शहरं
Join us  
Trending Stories
1
“आमच्यावरील सगळे आरोप खोटे, दोन दिवसांत सगळं बाहेर काढणार”; सहर शेखच्या वडिलांचा इशारा
2
भोंदू अशोक खरातचा निकटवर्तीय जितेंद्र शेळके यांचं अपघाती निधन; घातपाताचा संशय, काय घडलं?
3
अमेरिकेच्या निर्बंधांना भारताचा 'खो'! रशियाकडून तेल खरेदी सुरूच राहणार; मोदी सरकारचा कडक पवित्रा
4
Top Marathi News LIVE Updates: "TCS प्रकरण हा एका मोठ्या कटाचा भाग"; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचा खळबळजनक खुलासा
5
...तर देश कायमचा दुभंगेल, भाजपा आगीशी खेळतंय; डिलिमिटेशन विधेयकावरून राज ठाकरेंचा घणाघात
6
Iran US: दोन युद्ध भूमी, दोनदा शस्त्रसंधी तरीही युद्धाची तयारी; अमेरिका-इराणच्या मनात काय?
7
“उद्धव ठाकरे उमेदवार असतील तर विधान परिषद निवडणूक बिनविरोध होऊ शकेल”; संजय राऊत थेट बोलले
8
"तू बाहेर बस अन् रोहितला MIचा कॅप्टन कर..."; Hardik Pandya ला माजी क्रिकेटरने सुनावलं
9
T20 World Cup 2026: टी२० वर्ल्डकप २०२६ मध्ये मॅच फिक्सिंग? आयसीसीच्या अँटी करप्शन ब्युरोनं सुरू केली चौकशी
10
‘८५० जागांमागचं लॉजिक काय? त्यावरून संसदेत होतोय गदारोळ, आता अमित शाहांनी सांगितलं गणित   
11
धक्कादायक! मोबाइल खरेदीतून वाद; दारूच्या नशेत मित्रानेच घातला मित्राच्या डोक्यात दगड
12
गुजरातमध्ये निवडणुकीपूर्वीच भाजपानं बनवला 'बिनविरोध पॅटर्न'चा नवा रेकॉर्ड; काँग्रेस-AAP ला झटका
13
सावधान! कारचा AC वारंवार बंद करताय? मायलेज वाढवण्याच्या नादात होऊ शकतं मोठं नुकसान; कसं? जाणून घ्या
14
"धर्म बदल, तुझे वडील बरे होतील!"; नाशिक TCS प्रकरणात पीडित तरुणाने तौसीफ आणि दानिशच्या क्रूरतेचा पाढाच वाचला
15
Helicopter Crash In Indonesia : आकाशातून अचानक गायब झालेलं हेलिकॉप्टर अखेर सापडलं! पण... इंडोनेशियातून आली सर्वात वाईट बातमी
16
संसदेत लोकशाहीवरून जुंपली! "कुणी इंदिरा गांधींप्रमाणे पंतप्रधान मोदींची खुर्ची...!"; प्रियंकांच्या 'त्या' विधानावर कंगना रणौत यांचा पलटवार
17
क्रूरतेचा कळस! पत्नीचा पाय कुऱ्हाडीने छाटला, मग तोच पाय घेऊन नराधम पती पोलीस ठाण्यात पोहोचला
18
Wipro चं ₹१५,००० कोटींचं बायबॅक, प्रमोटर ग्रुपही सहभागी होणार; किरकोळ गुंतवणूकदारांसाठी याचा काय अर्थ?
19
TCS प्रकरणातील मास्टरमाइंड HR निदा खान महाराष्ट्रातून पसार?; 'या' ३ राज्यांत पोलीस पथके रवाना
20
Akshaya Tritiya 2026: दोष निवारण्यापेक्षा दोष टाळलेला बरा! नवीन घर घेताना 'या' गोष्टींकडे दुर्लक्ष करू नका!
Daily Top 2Weekly Top 5

गोमांस खाल्ल्याच्या अफवेने घेतला बळी

By admin | Updated: October 1, 2015 00:17 IST

घरात गोमांस साठवून खाल्ल्याची अफवा पसरल्यानंतर गावकऱ्यांनी केलेल्या बेदम मारहाणीत एका मजुराचा मृत्यू झाला तर त्याचा तरुण मुलगा गंभीर जखमी झाला.

ग्रेटर नोएडा (उत्तर प्रदेश) : घरात गोमांस साठवून खाल्ल्याची अफवा पसरल्यानंतर गावकऱ्यांनी केलेल्या बेदम मारहाणीत एका मजुराचा मृत्यू झाला तर त्याचा तरुण मुलगा गंभीर जखमी झाला. उत्तर प्रदेशातील दादरीमधील बिसरा गावात सोमवारी रात्री ही धक्कादायक घटना घडली. संतप्त जमावाने केलेल्या मारहाणीत ५० वर्षीय मोहम्मद इकलाख ठार झाला असून त्याचा २२ वर्षीय दानिश नावाचा मुलगा गंभीर जखमी झाला आहे. या घटनेनंतर वाढता तणाव लक्षात घेता गावात प्रचंड सुरक्षा बंदोबस्त करण्यात आला असून न्यायालयीन चौकशीचे आदेश देण्यात आले आहेत. याप्रकरणी पोलिसांनी १० लोकांविरुद्ध गुन्हा नोंदविल्यावर सहा जणांना अटक केली. याविरोधात गावकऱ्यांनी आंदोलन केले. गावात तोडफोड,जाळपोळ सुरू केली. परिस्थिती नियंत्रणात आणण्यासाठी पोलिसांना हवेत गोळीबार करावा लागला. या गोळीबारात राहुल यादव नामक गावकरी जखमी झाला. गौतमबुद्धनगरचे जिल्हाधिकारी एन.पी.सिंग यांनी दिलेल्या माहितीनुसार इकलाख आणि त्यांच्या कुटुंबीयांनी घरात गोमांस साठवून ठेवले असून ते खातही असल्याची अफवा गावात पसरली होती. त्यानंतर २०० लोकांच्या संतप्त जमावाने त्यांच्या घरावर हल्लाबोल केला आणि दगडविटांनी घरातील लोकांना मारहाण सुरूकेली. बेदम मारहाणीत मोलमजुरी करून कुटुंबाचा उदरनिर्वाह करणाऱ्या इकलाखचा मृत्यू झाला तर त्याचा तरुण मुलगा गंभीर जखमी झाला असून इस्पितळात मृत्यूशी झुंज देत आहे. इकलाखच्या घरात सापडलेल्या मांसाचे नमुने पोलिसांनी तपासणीसाठी न्यायवैद्यक प्रयोगशाळेत पाठविले आहेत. परंतु पीडितांनी गोमांस खाल्ले होते की नाही हे अद्याप स्पष्ट होऊ शकलेले नाही.(वृत्तसंस्था)