काँग्रेसची कार्यकर्ती, वरपर्यंत ओळख असल्याचं सांगून आणायची प्रेमासाठी दबाव, त्रस्त पोलीस इन्स्पेक्टरची महिलेविरोधात तक्रार

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 17, 2025 16:01 IST2025-12-17T15:54:34+5:302025-12-17T16:01:05+5:30

Karnataka Crime News: कर्नाटकमधून एक अजब प्रकरण समोर आलं आहे. येथे एका महिलेने आपण काँग्रेसची कार्यकर्ती असल्याची आणि बड्या नेत्यांपर्यंत ओळख असल्याची बतावणी करत एका पोलीस इन्स्पेक्टरवर प्रेमसंबंध ठेवण्यासाठी दबाव आणल्याचे उघडकीस आले आहे.

Pressure for love, threat to end life and..., distressed police inspector files complaint against woman | काँग्रेसची कार्यकर्ती, वरपर्यंत ओळख असल्याचं सांगून आणायची प्रेमासाठी दबाव, त्रस्त पोलीस इन्स्पेक्टरची महिलेविरोधात तक्रार

काँग्रेसची कार्यकर्ती, वरपर्यंत ओळख असल्याचं सांगून आणायची प्रेमासाठी दबाव, त्रस्त पोलीस इन्स्पेक्टरची महिलेविरोधात तक्रार

कर्नाटकमधून एक अजब प्रकरण समोर आलं आहे. येथे एका महिलेने आपण काँग्रेसची कार्यकर्ती असल्याची आणि बड्या नेत्यांपर्यंत ओळख असल्याची बतावणी करत एका पोलीस इन्स्पेक्टरवर प्रेमसंबंध ठेवण्यासाठी दबाव आणल्याचे उघडकीस आले आहे. एवढंच नाही तर ही महिला आपल्यासोबत संबंध न ठेवल्यास जीवन संपवण्याची धमकीही द्यायची. या प्रकरणी पोलीस इन्स्पेक्टरने सदर महिलेवर सरकारी कामात अडथळा आणल्याची आणि जीवन संपवण्याची धमकी देत दबाव आणल्याची तक्रार दिली आहे आहे.

ही घटना बंगळुरूमधील राममूर्तीनगर पोलीस ठाण्यामधील आहे. येथे तैनात असलेल्या एका पोलीस इन्स्पेक्टरने एका महिलेवर हे गंभीर आरोप केले आहेत. सदर  महिला सातत्याने प्रेमासाठी दबाव आणत होती. तसेच आपण काँग्रेसची कार्यकर्ती असून, आपल्या वरपर्यंत ओळखी असल्याचे सांगत दबाव आणण्याचा प्रयत्न करायची. तसेच जीवन संपवण्याच्या धमक्या द्यायची, अशी तक्रार या पोलीस इन्स्पेक्टरने केली आहे. या महिलेने सातत्याने आपल्याला त्रास दिला. तसेच धमकावण्याचा, धाबरवण्याचा प्रयत्न केला, तसेच आपल्या सरकारी कामात अडथळे आणण्याचा प्रयत्न केला, असा आरोपही सदर पोलीस इन्स्पेक्टरने केला आहे.

पोलीस इन्स्पेक्टरने दिलेल्या तक्रारीमधील महिलेची ओळख संजना उर्फ वानजा हिच्या रूपात पटली आहे. सदर महिला या पोलीस इन्स्पेक्टरला त्यांच्या अधिकृत मोबाईल क्रमांकावर वारंवार फोन करायची तसेच व्हॉट्सअॅप मेसेज पाठवायची. तसेच त्यामधून तिचं प्रेम व्यक्त करायची आणि वैयक्तिक संबंध ठेवण्यासाठी दबाव आणायची. दरम्यान, हा क्रमांक जनसेवा आणि अधिकृत कामांसाठी असल्याचं या पोलीस इन्स्पेक्टरने सदर महिलेला सांगितलं होतं. तरीही ती या क्रमांकावर वेगवेगळ्या मोबाईल नंबवरवरून फोन करायची.

एवढंच नाही तर ही महिला आपण काँग्रेसची कार्यकर्ती असून, आपल्या वरपर्यंत ओखळी असल्याचा दावा करायची. तसेच काही नेत्यांसोबतचे आपले फोटो पाठवून आपली वरपर्यंत असलेली पोहोच, दाखवून द्यायचा प्रयत्न करायची.   ही महिला एका पोलीस ठाण्यातही आली होती. तिथे तिने काही भेटवस्तू ठेवल्या होत्या. तर एकदा जीवन संपवण्याची धमकी देणारे पत्र आणि अँडी डिप्रेशनच्या गोळ्याही ठेवल्या होत्या. त्यानंतर या महिलेने पोलीस ठाण्यात गोंधळ घातला होता. तसेच सदर इन्स्पेक्टरची प्रतिमा मलिन करण्याची धमकी दिली होती. या प्रकरणी आता पोलिसांनी गुन्हा दाखल केला असून, वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांना याबाबत कल्पना दिली आहे.    

Web Title : कर्नाटक: प्यार के लिए पुलिसकर्मी परेशान, आत्महत्या की धमकी; शिकायत दर्ज।

Web Summary : कर्नाटक में एक महिला द्वारा प्रेम संबंध के लिए दबाव डालने पर एक पुलिस अधिकारी ने शिकायत दर्ज कराई। महिला ने राजनीतिक संबंध होने का दावा करते हुए आत्महत्या की धमकी दी और उसके काम में बाधा डाली। पुलिस जांच कर रही है।

Web Title : Karnataka: Cop harassed for love, threatened suicide; files complaint.

Web Summary : A Karnataka policer officer filed a complaint against a woman pressuring him for relationship. The woman, claiming political connections, threatened suicide and disrupted his work. Police are investigating.

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.