Delhi Election Result: 'आप'च्या आमदारकीचा राजीनामा देऊन राष्ट्रवादीतून लढलेल्या उमेदवाराला किती मते मिळाली?  

By ऑनलाइन लोकमत | Published: February 11, 2020 05:19 PM2020-02-11T17:19:25+5:302020-02-11T17:20:16+5:30

दिल्ली कॅन्टोंमेंट मतदारसंघातून सुरेंदर सिंह निवडणूक लढवत होते.

Delhi Election Result: How many votes did the candidate contesting from NCP after resigning from AAP's MLA? | Delhi Election Result: 'आप'च्या आमदारकीचा राजीनामा देऊन राष्ट्रवादीतून लढलेल्या उमेदवाराला किती मते मिळाली?  

Delhi Election Result: 'आप'च्या आमदारकीचा राजीनामा देऊन राष्ट्रवादीतून लढलेल्या उमेदवाराला किती मते मिळाली?  

googlenewsNext

नवी दिल्ली - दिल्ली विधानसभेच्या निकालाचे कौल समोर आलेले आहे. यामध्ये पुन्हा एकदा मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांच्या आपने बाजी मारली आहे. ७० पैकी ६३ जागांवर आपच्या उमेदवाराने आघाडीने घेतली असून भाजपा ७ जागांवर आघाडी आहे. या निवडणुकीत काँग्रेसला एकही जागा जिंकता आली नाही. त्याचसोबत राष्ट्रवादीनेही या निवडणुकीत ५ उमेदवार उतरवले होते. त्यांचाही पराभव झालेला आहे. 

काही दिवसांपूर्वी आम आदमी पक्षाचे आमदार फतेह सिंह व कमांडो सुरिंदर सिंह यांनी राष्ट्रवादीत प्रवेश केला होता. दिल्ली अभी दूर नही अशा शब्दात राष्ट्रवादीचे नेते जयंत पाटील यांनी या नेत्यांचे स्वागत केले होते. आम आदमी पक्षाने फतेह सिंह, सुरेंदर सिंह यांना तिकीट नाकारत सुरेंद्र कुमार यांना तिकीट दिलं होतं. त्यामुळे बंडखोरी करुन या दोघांनी आपला सोडचिठ्ठी देत राष्ट्रवादीचा झेंडा हाती घेतला होता. 

'आय लव्ह यू' म्हणत अरविंद केजरीवालांचा 'दिलवाल्या' दिल्लीकरांना 'फ्लाइंग किस'

दिल्ली कॅन्टोंमेंट मतदारसंघातून सुरेंदर सिंह निवडणूक लढवत होते. राष्ट्रवादीकडून त्यांना उमेदवारी दिली होती. याठिकाणी आपचे विरेंदर सिंह काडियान यांना २८ हजारांपेक्षा जास्त मतदान झालं तर राष्ट्रवादीचे उमेदवार सुरेंदर सिंह यांना ९०४ मते पडली. तर गोकळपूर मतदारसंघात राष्ट्रवादीकडून निवडणूक लढवणारे फतेह सिंह यांना ४१९ मते पडली तर याठिकाणी आपचे उमेदवार सुरेंद्र कुमार यांना ८८ हजार मते मिळून विजयी झाले. 

बाबलपूर येथे राष्ट्रवादीचे उमेदवार झाहिद अली यांना १०० मते, छत्तरपूर येथे राष्ट्रवादीचे राणा सुजीत सिंह १७१ मते, मुस्तफाबाद येथील उमेदवार मयूर भान यांना २८८ मते पडली आहेत. 

दरम्यान, राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी दिल्लीचा निकाल हा अपेक्षित होता. मात्र आता आम्ही उर्वरित पक्षांनी एकत्र बसून काम  करायला हवे. आज लोकांना एका विचाराच्या अपेक्षा आहे असं सांगतानाच 'भाजप देशावरची ही आपत्ती आहे अशा शब्दात टीका केली. 'या निकालात काहीही आश्चर्य नाही.लोकांनी विकासाला मत दिले आहे. मात्र दिल्लीचा निर्णय हा दिल्लीपुरता नसून हे इतर राज्यांमध्येही होऊ शकते. धार्मिक प्रचाराला ठोकारलं आहे, ही अहंकाराला चपराक आहे. ही प्रक्रिया आता सुरु झाली असून अनेक राज्यात भाजपचा पराभव झाला आहे असं त्यांनी सांगितले. 

महत्त्वाच्या बातम्या

पुन्हा एकदा नरेंद्र मोदींची शिवाजी महाराजांशी तुलना; भाजपा नेत्याने दिली 'छत्रपती' उपमा 

किमान शब्दांत कमाल टीका; पुण्यात शरद पवारांकडून राज ठाकरेंचा समाचार

भाजपाने द्वेषाचे राजकारण करण्याचा प्रयत्न केला - मनीष सिसोदिया

गोळी मारणाऱ्यांना 'झाडू'ने मारलं, निकालानंतर प्रकाश राजची सिंघम स्टाईल टीका

'दिल्लीच्या जनतेने भाजपाला नाकारलं; सीएए, एनआरसी, एनपीआरलाही नाकारतील'

भाजपाच्या पराभवाचा सिलसिला आता थांबेल असं वाटत नाही; शरद पवारांची चपराक

 

Web Title: Delhi Election Result: How many votes did the candidate contesting from NCP after resigning from AAP's MLA?

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.