शहरं
Join us  
Trending Stories
1
‘पीओके’मधील दहशतवादी नेटवर्कवर भारत करणार प्रहार; उच्चस्तरीय विचारविनिमय सुरू; ४२ सक्रिय दहशतवादी तळ केंद्राच्या रडारवर
2
नौदलाच्या ताफ्यात येणार फ्रान्सची २६ राफेल विमाने; ६४ हजार कोटींच्या खरेदी करारावर देशांच्या स्वाक्षऱ्या
3
गूढ कायम.. खरं, खोट्याचा होईना उलगडा; डॉ. वळसंगकरांच्या आत्महत्येला दहा दिवस ओलांडले
4
‘म्हाडा’चे ५ हजार घरांचे दिवाळी गिफ्ट; जुन्या इमारतीचाही पुनर्विकास होणार
5
१९ चाळींचा पुनर्विकास एमएमआरडीए करणार; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत महत्त्वपूर्ण निर्णय
6
‘लिव्ह इन’, उत्तराखंड आणि समान नागरी संहिता
7
बुलेट ट्रेन २०२८ अखेरीस मुंबईतून धावणार सुसाट, नवी मुंबई विमानतळ गेम चेंजर ; मुख्यमंत्री फडणवीस
8
मुलांचा ताबा देताना धर्म विचारात घेतला जाऊ शकत नाही : हायकोर्ट
9
कान टोचले, बरे झाले ! केंद्राने विशेष पत्रक काढून माध्यमांना काही मार्गदर्शक सूचना दिल्या
10
पाण्यासाठी भारत-पाक युद्ध पेटण्याची वेळ येऊन ठेपली ?
11
मोठमोठे रस्ते बांधत आहात, इकडे लाेकांचा जीव जाताेय; जखमींवर कॅशलेस उपचारांवरून सर्वाेच्च न्यायालयाने केंद्राला फटकारले
12
'भारतीय सैन्य कधीही हल्ला करू शकते...', पाकिस्तानी संरक्षण मंत्र्याने व्यक्त केली भीती
13
बोगस डॉक्टरांविरोधात प्रशासनाने कसली कंबर; तालुकापातळीवरही समिती सक्षम होणार!
14
जिल्हा पोलिस दलातील सांगलीच्या सहा जणांना महासंचालक सन्मानचिन्ह; १ मे रोजी प्रदान सोहळा
15
हिवराच्या शेंगा खाल्ल्याने २६ मेंढ्यांचा मृत्यू; साताऱ्याजवळील फलटण तालुक्यातील घटना
16
RR vs GT : गिलचा कॅच सुटल्यावर बहिणीने मानले देवाचे आभार; तिची रिॲक्शन होतीये व्हायरल
17
पहलगाम हल्ल्याचा नवीन व्हिडिओ समोर; पर्यटकाच्या कॅमेऱ्यात कैद झाली संपूर्ण घटना, पाहा...
18
Padma Awards: क्रिकेटपटू आर अश्विनला पद्मश्री, हॉकीपटू श्रीजेशला पद्मभूषण; येथे पाहा संपूर्ण यादी!

President Election 2022: राष्ट्रपती निवडणुकीसाठी ममता बॅनर्जींचं शरद पवार, उद्धव ठाकरेंसह २२ नेत्यांना पत्र

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 4, 2022 19:08 IST

राष्ट्रपती निवडणूक जवळ आली आहे. त्याच पार्श्वभूमीवर पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी पुढाकार घेतला आहे.

नवी दिल्ली - राज्यसभेनंतर आता सर्वच राजकीय पक्षांचे लक्ष आगामी राष्ट्रपती निवडणुकीकडे लागले आहे. राष्ट्रपती निवडणुकीची घोषणा झाल्यानंतर मतांची जुळवाजुळव करण्यासाठी सत्ताधारी आणि विरोधक तयारीला लागलेत. आतापर्यंत सत्ताधारी एनडीएनं त्यांच्या उमेदवाराच्या नावाची घोषणा केली नाही. परंतु राष्ट्रपती निवडणुकीच्या दृष्टीने प्रभावी विरोध पक्षाची मूठ बांधण्यासाठी ममता बॅनर्जी यांनी पुढाकार घेतला आहे. राष्ट्रपती निवडणूक १८ जुलै रोजी होणार असून २१ जुलै रोजी मतदानाचा निकाल लागणार आहे. 

तृणमूल काँग्रेसनं म्हटलंय की, राष्ट्रपती निवडणूक जवळ आली आहे. त्याच पार्श्वभूमीवर पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी पुढाकार घेतला आहे. विरोधी पक्षांना एकत्र करण्यासाठी त्यांनी १५ जून रोजी दिल्लीत संयुक्त बैठकीचं आयोजन करत विरोधी पक्षातील मुख्यमंत्री आणि नेत्यांना पत्र पाठवलं आहे. त्यात दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल, केरळचे पिनाराई विजयन, ओडिशाचे नवीन पटनायक, तेलंगणाचे के चंद्रशेखर राव, तामिळनाडूचे एमके स्टालिन, महाराष्ट्राचे उद्धव ठाकरे, झारखंडचे हेमंत सोरेन, पंजाबचे भगवंत मान आणि काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधींसह २२ प्रमुख नेत्यांना पत्र पाठवलं आहे. 

या बैठकीला उपस्थित राहणाऱ्या नेत्यांची नावे१. अरविंद केजरीवाल (मुख्यमंत्री, दिल्ली)२. पिनाराई विजयन (मुख्यमंत्री, केरळ)३. नवीन पटनायक (मुख्यमंत्री, ओडिशा)४. कलवकुंतला चंद्रशेखर राव (मुख्यमंत्री, तेलंगणा)५. थिरु एमके स्टालिन (मुख्यमंत्री, तमिलनाडू)६. उद्धव ठाकरे (मुख्यमंत्री, महाराष्ट्र)७. हेमंत सोरेन (मुख्यमंत्री, झारखंड)८. भगवंत सिंह मान (मुख्यमंत्री, पंजाब)९. सोनिया गांधी (अध्यक्ष, कांग्रेस)१०. लालू प्रसाद यादव (अध्यक्ष, राजद)११. डी. राजा (महासचिव, भाकपा)१२. सीताराम येचुरी (महासचिव, सीपीआईएम)१३. अखिलेश यादव (अध्यक्ष, समाजवादी पार्टी)१४. शरद पवार (अध्यक्ष, राष्ट्रवादी)१५. जयंत चौधरी (राष्ट्रीय अध्यक्ष, रालोद)१६. एच. डी. कुमारस्वामी (कर्नाटकचे माजी मुख्यमंत्री)१७. एच डी देवेगौड़ा (खासदार, भारताचे माजी पंतप्रधान)१८. फारूक अब्दुल्ला (अध्यक्ष, जेकेएनसी)१९. महबूबा मुफ्ती (अध्यक्ष, पीडीपी)२०. एस सुखबीर सिंह बादल (अध्यक्ष, शिरोमणि अकाली दल)२१. पवन चामलिंग (अध्यक्ष, सिक्किम डेमोक्रेटिक फ्रंट)२२. के एम कादर मोहिदीन (अध्यक्ष, आईयूएमएल)

राष्ट्रपती निवडणूकीसाठी लागणाऱ्या मतांचे गणित समजून घ्याआजपर्यंत राज्यांमध्ये एकूण ४७९० आमदार आहेत. त्यांच्या मतांची किंमत ५.४ लाख (५,४२,३०६) आहे. खासदारांची संख्या ७६७ आहे ज्यांचे एकूण मत मूल्य देखील सुमारे ५.४ लाख (५,३६,९००) आहे. अशा प्रकारे राष्ट्रपती निवडणुकीसाठी एकूण मते अंदाजे १०.८ लाख (१०,७९,२०६) आहेत. राज्यातील लोकसंख्या आणि आमदारांच्या संख्येच्या आधारे आमदाराच्या मताचे मूल्य ठरविले जाते. खासदारांच्या मतांचे मूल्य आमदारांच्या एकूण मतांना लोकसभा आणि राज्यसभेतील खासदारांच्या संख्येने भागून ठरवले जाते. NDA कडे ५,२६,४२० मते आहेत. यूपीएकडे २,५९,८९२ मते आहेत. इतरांकडे (तृणमूल काँग्रेस, वायएसआरसीपी, बीजेडी, सपा आणि डावे) २,९२,८९४ मते आहेत. अशा परिस्थितीत जर विरोधकांनी एकत्र येत तगडा उमेदवार दिला तर राष्ट्रपती निवडणुकीत भाजपाला पराभवाचा सामना करावा लागू शकतो. 

टॅग्स :Uddhav Thackerayउद्धव ठाकरेMamata Banerjeeममता बॅनर्जीPresident Election 2022राष्ट्रपती निवडणूक 2022