शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणनं अमेरिकेची नाकाबंदी तोडली, नाकाखालून घेऊन गेला ३४ टँकर्स; ९० कोटी डॉलर्सचं तेल 'होर्मुज'बाहेर! असा दिला चकमा
2
उकाड्याने हैराण पुण्यात अचानक पावसाचा वर्षाव; स्वारगेट, शास्त्री रोड परिसरात मध्यम सरी
3
LSG vs RR :अवघ्या ११ धावांत पंतसह तिघांच्या पदरी भोपळा! बडोनीनं स्वतःच्या पायावर मारून घेतली कुऱ्हाड
4
खर्गे मोदींना म्हणाले 'दहशतवादी'; निवडणूक आयोगाची मोठी कारवाई, २४ तासांत मागवलं उत्तर
5
एव्हीएशन सेक्टरमध्ये हाहाकार! या विमान कंपनीने अचानक २०,००० विमानफेऱ्या रद्द केल्या; एवढे काय घडले...?
6
Vaibhav Suryavanshi Fastest 500 : छोट्याखानी खेळीत महारेकॉर्ड! वैभव सूर्यवंशीनं रचला इतिहास
7
मालेगाव बॉम्बस्फोट खटल्यात मोठा निकाल; पुराव्याअभावी ४ आरोपींची निर्दोष मुक्तता!
8
LSG vs RR : शमीचा जलवा! यशस्वीपाठोपाठ ध्रुव जुरेल ठरला झिरो! लगेच संजीव गोएंकांनी काढला फोटो
9
प्रियकर मुलीच्या खोलीतून निघाला; चिडलेल्या बापाने पोटच्या १७ वर्षीय मुलीला संपवले
10
इराण-अमेरिका युद्धाचा फटका आता थेट 'फॅमिली प्लॅनिंग'ला! ३० टक्क्यांपर्यंत वाढू शकतात कंडोम्सचे भाव
11
उल्हासनगर महापालिकेत 'डम्पिंग'वरून रणकंदन; भाजप नगरसेवकांचे ठिय्या आंदोलन
12
कल्याणमध्ये ७० हजार रुपयांचा सायबर क्राईम : हेल्पलाईन तक्रार करुन दाद नाही
13
पाकिस्तानमधून इराणमध्ये दहशतवादी घुसले! रास्क सीमेवर मोठी चकमक; १२ दहशतवादी ठार
14
ममता बॅनर्जींचा हस्तक्षेप लोकशाहीसाठी धोकादायक! आयपॅक-ईडी कारवाईवरून सर्वोच्च न्यायालयाचे ताशेरे
15
WhatsApp वापरता? मग 'हे' सेटिंग्ज माहीतच हवेत; ९०% लोक अजूनही वापरतच नाहीत!
16
Top Marathi News LIVE Updates: बुलढाणा: उपसरपंचाच्या कुटुंबावर हल्ला; पत्नीला विष पाजल्याचा आरोप
17
टी-२० इंटरनॅशनलमध्ये या विक्रमाची केवळ बरोबरीच होऊ शकते; मोडणं अशक्य! केवळ २ गोलंदाजांनाच जमलाय हा अद्भुत चमत्कार
18
हवाई प्रवास स्वस्त होणार? विमानाच्या इंधनात इथेनॉल मिश्रणास केंद्राची मंजुरी...
19
न्युड व्हिडिओ व्हायरल प्रकरण: "माझे करिअर खराब होईल, मला माफ करा", उजेरने १६ वर्षाच्या मुलीचा पुन्हा सुरू केला होता छळ
20
तीन राज्यांत काँग्रेसची दाणादाण? किती जागा मिळणार? अमित शाह यांची मोठी भविष्यवाणी; एका राज्यात तर...!
Daily Top 2Weekly Top 5

आदिवासी मंत्र्यांचा सरकारवर दबाव

By admin | Updated: July 29, 2014 02:45 IST

अ‍ॅड. चिंतामण वनगा यांच्या शिष्टमंडळाने राष्ट्रपती प्रणव मुखर्जी व काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी यांची भेट घेऊन आपले म्हणणे मांडले.

नवी दिल्ली : राज्य सरकारने धनगर समाजास अनुसूचित जमातीच्या सवलती देऊ नये, यासाठी आदिवासी विकास मंत्री मधुकर पिचड, क्रीडा- युवक कल्याण मंत्री पद्माकर वळवी व समाजकल्याण मंत्री शिवाजीराव मोघे या तीन आदिवासी मंत्र्यांनी सरकारवर दबाव वाढविला असून आज त्यांनी राष्ट्रपतींसह काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी यांची भेट घेतली.धनगर समाजाला सवलती देण्यास राज्यातील आदिवासींचा तीव्र विरोध आहे. त्यासाठी राज्यभर त्यांचे आंदोलनही सुरू आहे. यासंदर्भात सोमवारी पिचड, मोघे, वळवी या तीन मंत्र्यासह विधानसभेचे उपसभापती पुरके व भाजपा खासदार हरिचंद्र चव्हाण, अ‍ॅड. चिंतामण वनगा यांच्या शिष्टमंडळाने राष्ट्रपती प्रणव मुखर्जी व काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी यांची भेट घेऊन आपले म्हणणे मांडले. या संदर्भात शिष्टमंडळातील नेत्यांनी सांगितले, की राज्यातील सर्वपक्षीय आदिवासी नेते या मुद्यावर एकत्रित येत असून, कोणत्याही स्थितीत आदिवासी समाजावर धनगर समाजाचा बोजा आम्ही खपवून घेणार नाही. त्यांना आदिवासी ठरवू नका. सध्या जे आंदोलन महाराष्ट्रात पेटले आहे. ते राजकारणाने प्रेरित आहे. सरकार आंदोलनाच्या दबावाखाली झुकून जात बदलवणार असेल, तर आम्हीही स्वस्थ बसणार नाही. आधीच धनगर समाजाला ३.५ टक्के आरक्षण दिले आहे. धनगर समाजाने आतापर्यंत आदिवासींच्या लाखभर नोकऱ्या बळकावल्या आहेत. त्यामुळे आता महाराष्ट्रात धनगरांप्रमाणे मराठ्यांनाही आदिवासी जमातीचे आरक्षण द्यावे का, असा उपरोधीक टोलाही पिचड यांनी मारला. (विशेष प्रतिनिधी)