प्रशांत किशोर सरपंचपदाची निवडणूकही जिंकू शकत नाही; भाजपचा पलटवार
By ऑनलाइन लोकमत | Updated: January 23, 2020 13:58 IST2020-01-23T13:58:42+5:302020-01-23T13:58:51+5:30
भाजपचे प्रदेश प्रवक्ते डॉ. निखिल आनंद यांनी किशोर यांच्यावर कडाडून टीका केली. ते म्हणाले की, किशोर यांनी शाह यांच्यावर केलेली टीका सहन करण्यापलिकडे आहे. वास्तविक पाहता प्रशांत किशोर साधी सरपंचपदाची निवडणूकही जिंकू शकत नाही, असा टोलाही त्यांनी लगावला.

प्रशांत किशोर सरपंचपदाची निवडणूकही जिंकू शकत नाही; भाजपचा पलटवार
नवी दिल्ली - केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्याविरुद्ध ट्विट केल्यानंतर जनता दल युनायटेडचे उपाध्यक्ष प्रशांत किशोर यांच्यावर भाजपने पलटवार केला आहे. किशोर हे अराजकीय व्यक्ती असल्याची टीकाही भाजपकडून करण्यात आली.
भाजपचे प्रदेश प्रवक्ते डॉ. निखिल आनंद यांनी किशोर यांच्यावर कडाडून टीका केली. ते म्हणाले की, किशोर यांनी शाह यांच्यावर केलेली टीका सहन करण्यापलिकडे आहे. वास्तविक पाहता प्रशांत किशोर साधी सरपंचपदाची निवडणूकही जिंकू शकत नाही, असा टोलाही त्यांनी लगावला.
प्रशांत किशोर हे एनडीएच्या नेतृत्वासह जदयू-भाजप युतीविरोधात वक्तव्य करत आहेत. एनपीआर आणि सीएए या सारखे कायदे बनविण्याचा अधिकार केंद्र सरकारला आहे. मात्र किशोर करत असलेल्या वक्तव्यावरून असं वाटत की ते एका विशिष्ट पक्षासाठी काम करत आहेत, असही डॉ. आनंद म्हणाले.
प्रशांत किशोर यांनी एनआरसी आणि सीएए कायद्यांवरून केंद्रीय गृहमंत्री यांच्यावर ट्विटरवरून टीका केली होती. सीएए आणि एनआरसीचा विरोध करणाऱ्यांची शाह परवा करत नसतील तर त्यांनी दोन्ही कायद्यांविषयी जस देशाला सांगितलं होते, त्याच पद्धतीने ते लागू करावे, असं आवाहन किशोर यांनी केली होते. मागील काही दिवसांपासून किशोर दोन्ही कायद्यांवरून सतत केंद्र सरकारवर टीका करत आहेत.