शंभू अन् खनौरी सीमेवर सध्या तणावपूर्ण परिस्थिती; शेतकऱ्यांच्या वाटचालीवर सरकारचे लक्ष

By ऑनलाइन लोकमत | Published: February 22, 2024 12:35 PM2024-02-22T12:35:21+5:302024-02-22T12:47:18+5:30

दिल्लीचा मोर्चा दोन दिवस पुढे ढकलल्यानंतर आता शेतकऱ्यांच्या पुढील वाटचालीकडे सरकारचे लक्ष लागले आहे.

Presently tense situation on Shambhu and Khanauri border; Government's attention on the progress of farmers | शंभू अन् खनौरी सीमेवर सध्या तणावपूर्ण परिस्थिती; शेतकऱ्यांच्या वाटचालीवर सरकारचे लक्ष

शंभू अन् खनौरी सीमेवर सध्या तणावपूर्ण परिस्थिती; शेतकऱ्यांच्या वाटचालीवर सरकारचे लक्ष

नवी दिल्ली: सध्या शेतकऱ्यांनी 'चलो दिल्ली' मोर्चा दोन दिवसांसाठी पुढे ढकलला आहे. दरम्यान, भारतीय किसान युनियन आज हरियाणात दुपारी १२ ते २ या वेळेत महामार्गावर धडकणार आहे. 

भारतीय किसान युनियनचे अध्यक्ष गुरनाम सिंग चदुनी यांनी एक दिवस आधी ही घोषणा केली होती. दिल्लीचा मोर्चा दोन दिवस पुढे ढकलल्यानंतर आता शेतकऱ्यांच्या पुढील वाटचालीकडे सरकारचे लक्ष लागले आहे. शंभू आणि खनौरी सीमेवर सध्या तणावपूर्ण परिस्थिती आहे.

शेतकरी नेते सर्वनसिंह पंढेर यांनी बुधवारी सांगितले होते की, दिल्लीचा मोर्चा उद्यापासून दोन दिवसांसाठी पुढे ढकलण्यात आला आहे. आता आंदोलनाची पुढील रणनीती २३ फेब्रुवारीला ठरणार आहे. या दिवशी सायंकाळी पुढील रणनीतीबाबत माहिती दिली जाईल. यापूर्वी शेतकरी आणि सरकार यांच्यातील चर्चेची चौथी फेरी निष्फळ ठरली होती.

गजित सिंग डल्लेवाल यांची प्रकृती बिघडली-

शेतकरी आंदोलन २.० चा प्रमुख चेहरा म्हणून उदयास आलेले केंद्रीय नेते जगजित सिंग डल्लेवाल यांची बुधवारी संध्याकाळी अचानक प्रकृती बिघडली. त्यांना पटियाला येथील राजिंद्र हॉस्पिटलच्या इमर्जन्सी वॉर्डमध्ये दाखल करण्यात आले आहे. शंभू सीमेवर सुरक्षा दलाच्या जवानांनी गोळीबार केलेल्या अश्रुधुराच्या गोळ्यांमुळे डल्लेवाल यांना श्वास घेण्यास त्रास झाला आणि त्यांना रुग्णालयात दाखल करावे लागले, असा दावा शेतकऱ्यांनी केला आहे. त्यांनी छातीत जळजळ होत असल्याची तक्रार केली होती आणि त्यांना तापही येत होता. जगजीत सिंह डल्लेवाल हे भारतीय किसान युनियन एकता सिद्धपूरचे अध्यक्ष आहेत आणि सध्याच्या शेतकरी आंदोलनाचे नेतृत्व करत आहेत.

Web Title: Presently tense situation on Shambhu and Khanauri border; Government's attention on the progress of farmers

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.