शहरं
Join us  
Trending Stories
1
धुळे-सोलापूर महामार्गावर प्रचंड वाहतूक कोंडी; ७ तासांपासून वाहने खोळंबली, नागरिकांचे हाल
2
ज्याची भीती तेच घडलं, युद्ध आणखी पेटलं; इराणच्या सर्वात मोठ्या ब्रिजवर हल्ला, ८ मृत्यू ९५ जखमी
3
US Israel Iran War : इराणचा यू-टर्न! आधी म्हणालं 'वैमानिक ताब्यात', आता शोधण्यासाठी बक्षीस; अमेरिकेच्या पायलटबाबत सस्पेन्स
4
India Oil Supply News: भारतासाठी 'संजीवनी' ठरला हा छोटा देश; युद्ध असो की संकट, अविरत करतोय तेल अन् गॅस पुरवठा
5
"आणखी थोडा वेळ मिळाला, तर अमेरिका सहज होर्मुझ सामुद्रधुनी...", डोनाल्ड ट्रम्प यांचे इराणची चिंता वाढवणार विधान
6
म्हाडाचं घर घ्यायचा विचार? फॉर्म किती रुपयांना, अनामत रक्कम किती भरावी लागणार?
7
US Israel Iran War : डोनाल्ड ट्रम्प यांना विरोध केल्याचे फळ! इराणने उघडला फ्रान्ससाठी होर्मुझचा रस्ता; मॅक्रॉन यांना खास 'बक्षीस'
8
IPL 2026: चेन्नईच्या संघात एक मोठा बदल; कोण इन, कोण आउट? पाहा दोन्ही संघाची प्लेईंन इलेव्हन
9
MS Dhoni: सीएसकेच्या चाहत्यांसाठी गूड न्यूज? ट्रेनिंग सेशनसाठी धोनी मैदानात, पण खेळण्याबाबत सस्पेन्स कायम
10
फक्त एका दिवसासाठी अमेरिकेतून युवक भारतात आला; ताजमहाल पाहून निघून गेला, Video व्हायरल
11
Latest Marathi News LIVE Updates: अमेरिकेला पुन्हा झटका! इराणने दुसरे एफ-३५ लढाऊ विमान पाडले
12
जीवाशी खेळ! एक्स्पायरी डेट बदलून विकत होते कोल्ड ड्रिंक्स, बिस्किट; मोठ्या रॅकेटचा पर्दाफाश
13
Bhagwant Mann : "समोसा-पिझ्झाचा मुद्दा..."; राघव चड्ढांवर पंजाबचे मुख्यमंत्री भगवंत मान कडाडले, आतिशींचा गंभीर आरोप
14
'सिंधू' करार स्थगितीनंतर पाकिस्तानला आणखी एक धक्का! पुन्हा सुरू होतोय 'मोहरा प्रकल्प', जाणून घ्या
15
IPL 2026: चेन्नईला होतोय पश्चाताप! ज्याला संघातून काढलं, तोच खेळाडू दिल्लीसाठी ठरतोय मोठा जॅकपॉट
16
पाकव्याप्त काश्मीर लवकरच भारतात समाविष्ट होणार; AIIO चे मुख्य इमाम उमर इलियासी यांची भविष्यवाणी
17
युद्धभागात १०,००० हून अधिक कर्मचारी! टाटा समूहाच्या ३० कंपन्यांच्या सीईओंना तयार राहण्याचे आदेश
18
इराणमध्ये दिसली अमेरिकेची लढाऊ विमाने आणि हेलिकॉप्टर, कमी उंचीवर घिरट्या; व्हिडीओ आले समोर
19
इराणकडून आखाती देशांच्या तोंडचं पाणी पळवण्याची तयारी, पाणी आणि गॅस प्रकल्पांवर हल्ले, नव्या चालीमुळे खळबळ
20
SIP की एकरकमी गुंतवणूक? १ कोटींचा टप्पा गाठण्यासाठी सर्वात सोपा मार्ग कोणता? पाहा गणित
Daily Top 2Weekly Top 5

लष्कराकडून काश्मीरमधील दहशतवाद्यांच्या शेवटच्या ठिकाण्यावर वार करण्याची तयारी, शोपियाँमध्ये हालचाली वाढल्या

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 22, 2017 21:20 IST

काश्मीर खोऱ्यातील दहशतवाद्यांचे सर्वात सुरक्षित आश्रयस्थान म्हणून ओळखल्या जाणाऱ्या शोपियाँ परिसरावर चढाई करण्याची तयारी लष्कराकडून करण्यात येत आहे.

श्रीनगर - लष्कराने ऑपरेशन ऑलआऊट मोहिमेंतर्गत गेल्या काही महिन्यांमध्ये काश्मीरमधील दहशतवाद्यांविरोधात जोरदार आघाडी उघडली आहे. कारवाईमध्ये काश्मीर खोऱ्यात वावरणाऱ्या दहशतवाद्यांना शोधून शोधून कंठस्नान घालण्यात येत आहे. दरम्यान, काश्मीर खोऱ्यातील दहशतवाद्यांचे सर्वात सुरक्षित आश्रयस्थान म्हणून ओळखल्या जाणाऱ्या शोपियाँ परिसरावर चढाई करण्याची तयारी लष्कराकडून करण्यात येत आहे. या भागात काही दिवसांपासून लष्कराच्या हालचाली वाढल्या असून, तेथे लष्कराचे नवे तळ उभारण्यात येत आहेत. तसेच सीआरपीएफची राखीव तुकडीही येथे दाखल झाली आहे.  दक्षिण काश्मीरमधील शोपियाँ भाग दहशतवाद्यांसाठी सर्वात सुरक्षित भाग मानला जातो. या परिसरात दहशतवादी मोकळेपणाचे फिरताना दिसायचे. मात्र आता येथे लष्कराच्या  हालचाली वाढल्या आहेत. लष्कराच्या एका अधिकाऱ्याने दिलेल्या माहितीनुसार, "यावर्षी एप्रिल महिन्यात लष्कराने शोपियाँमधील हेफ शीरमाल भागात घुसण्याचा प्रयत्न केला होता. मात्र त्यावेळी लष्कराला मोठ्या विरोधाला सामोरे जावे लागले होते. त्यानंतर पोलीस, लष्कर आणि सेंट्रल रिझर्व्ह पोलीस फोर्स(सीआरपीएफ) च्या अधिकाऱ्यांनी शोपियाँमधील परिस्थितीवर तोडगा काढण्यासाठी डोळ्यात तेल घालून पहारा देण्यास सुरुवात केली." शोपियाँ जिल्हा पीर पंजाल पर्वताच्या दक्षिणेस आहे. तसेच जम्मू विभागातील डोडा, किश्तवाड आणि पुंछ परिसरात घुसखोरी करण्याचा दहशतवाद्यांच्या मार्ग आहे.  गेल्यावर्षी 8 जुलै रोजी हिज्बुल मुजाहिद्दीनचा पोस्टर बॉय असलेल्या बुऱ्हाण वानी याला लष्कराने कंठस्नान घातल्यानंतर या भागातून 37 तरुण बेपत्ता झाले होते. या सर्व तरुणांनी दहशतवादाचा मार्ग पकडून ते दहशतवादी संघटनांमध्ये सहभागी झाल्याचा अंदाज व्यक्त करण्यात येत आहे.  दरम्यान .या भागात लष्कराच्या हालचाली वाढल्यापासून गुप्त खबरी मिळू लागल्या असून, अनेक मोठे दहशतवादी मारले गेले आहेत. त्यामध्ये हिज्बुल मुजाहिद्दीनमध्ये दहशतवाद्यांची भर्ती करणारा शेर मलदेरा आणि या दहशतवादी संघटनेला अर्थपुरवठा करणारा वासीम शाह यांचा समावेश आहे.  दरम्यान, जम्मू-काश्मीरच्या हंदवाडामध्ये दहशतवादी आणि सुरक्षा पथकांमध्ये चकमक सुरु आहे. एका दहशतवाद्याला ठार करण्यात सुरक्षा पथकांना यश आले होते. 

टॅग्स :Indian Armyभारतीय जवानterroristदहशतवादीTerrorismदहशतवादJammu Kashmirजम्मू काश्मिर