शहरं
Join us  
Trending Stories
1
Padma Awards: क्रिकेटपटू आर अश्विनला पद्मश्री, हॉकीपटू श्रीजेशला पद्मभूषण; येथे पाहा संपूर्ण यादी!
2
पहलगाम हल्ल्याचा नवीन व्हिडिओ समोर; पर्यटकाच्या कॅमेऱ्यात कैद झाली संपूर्ण घटना, पाहा...
3
'शरिया कोर्ट', 'कोर्ट ऑफ काजी'ला कायदेशीर मान्यता नाही; त्यांचे निर्देश बंधनकारक नाहीत: सर्वोच्च न्यायालय
4
पावसाळ्याआधी मृदा व जलसंधारणाविषयी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी घेतला 'हा' महत्त्वाचा निर्णय
5
मुलगी आयएएस अधिकारी झाली, आनंदोत्सवात वडिलांना ह्रदयविकाराचा झटका
6
युरोपात ब्लॅकआउट! फ्रान्स, स्पेनसह अनेक देशांमध्ये वीजपुरवठा खंडित; विमान, मेट्रोसेवा ठप्प
7
पहलगाम हल्यानंतर जम्मू-काश्मीरमध्ये ट्रेकिंगवर बंदी; पर्यटकांसाठी सूचना जारी...
8
मुंबईकरांचे जगणेच कठीण व्हावे, असाच सत्ताधाऱ्यांचा विचार; बेस्ट दरवाढीवरून आदित्य ठाकरे संतापले
9
आयपॅडमुळे विमानात उडाला गोंधळ, आणीबाणीची परिस्थिती, करावं लागलं एमर्जन्सी लँडिंग, कारण काय? 
10
कर्नाटकचे मुख्यमंत्री सिद्धारामैय्या भर सभेत पोलीस अधिकाऱ्यावर भडकले, मारण्यासाठी उगारला हात, त्यानंतर...  
11
दिल्ली बिहारपासून लांब आहे का? सर्वपक्षीय बैठकीला उपस्थित न राहिल्याने खरगेंचा PM मोदींवर निशाणा
12
यशस्वी जैस्वालकडे सर्वांचं लक्ष, गुजरातविरुद्ध मोलाचा पल्ला गाठणार
13
भाजपने अध्यक्षपदाची निवडणूक पुढे ढकलली; पहलगाम हल्ल्यामुळे घेतला निर्णय
14
ही खिंड आहे पाकिस्तानचं ‘चिकन नेक’, PoKमधील या एंट्री पॉईंटवर भारताने कब्जा केल्यास होईल जबर कोंडी, कारवायांना लागेल लगाम
15
स्टायलिश लूकसह रॉयल एनफील्ड हंटर ३५० बाजारात; बघताच प्रेमात पडाल!
16
'आता चर्चा नाही, पाकिस्तानशी अखेरची लढाई...', पहलगाम हल्ल्यावरुन फारुख अब्दुल्ला संतापले
17
पहलगाम हल्ल्याबाबत काँग्रेस नेत्यांच्या विधानांवर राहुल गांधी नाराज; मल्लिकार्जुन खरगे समज देणार
18
मुकेश अंबानी यांच्या एका शेअरने मार्केट फिरवलं; बाजाराची जोरदार उसळी; कुठे सर्वाधिक वाढ?
19
जसं त्याला कळलं, आम्ही हिंदू आहोत, त्याने...; लेफ्टिनंटच्या पत्नीचा पहिल्यांदाच खुलासा
20
पर्यटकांच्या सुरक्षेसाठी 'महाराष्ट्र पर्यटन सुरक्षा दल' स्थापना; राज्य सरकारचा निर्णय

अजानमुळे झोपमोड होत असल्याची केली होती तक्रार; आता बदलली लाऊडस्पीकरची दिशा, आवजही कमी

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 18, 2021 11:54 IST

आवाजामुळे समस्या होत असल्याची कुलगुरूंनी जिल्हाधिकाऱ्यांकडे केली होती तक्रार

ठळक मुद्देआवाजामुळे समस्या होत असल्याची कुलगुरूंनी जिल्हाधिकाऱ्यांकडे केली होती तक्रारबदलण्यात आली लाऊडस्पीकरची दिशा

अलाहाबाद केंद्रीय विद्यापीठाच्या  (Allahabad Central University) कुलगुरू प्रा. संगीता श्रीवास्तव (Vice Chancellor Prof Sangeeta Srivastava) यांनी अजानमुळे झोपेत अडथळा निर्माण होतो अशी तक्रार केली होती. त्यांनी याबाबत थेट जिल्हाधिकारी भानू चंद्र गोस्वामी यांना पत्र लिहिलं आहे. यामध्ये श्रीवास्तव यांनी नियमानुसार कारवाई करण्याची मागणी केली आहे. यानंतर आता प्रयागराज येथील सिव्हील लाईन येथे लाल मशिदीवर असलेल्या लाऊडस्पीकरची दिशा बदलण्यात आली आहे. कुलुगुरुंच्या पत्राचं वृत्त समोर आल्यानंतर मिशिदीनंच हे पाऊल उचललं आहे."आम्ही सकाळी वृत्तपत्र पाहिलं तेव्हा आम्हाला या आवाजानं कोणाला त्रास होतोय हे वाचून अतिशय दु:ख झालं. त्यानंतर आम्ही सर्वांनी चर्चा करून निर्णय घेतला. कोणाला त्रास होत असताना आपण करत असलेली सेवा योग्य नाही. त्यामुळे आम्ही कुलगुरूंच्या घराकडे असलेल्या लाऊडस्पीकरची दिशा बदलून रोडच्या दिशेनं केली आहे," असं मशिदीत असलेले मोहम्मद कलिम यांनी आजतकशी बोलताना सांगितलं. "पाच वेळा अजान होते. या ठिकाणी सुरुवातीपासूनच लाऊडस्पीकर लावण्यात आले होते. दोन हॉर्नची परवानगीदेखील आहे. परंतु काही दिवसांपूर्वी पोलीस या ठिकाणी आले होते. त्यानं इथे लाऊडस्पीकरचा आवाज मोठा असल्याचं सांगत यामुळे लोकांना समस्या होत असल्याचं म्हटलं होतं. यानंतर लाऊडस्पीकरचा आवाज कमी करण्यात आला," असंही त्यांनी सांगितलं. "सकाळच्या वेळी वर्दळ कमी असते. गोंगाटही नसतो. त्यामुळे तो आवाज मोठा वाटतो. आता आम्ही लाऊडस्पीकरचा आवाज आणखी कमी केला आहे. आता सकाळच्या वेळी कोणाला त्रास होत असेल तर आम्ही त्याचा आवाज आणखी कमी करू जेणेकरून तो आवाज ५० किंवा १०० मीटरपर्यंतही जाणार नाही," असंही त्यांनी स्पष्ट केलं. कुलगुरूंच्या निवासस्थानी तैनात करण्यात आलेल्या पोलिसांनीदेखील या आवाजामुळे समस्या होत असल्याचं म्हटलं. अजान सकाळी ५ ते साडेपाचच्या मध्ये होते आणि त्याचा आवाजही अधिक असतो. संपूर्ण रात्र जागल्यानंतर सकाळी इतका मोठा आवाज आला तर समस्यातर होणारच असंही पोलिसांनी सांगितलं. कुलगुरू आणि मशिदीतील अंतर हे ३०० मीटर इतकं आहे.काय म्हटलं होतं कुलगुरूंनी?"रोज सकाळी साधारण साडे पाच वाजता अजान होते. लाऊडस्पीकरवरुन होणाऱ्या अजानमुळे झोपमोड होते. त्यानंतर अनेक प्रयत्न करुनही झोप येत नाही. त्यामुळे दिवसभर डोकेदुखीचा त्रास होतो. याचा परिणाम रोजच्या कामकाजावरही होत आहे. जिथं माझे नाक सुरु होते, तिथं तुमचं स्वातंत्र्य संपतं. मी कोणताही संप्रदाय किंवा जातीच्या विरोधात नाही. तुम्ही अजान लाऊडस्पीकर शिवायदेखील करू शकता. त्यामुळे दुसऱ्यांची दिनचर्या प्रभावित होणार नाही" असंही कुलगुरूंनी पत्रात म्हटलं होतं."आगामी ईदपूर्वी सहरीची घोषणा पहाटे ४ पूर्वी होईल. त्यामुळे त्यांच्या आणि इतरांच्या त्रासामध्ये भर पडेल. भारतीय राज्यघटनेत सर्व पंथनिरपेक्ष आणि शांततापूर्ण सौहार्दाची संकल्पना मांडण्यात आली आहे" याचा उल्लेख देखील या पत्रात करण्यात आला होता. त्याचबरोबर अलाहाबाद हायकोर्टाच्या जुन्या आदेशाचा दाखलाही यामध्ये श्रीवास्तव यांनी दिला होता.

टॅग्स :Uttar Pradeshउत्तर प्रदेशProfessorप्राध्यापकPoliceपोलिसMosqueमशिद