शहरं
Join us  
Trending Stories
1
'दबंग मॅम' निदा खान ऑफिसमध्ये सर्वांना बुरखा घालायला शिकवायची; काय होता HR हेडचा प्लॅन?
2
Latest Marathi News LIVE Updates: केंद्रीय कायदामंत्र्यांनी लोकसभेत सादर केले सीमांकन विधेयक; संसदेत गदारोळ
3
होर्मुझपेक्षाही मोठा जलमार्ग ब्लॉक करण्याच्या तयारीत चीन; सॅटेलाइट इमेजनं खुलासा, तणाव वाढणार
4
Ashok Kharat : 'अंक' गणितच भोंदू अशोक खरातच्या अंगलट; शुभांक ९ मानून मोटारींसाठी निवडायचा क्रमांक
5
"त्यांनी भोंदूबाबाचा सगळा प्रकार संवेदनशीलतेने हाताळला..."; प्राजक्ता माळीने मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचं केलं कौतुक
6
Rasikh Salam Dar: वय लपवलं, BCCI कडून २ वर्षांची बंदी; शिक्षकाचा मुलगा RCB साठी कसा बनला ‘कमबॅक किंग’?
7
इराणमध्ये पहिल्यांदाच महिलेला फाशीची शिक्षा; कोण आहे Bita Hemmati? तिच्यावर नेमका आरोप काय?
8
३ बायका, ५३ बँक खाती, ५ कोटींचा घोटाळा... सरकारी तिजोरीवर डल्ला मारणारा करोडपती शिपाई
9
१७३ वर्षांपूर्वी प्रथम धावली, ४०० जणांचा प्रवास; आजही सेवेत, भारतीय रेल्वेची ‘ती’ ट्रेन कोणती?
10
विराट कोहली सामना संपल्यावर स्वत:हून LSGचे मालक संजीव गोयंकांना भेटायला गेला, फोटो VIRAL
11
अक्षय्य तृतीयेपूर्वीच सोन्या-चांदीच्या दरात सातत्यानं तेजी; पाहा काय आहेत २४k, 22k, 18k सोन्याचा लेटेस्ट भाव
12
ट्रम्प यांचा मेसेज घेऊन मुनीर पुन्हा इराणमध्ये गेले, अमेरिकेशी शांतता चर्चा कधी सुरू होणार?
13
'प्रताप सरनाईक माझे ड्रायव्हर असते'; मेहतांच्या विधानाने वाद, सरनाईक म्हणाले, "दुर्लक्ष करतोय पण..."
14
स्टार क्रिकेटपटूची निवृत्तीची घोषणा! महिला अत्याचाराच्या आरोपाखाली जाऊन आलाय तुरुंगात
15
करण-तेजस्वीचं झालंय 'सीक्रेट वेडिंग?' सोशल मीडियावर चर्चा; अखेर अभिनेत्याने सोडलं मौन
16
Middle East Conflict: अमेरिकेचा कठोर निर्णय! जागतिक तेल पुरवठा विस्कळीत होण्याची भीती, भारतासाठीही धोक्याची घंटा
17
पत्नीच्या नावे Post Office मध्ये २ लाख गुंतवा, २ वर्षानंतर व्हाल मालामाल; किती मिळेल रिटर्न, पाहा कॅलक्युलेशन
18
8th Pay Commission: ₹६९,००० बेसिक सॅलरी, ६% वार्षिक इनक्रिमेंट आणि ५ प्रमोशन! ८ व्या वेतन आयोगात मोठे प्रस्ताव
19
नाशिक धर्मांतरण प्रकरणाचे 'टेरर' कनेक्शन? निदा खानचा बॉम्बस्फोटातील मास्टरमाइंडशी संबंध असल्याचा संशय
20
Share Market Today: तेजीसह शेअर बाजाराची सुरुवात, Sensex ४०० अंकांनी तर Nifty मध्ये १५० अंकांची तेजी, 'या' शेअर्समध्ये तेजी
Daily Top 2Weekly Top 5

प्रीती झिंटा आणि नेस वाडियांमध्ये तडजोड होणार ?

By admin | Updated: June 17, 2014 17:24 IST

प्रीती आणि नेस वाडिया यांच्यात तडजोड होणार असून लवकरच प्रीती तक्रार मागे घेईल अशी शक्यता दोघांच्या निकटवर्तींयांकडून वर्तवण्यात येत आहे.

ऑनलाइन टीम

मुंबई, दि. १७ - अभिनेत्री प्रीती झिंटा आणि उद्योगपती नेस वाडिया यांच्यात निर्माण झालेला वाद आता शमण्याची चिन्हे आहेत. प्रीती आणि नेस वाडिया यांच्यात तडजोड होणार असून लवकरच प्रीती तक्रार मागे घेईल अशी शक्यता दोघांच्या निकटवर्तींयांकडून वर्तवण्यात येत आहे.
एका इंग्रजी वृत्तपत्राने दिलेल्या वृत्तानुसार प्रीती झिंटा आणि आणि नेस वाडिया यांच्यात तडजोडीसंदर्भात चर्चा सुरु आहे. प्रीतीने आयपीएलमधील संघ किंग्ज इलेव्हन पंजाबमधील मालकी हक्क सोडण्याची तयारीही दर्शवली असून तडजोड झाल्यानंतर प्रीती कायमची अमेरिकेत स्थलांतर करेल असे या वृत्तात म्हटले आहे. प्रीती आणि नेस वाडिया या दोघांच्या निकटवर्तीय वकिल मित्राच्या मार्फत तडजोडीवर चर्चा सुरु असून प्रीती व वाडिया या दोघांची मित्रमंडळीही तडजोडीसाठी प्रयत्न करत आहे. 
प्रीती व नेस वाडिया यांचे किंग्स इलेव्हन पंजाब या संघात प्रत्येकी २६ टक्के शेअर्स आहेत. प्रीती या संघातील मालकी सोडण्याची तयारी दर्शवली आहे. 
आयपीएल हंगामात मुंबईतील वानखेडे स्टेडियममधील सामन्या दरम्यान नेस वाडियांनी शिवीगाळ तसेच विनयभंग केल्याची तक्रार अभिनेत्री प्रीती झिंटाने केली होती. यानुसार पोलिसांनी नेस वाडियांविरोधात भारतीय दंड विधानातील कलम ३५४, ५०९ अंतर्गत गुन्हा दाखल केला आहे. यागुन्ह्यात नेस वाडिया दोषी ठरल्यास त्यांना पाच वर्षाचा तुरुंगवास होऊ शकतो.