पंतप्रधान नरेंद्र मोदीच सर्वात मोठे दहशतवादी; नॅशनल कॉन्फरन्सचे आमदार बरळले

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 9, 2018 14:16 IST2018-08-09T13:54:27+5:302018-08-09T14:16:38+5:30

भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी हे सर्वात मोठे दहशतवादी आणि मानवतेचे खुनी आहेत असे वक्तव्य नॅशनल कॉन्फ्रन्सच्या आमदाराने केले.

Prime Minister Narendra Modi is the biggest terrorist; National Conference MLAs got bogged down | पंतप्रधान नरेंद्र मोदीच सर्वात मोठे दहशतवादी; नॅशनल कॉन्फरन्सचे आमदार बरळले

पंतप्रधान नरेंद्र मोदीच सर्वात मोठे दहशतवादी; नॅशनल कॉन्फरन्सचे आमदार बरळले

श्रीनगर - भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी हे सर्वात मोठे दहशतवादी आणि मानवतेचे खुनी असल्याचे वक्तव्य नॅशनल कॉन्फ्रन्सच्या आमदाराने केले आहे. नॅशनल कॉन्फ्रन्सचे आमदार जावेद राणा यांनी  जम्मूमधील पुंछ परिसरात एका सभेल संबोधित करताना हे वक्तव्य केले आहे. 
जावेद राणा यांच्या या वक्तव्याचा व्हिडिओ व्हायरल झाला असून, या व्हिडिओमध्ये जावेद राणा हे मोदींवर जोरदार टीका करताना दिसत आहेत. "आम्हाला अतिरेकी आणि दहशवादी म्हटले जाते, पण सर्वात मोठा दहशतवादी आणि मानवतेचा हत्यारा भारताचा पंतप्रधान बनला आहे," असे जावेद राणा यांनी म्हटले आहे. दरम्यान, राणा यांच्या या वक्तव्यामुळे राजकीय वाद पेटण्याची शक्यता आहे.  



 

Web Title: Prime Minister Narendra Modi is the biggest terrorist; National Conference MLAs got bogged down