शहरं
Join us  
Trending Stories
1
'गाझावरील बॉम्बहल्ले थांबवण्यासाठी मी इस्रायलला...'; पॅलेस्टाईनबाबत मोदींचा मोठा खुलासा
2
आता उद्धव ठाकरेंनी सांगितले, मविआ राज्यात किती जागा जिंकणार; दोन आकड्यांतून संकेत...
3
पाकिस्तानी लष्कर - अफगाणिस्तानमध्ये भीषण संघर्ष सुरु; डूरंड लाइनवर जोरदार हल्ला
4
Success Story: वडील विकायचे फळं, मुलानं उभी केली ४०० कोटींची कंपनी; आज आहे मोठा आईस्क्रीम ब्रँड
5
हे बळी नव्हे तर खून...! घाटकोपर दुर्घटनेवरून देवेंद्र फडणवीसांचा उद्धव ठाकरेंवर घणाघात
6
भाजपा उत्तर भारतीय मोर्चानं राज ठाकरेंची केली पाठराखण; शरद पवार, उद्धव ठाकरेंना सुनावलं
7
आज बरसणार शब्दबाण! महायुती दाखवेल शिवाजी पार्कवर दम; बीकेसीत ‘इंडिया’ करणार शक्तिप्रदर्शन
8
Diabetes पासून हार्ट डिजीज पर्यंतचे उपचार करणं होणार स्वस्त; सरकारनं ४१ औषधांच्या किंमती केल्या कमी
9
आजचे राशीभविष्य १७ मे २०२४; आजचा दिवस अनुकूल, आनंदाचे वातावरण राहिल
10
अखेर भावेश भिंडे जेरबंद, उदयपूरच्या रिसॉर्टमधून घेतले ताब्यात; ६० तासांनंतर बचावकार्य थांबले
11
"बच्चन घराण्याचे संस्कार", हात फ्रॅक्चर असलेल्या आईला सांभाळताना दिसली आराध्या, ऐश्वर्याच्या लेकीचं होतंय कौतुक
12
भावेश भिंडेची १०० कोटींची कमाई? निविदा १० वर्षांसाठी मंजूर, पण दिली ३० वर्षांची परवानगी
13
रेल्वेने मुंबई महापालिकेचे थकविले ५७२ कोटी; २२ वर्षे पाणीपट्टी, मालमत्ता कर भरलाच नाही
14
काँग्रेस आणि आपमध्ये दुरावा वाढला? राहुल गांधीच्या सभेचे केजरीवालांना निमंत्रण नाही
15
ज्यांना ‘नकली भाजप’ मान्य नाही त्यांनी आम्हाला मत द्यावे, हिंमत असेल तर...: उद्धव ठाकरे
16
बजेट धर्मावर आधारित कधीच नसते, जातींचा विचार करुन देश चालत नाही: शरद पवार
17
शरद पवार गटाच्या नेत्यांना जमावबंदीच्या नोटिसा; १५ ते १९ मे कुठेही फिरु नका, पोलिसांचा आदेश
18
...तर ईडी आरोपीला अटक करू शकत नाही; सुप्रीम कोर्टाचा निकाल, जामिनासाठी अर्ज अनावश्यक 
19
आज पंतप्रधान मोदींची शिवाजी पार्कवर सभा; वाहतूक वळविली, पाहा, महत्त्वाचे बदल
20
कोकण रेल्वेच्या मार्गातील अडथळे होणार दूर, तिन्ही मागण्या पूर्ण करु: रेल्वे मंत्री अश्विनी वैष्णव

AK + PK जोडीपुढे मोदी-शाह पडले फिके; प्रशांत किशोरांकडून 'आप'ला दिल्लीची किल्ली!

By ऑनलाइन लोकमत | Published: February 11, 2020 6:31 PM

अलीकडेच महाराष्ट्रात प्रशांत किशोर यांनी शिवसेना पक्षाच्या प्रचाराचं काम केलं होतं.

ठळक मुद्देनिवडणुकीच्या प्रचार टॅगलाइनसाठीही प्रशांत किशोर यांची टीम मेहनत घेते२०१४ च्या निवडणुकीत भाजपा आणि नरेंद्र मोदी यांच्या प्रचारासाठी काम केलं होतंमहाराष्ट्रात प्रशांत किशोर यांनी शिवसेना पक्षाच्या प्रचाराचं काम केलं होतं.

नवी दिल्ली - निवडणुकीतील रणनीतीकार म्हणून प्रसिद्ध असलेले प्रशांत किशोर यांनी पुन्हा एकदा दिल्लीच्या निवडणुकांमधून कामाचा डंका वाजवला आहे. प्रशांत किशोर यांच्या I PAC टीमने दिल्ली विधानसभा निवडणुकीसाठी आम आदमी पक्षाच्या प्रचाराचं काम पाहिले होते. अरविंद केजरीवाल यांनी केलेल्या कामाचं मार्केटींग प्रशांत किशोर यांच्या टीमने केलं. 

निवडणुकीच्या प्रचार टॅगलाइनसाठीही प्रशांत किशोर यांची टीम मेहनत घेते, त्यातूनच लगे रहो केजरीवाल या पंचलाइनची सुरुवात झाली. यापूर्वी प्रशांत किशोर यांनी २०१४ च्या निवडणुकीत भाजपा आणि नरेंद्र मोदी यांच्या प्रचारासाठी काम केलं होतं. त्यावेळी अच्छे दिन आने वाले है या टॅगलाइनने सर्वत्र धुमाकूळ घातला होता. या टॅगलाइनचा वापर निवडणुकीच्या प्रचारात भाजपाने चांगला केला त्यानंतर विरोधकांनीही याचा वापर करत भाजपाला कोंडीत पकडलं. काँग्रेस, बिहारमध्ये जेडीयू,आरजेडी आघाडीच्या प्रचाराची धुराही प्रशांत किशोर यांनी सांभाळली होती. 

अलीकडेच महाराष्ट्रात प्रशांत किशोर यांनी शिवसेना पक्षाच्या प्रचाराचं काम केलं होतं. ठाकरे घराण्यातील पहिलीच व्यक्ती निवडणुकीच्या रिंगणात उतरली होती. आदित्य ठाकरे यांची प्रतिमा तयार करणे, जास्तीत जास्त लोकांपर्यंत आदित्यला पोहचवणे याचं काम प्रशांत किशोर यांनी केलं. आदित्य ठाकरेंची जनआशीर्वाद यात्रा, आदित्य संवाद असे विविध कार्यक्रम त्यांच्याकडून घेण्यात आलं होतं. 

केजरीवाल यांच्या दिल्लीतील विजयानंतर प्रशांत किशोर यांच्या यशाचा आलेख आणखी वाढला आहे. आतापर्यंत त्यांनी ७ निवडणुकांची जबाबदारी घेतली त्यातील ६ मध्ये त्यांना घवघवीत यश मिळालं. २०१२ च्या गुजरात विधानसभा निवडणुकीच्या माध्यमातून नरेंद्र मोदींसोबत काम करण्याची संधी मिळाली. २०१४ च्या लोकसभा निवडणुकीत चाय पे चर्चा, सोशल मीडियातील मोदींचा प्रचार याचे श्रेय प्रशांत किशोर यांना जातं. २०१५ मध्ये प्रशांत किशोर यांनी भाजपाशी फारकत घेत जेडीयूसाठी काम केलं. बिहारच्या निवडणुकीत नितीश कुमारांची प्रचाराची जबाबदारी घेतली. या निवडणुकीत नितीश कुमारांचा मोठा विजय झाला होता. २०१८ मध्ये प्रशांत किशोर यांची जेडीयूच्या उपाध्यक्षपदी वर्णी लावण्यात आली. मात्र अलीकडेच सीएए, एनआरसी मुद्द्यावरुन या दोघांचे बिनसले आहे. 

'आप'च्या आमदारकीचा राजीनामा देऊन राष्ट्रवादीतून लढलेल्या उमेदवाराला किती मते मिळाली?  

२०१६ मध्ये प्रशांत किशोर यांनी पंजाब विधानसभा निवडणुकीत काँग्रेसच्या प्रचाराची धुरा हाती घेतली होती. कॅप्टन अमरिंदर सिंह यांच्या नेतृत्वात काँग्रेसला मिळालेल्या विजयाच्या वाट्यात प्रशांत किशोर यांचा सिंहाचा वाटा आहे. २०१९ मध्ये आंध्र प्रदेशात झालेल्या निवडणुकीत वायएसआर काँग्रेससाठी त्यांनी काम केले. या निवडणुकीत जगमोहन रेड्डी यांना यश मिळालं, मुख्यमंत्री म्हणून ते सध्या विराजमान आहेत. आगामी काळात प्रशांत किशोर बंगालमध्ये ममता बॅनर्जी आणि तामिळनाडूत द्रमुकचा प्रचाराची जबाबदारी घेणार आहेत. 

महत्त्वाच्या बातम्या

पुन्हा एकदा नरेंद्र मोदींची शिवाजी महाराजांशी तुलना; भाजपा नेत्याने दिली 'छत्रपती' उपमा 

किमान शब्दांत कमाल टीका; पुण्यात शरद पवारांकडून राज ठाकरेंचा समाचार

भाजपाने द्वेषाचे राजकारण करण्याचा प्रयत्न केला - मनीष सिसोदिया

गोळी मारणाऱ्यांना 'झाडू'ने मारलं, निकालानंतर प्रकाश राजची सिंघम स्टाईल टीका

केजरीवालांना दहशतवादी म्हणणं महागात पडलं; जाणून घ्या 'त्या' तिघांच्या मतदारसंघात काय घडलं?

टॅग्स :Prashant Kishoreप्रशांत किशोरAAPआपArvind Kejriwalअरविंद केजरीवालdelhi electionदिल्ली निवडणूकBJPभाजपाcongressकाँग्रेसShiv Senaशिवसेना