तीन फूट उंचीचे छोटू बाबा कुंभमेळ्यात ठरताहेत लक्षवेधी, ३२ वर्षांपासून केलेली नाही आंघोळ  

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 4, 2025 17:59 IST2025-01-04T17:58:55+5:302025-01-04T17:59:50+5:30

Prayagraj Maha Kumbhmela 2025: उत्तर प्रदेशमधील प्रयागराज येथे होणाऱ्या कुंभमेळ्यासाठी साधूसंत गोळा होऊ लागले आहेत. दरम्यान, या कुंभमेळ्यात आसाममधील कामाख्या पीठ येथून आलेले ५८ वर्षीय गंगापुरी महाराज हे खास आकर्षणाचे केंद्र ठरले आहेत.

Prayagraj Maha Kumbhmela 2025: Three-foot tall Chhotu Baba is attracting attention at Kumbh Mela, hasn't bathed in 32 years | तीन फूट उंचीचे छोटू बाबा कुंभमेळ्यात ठरताहेत लक्षवेधी, ३२ वर्षांपासून केलेली नाही आंघोळ  

तीन फूट उंचीचे छोटू बाबा कुंभमेळ्यात ठरताहेत लक्षवेधी, ३२ वर्षांपासून केलेली नाही आंघोळ  

उत्तर प्रदेशमधील प्रयागराज येथे होणाऱ्या कुंभमेळ्यासाठी साधूसंत गोळा होऊ लागले आहेत. दरम्यान, या कुंभमेळ्यात आसाममधील कामाख्या पीठ येथून आलेले ५८ वर्षीय गंगापुरी महाराज हे खास आकर्षणाचे केंद्र ठरले आहेत. त्यांना छोटू बाबा म्हणूनही ओळखले जाते. केवळ ३ फूट ८ इंच उंची असलेल्या छोटू बाबा हे आपण मागच्या ३२ वर्षांपासून आंघोळ केलेली नाही, असा दावा करतात, त्यामुळे भाविकांमधील त्यांच्याबाबतचं कुतुहल अधिकच वाढलं आहे. 

त्रिवेणी संगमाच्या किनाऱ्यावर छोटू बाबा यांनीही आपला तळ ठोकला आहे. तसेच संपूर्ण कुंभमेळ्यादरम्यान येथे राहणार आहेत. येथे येणारे भाविक त्यांची भेट घेऊन दर्शन घेतात.

दरम्यान, मागच्या ३२ वर्षांपासून स्नान न करण्याच्या आपल्या निर्णयाबाबत गंगापुरी महाराज ऊर्फ छोटू महाराज सांगतात की, मी ३२ वर्षांपासून स्नान केलेलं नाही. कारण माझी एक इच्छा आहे. जी आतापर्यंत पूर्ण झालेली नाही. त्यामुळे मी गंगेत स्नान करणार नाही. मात्र कुंभमेळ्यामध्ये येण्यामुळे मी आनंदित आहे. तसेच तुम्ही सर्वजणही इथे आहात, तुम्हाला पाहून मी खुश आहे.  

Web Title: Prayagraj Maha Kumbhmela 2025: Three-foot tall Chhotu Baba is attracting attention at Kumbh Mela, hasn't bathed in 32 years

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.