आपल्यासोबत असावेत. गरबा गाणे आणि त्याच्या मधुर सादरीकरणाबद्दल त्यांनी गायिकेचे आभार मानले. गरबा हे एक पारंपरिक गुजराती नृत्य असून, ते नवरात्रोत्सवात सादर केले जाते.

Web Title: prime minister narendra modi wrote a garba song