शहरं
Join us  
Trending Stories
1
ज्याची भीती तेच घडलं, युद्ध आणखी पेटलं; इराणच्या सर्वात मोठ्या ब्रिजवर हल्ला, ८ मृत्यू ९५ जखमी
2
US Israel Iran War : इराणचा यू-टर्न! आधी म्हणालं 'वैमानिक ताब्यात', आता शोधण्यासाठी बक्षीस; अमेरिकेच्या पायलटबाबत सस्पेन्स
3
India Oil Supply News: भारतासाठी 'संजीवनी' ठरला हा छोटा देश; युद्ध असो की संकट, अविरत करतोय तेल अन् गॅस पुरवठा
4
"आणखी थोडा वेळ मिळाला, तर अमेरिका सहज होर्मुझ सामुद्रधुनी...", डोनाल्ड ट्रम्प यांचे इराणची चिंता वाढवणार विधान
5
म्हाडाचं घर घ्यायचा विचार? फॉर्म किती रुपयांना, अनामत रक्कम किती भरावी लागणार?
6
US Israel Iran War : डोनाल्ड ट्रम्प यांना विरोध केल्याचे फळ! इराणने उघडला फ्रान्ससाठी होर्मुझचा रस्ता; मॅक्रॉन यांना खास 'बक्षीस'
7
IPL 2026: चेन्नईच्या संघात एक मोठा बदल; कोण इन, कोण आउट? पाहा दोन्ही संघाची प्लेईंन इलेव्हन
8
MS Dhoni: सीएसकेच्या चाहत्यांसाठी गूड न्यूज? ट्रेनिंग सेशनसाठी धोनी मैदानात, पण खेळण्याबाबत सस्पेन्स कायम
9
फक्त एका दिवसासाठी अमेरिकेतून युवक भारतात आला; ताजमहाल पाहून निघून गेला, Video व्हायरल
10
Latest Marathi News LIVE Updates: अमेरिकेला पुन्हा झटका! इराणने दुसरे एफ-३५ लढाऊ विमान पाडले
11
जीवाशी खेळ! एक्स्पायरी डेट बदलून विकत होते कोल्ड ड्रिंक्स, बिस्किट; मोठ्या रॅकेटचा पर्दाफाश
12
Bhagwant Mann : "समोसा-पिझ्झाचा मुद्दा..."; राघव चड्ढांवर पंजाबचे मुख्यमंत्री भगवंत मान कडाडले, आतिशींचा गंभीर आरोप
13
'सिंधू' करार स्थगितीनंतर पाकिस्तानला आणखी एक धक्का! पुन्हा सुरू होतोय 'मोहरा प्रकल्प', जाणून घ्या
14
IPL 2026: चेन्नईला होतोय पश्चाताप! ज्याला संघातून काढलं, तोच खेळाडू दिल्लीसाठी ठरतोय मोठा जॅकपॉट
15
पाकव्याप्त काश्मीर लवकरच भारतात समाविष्ट होणार; AIIO चे मुख्य इमाम उमर इलियासी यांची भविष्यवाणी
16
युद्धभागात १०,००० हून अधिक कर्मचारी! टाटा समूहाच्या ३० कंपन्यांच्या सीईओंना तयार राहण्याचे आदेश
17
इराणमध्ये दिसली अमेरिकेची लढाऊ विमाने आणि हेलिकॉप्टर, कमी उंचीवर घिरट्या; व्हिडीओ आले समोर
18
इराणकडून आखाती देशांच्या तोंडचं पाणी पळवण्याची तयारी, पाणी आणि गॅस प्रकल्पांवर हल्ले, नव्या चालीमुळे खळबळ
19
बच्चू कडूंनी रचला खुनाचा कट? आमदार प्रवीण तायडेंचा ऑडिओ क्लिपसह खळबळजनक दावा
20
SIP की एकरकमी गुंतवणूक? १ कोटींचा टप्पा गाठण्यासाठी सर्वात सोपा मार्ग कोणता? पाहा गणित
Daily Top 2Weekly Top 5

"मी जनतेची माफी मागतो..."; कुंभमेळ्याच्या सांगतेनंतर, असं का म्हणाले पंतप्रधान मोदी?

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 27, 2025 15:35 IST

कुंभमेळ्याच्या सांगतेनंतर, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी, याचे वर्णन करताना, हा 'एक्याचा महायज्ञ' असल्याचे म्हटले आहे...

शिवरात्रीच्या स्नानानंतर कुभमेळ्याची सांगता झाली आहे. प्रयागराज येथे ४५ दिवस चाललेल्या या कुंभमेळ्यात देशाच्या कानाकोपऱ्यातून कोट्यधी भावीकांनी येऊन संगमावर पवित्र स्नान केले. कुंभमेळ्याच्या सांगतेनंतर, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी, याचे वर्णन करताना, हा 'एक्याचा महायज्ञ' असल्याचे म्हटले आहे. तसेच, या भव्यदिव्य आयोजनात सहभागी झाल्याबद्दल भाविकांचे आभारही मानले. याशिवाय, त्यांनी भाविकांना झालेल्या असुविधेबद्दल माफीही मागितली आहे.

पंतप्रधान मोदींनी का मागीतली माफी? -पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी Narendramodi.in वर लिहिलेल्या  एका लेखात त्यांनी सर्वांची माफी मागितली आहे. त्यांनी म्हटले आहे, "मला माहीत आहे, एवढे मोठे आयोजन सोपे नव्हते. मी, माता गंगा, माता यमुना आणि माता सरस्वती यांच्याकडे प्रार्थना करतो की, आमच्या उपासनेत काही कमतरता राहिली असेल तर कृपया करून आम्हाला क्षमा करा. माझ्यासाठी जनता जनार्दन ही इश्वराचे रूप आहे. माझ्याकडून भाविकांच्या सेवेतही काही कमतरता राहिली असेल, तर मी जनतेलाही क्षमा मागतो."

कुंभमेळ्यासंदर्भात काय म्हणाले, पंतप्रधान मोदी? -यानंतर, एका पाठोपाट एक केलेल्या ट्विटमध्ये पंतप्रधान मोदी म्हणाले, "140 कोटी देशवासियांची श्रद्धा जेव्हा एकाच वेळी एका ठिकाणी येते, तेव्हा ते दृष्य अविस्मरणीह बनते. प्रयागराजमधील कुंभमेळ्यादरम्यान आपण हेच अद्भूत दृश्य बघितले. हे आयोजन म्हणजे, केवळ एक धार्मिक उत्सवच नाही तर, आपल्या सांस्कृतीक ऐक्याचे आणि अखंडतेचे प्रतिक आहे. जेव्हा एखादे राष्ट्र शतकानुशतकांची गुलामगिरीची मानसिकता तोडून पुढे वाटचाल करते आणि मोकळा श्वास घेते, तेव्हा ज्या पद्धतीचे दृश्य दिसते, अगदी तसेच दृश्य आपण कुंभमेळ्यात बघितले."

४५ दिवस चाललेल्या या कुंभमेळ्यात ६६.३० कोटी भाविकांनी केले पवित्र स्नन - गेल्या १३ जानेवारीपासून सुरू झालेल्या या कुंभमेळ्याचा समारोप बुधवारी झाला. एकूण ४५ दिवस चाललेल्या या महाकुंभमेळ्यात जवळपास ६६.३० कोटी भाविकांनी गंगेच्या पात्रात आणि संगमावर स्नान केले. कुंभमेळा प्रशासनाने जाहीर केलेल्या आकडेवारीनुसार, बुधवारी रात्री ८ वाजेपर्यंत १.५३ कोटींहून अधिक भाविकांनी येते स्नान केले.

टॅग्स :Kumbh Melaकुंभ मेळाPrayagrajप्रयागराजNarendra Modiनरेंद्र मोदी