Prime Minister Narendra Modi will guide the students on October 7 | पंतप्रधान नरेंद्र मोदी येत्या ७ ऑक्टोबरला करणार विद्यार्थ्यांना मार्गदर्शन ​​​​​​​

पंतप्रधान नरेंद्र मोदी येत्या ७ ऑक्टोबरला करणार विद्यार्थ्यांना मार्गदर्शन ​​​​​​​

पुणे - डेक्कन एज्युकेशन सोसायटी (डीईएस) व सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या वतीने येत्या ७ ऑक्टोबर रोजी आयोजित करण्यात आलेल्या वेबिनारमध्ये देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी मार्गदर्शन करणार आहेत. डीईएसच्या सर्व आजी-माजी विद्यार्थ्यांनी या वेबिनार मध्ये सहभागी व्हावे,असे आवाहन डीईएसच्या नियामक मंडळाचे अध्यक्ष शरद कुंटे यांनी केले आहे.

पंतप्रधान नरेंद्र मोदी नवीन शैक्षणिक धोरण व आत्मनिर्भर भारत या विषयावर ७ ऑक्टोबर रोजी दुपारी ४.३० ते ५.३० या वेळेत मार्गदर्शन करणार आहेत. तत्पूर्वी या विषयावर एक तास आधी चर्चासत्र आयोजित केले जाणार आहे.डीईएस संस्थेवर प्रेम करणा-या सर्वांनी या वेबिनार मध्ये सहभागी व्हावे, असेही कुंटे यांनी सांगितले.

कुंटे म्हणाले, लोकमान्य टिळक यांच्या स्मृती शताब्दी निमित्त १ ऑक्टोबर रोजी डीईएसतर्फे आयोजित कार्यक्रमास देशाचे गृहमंत्री अमित शहा उपस्थित होते. त्यांनी डीईएसच्या कार्यक्रमास पंतप्रधान नरेंद्र मोदी संबोधित करतील, असे बोलून दाखविले.त्यानंतर येत्या ७ ऑक्टोबर रोजी कार्यक्रमास पंतप्रधान कार्यालयाकडून तोंडी संमती मिळाली.तसेच अमित शहा यांनी सुद्धा पंतप्रधान यांनी डीईएसच्या कार्यक्रमास वेळ दिल्याचे सांगितले. त्यानुसार संस्थेतर्फे या कार्यक्रमाची तयारी केली जात आहे.

वाचकहो, 'लोकमत'ला टेलिग्रामवर फॉलो करताय ना?... अजून जॉईन केलं नसेल तर क्लिक करा ( @LokmatNews ) आणि मिळवा महत्त्वाचे अपडेट्स अन् ताज्या बातम्या!

Web Title: Prime Minister Narendra Modi will guide the students on October 7

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.