AK + PK जोडीपुढे मोदी-शाह पडले फिके; प्रशांत किशोरांकडून 'आप'ला दिल्लीची किल्ली!

By ऑनलाइन लोकमत | Published: February 11, 2020 06:31 PM2020-02-11T18:31:53+5:302020-02-11T18:48:08+5:30

अलीकडेच महाराष्ट्रात प्रशांत किशोर यांनी शिवसेना पक्षाच्या प्रचाराचं काम केलं होतं.

Prashant Kishor team campaign in delhi for 'AAP' & Arvind Kejriwal in Delhi Election | AK + PK जोडीपुढे मोदी-शाह पडले फिके; प्रशांत किशोरांकडून 'आप'ला दिल्लीची किल्ली!

AK + PK जोडीपुढे मोदी-शाह पडले फिके; प्रशांत किशोरांकडून 'आप'ला दिल्लीची किल्ली!

googlenewsNext
ठळक मुद्देनिवडणुकीच्या प्रचार टॅगलाइनसाठीही प्रशांत किशोर यांची टीम मेहनत घेते२०१४ च्या निवडणुकीत भाजपा आणि नरेंद्र मोदी यांच्या प्रचारासाठी काम केलं होतंमहाराष्ट्रात प्रशांत किशोर यांनी शिवसेना पक्षाच्या प्रचाराचं काम केलं होतं.

नवी दिल्ली - निवडणुकीतील रणनीतीकार म्हणून प्रसिद्ध असलेले प्रशांत किशोर यांनी पुन्हा एकदा दिल्लीच्या निवडणुकांमधून कामाचा डंका वाजवला आहे. प्रशांत किशोर यांच्या I PAC टीमने दिल्ली विधानसभा निवडणुकीसाठी आम आदमी पक्षाच्या प्रचाराचं काम पाहिले होते. अरविंद केजरीवाल यांनी केलेल्या कामाचं मार्केटींग प्रशांत किशोर यांच्या टीमने केलं. 

निवडणुकीच्या प्रचार टॅगलाइनसाठीही प्रशांत किशोर यांची टीम मेहनत घेते, त्यातूनच लगे रहो केजरीवाल या पंचलाइनची सुरुवात झाली. यापूर्वी प्रशांत किशोर यांनी २०१४ च्या निवडणुकीत भाजपा आणि नरेंद्र मोदी यांच्या प्रचारासाठी काम केलं होतं. त्यावेळी अच्छे दिन आने वाले है या टॅगलाइनने सर्वत्र धुमाकूळ घातला होता. या टॅगलाइनचा वापर निवडणुकीच्या प्रचारात भाजपाने चांगला केला त्यानंतर विरोधकांनीही याचा वापर करत भाजपाला कोंडीत पकडलं. काँग्रेस, बिहारमध्ये जेडीयू,आरजेडी आघाडीच्या प्रचाराची धुराही प्रशांत किशोर यांनी सांभाळली होती. 

अलीकडेच महाराष्ट्रात प्रशांत किशोर यांनी शिवसेना पक्षाच्या प्रचाराचं काम केलं होतं. ठाकरे घराण्यातील पहिलीच व्यक्ती निवडणुकीच्या रिंगणात उतरली होती. आदित्य ठाकरे यांची प्रतिमा तयार करणे, जास्तीत जास्त लोकांपर्यंत आदित्यला पोहचवणे याचं काम प्रशांत किशोर यांनी केलं. आदित्य ठाकरेंची जनआशीर्वाद यात्रा, आदित्य संवाद असे विविध कार्यक्रम त्यांच्याकडून घेण्यात आलं होतं. 

Image result for प्रशांत किशोर I Pac

केजरीवाल यांच्या दिल्लीतील विजयानंतर प्रशांत किशोर यांच्या यशाचा आलेख आणखी वाढला आहे. आतापर्यंत त्यांनी ७ निवडणुकांची जबाबदारी घेतली त्यातील ६ मध्ये त्यांना घवघवीत यश मिळालं. २०१२ च्या गुजरात विधानसभा निवडणुकीच्या माध्यमातून नरेंद्र मोदींसोबत काम करण्याची संधी मिळाली. २०१४ च्या लोकसभा निवडणुकीत चाय पे चर्चा, सोशल मीडियातील मोदींचा प्रचार याचे श्रेय प्रशांत किशोर यांना जातं. 
२०१५ मध्ये प्रशांत किशोर यांनी भाजपाशी फारकत घेत जेडीयूसाठी काम केलं. बिहारच्या निवडणुकीत नितीश कुमारांची प्रचाराची जबाबदारी घेतली. या निवडणुकीत नितीश कुमारांचा मोठा विजय झाला होता. २०१८ मध्ये प्रशांत किशोर यांची जेडीयूच्या उपाध्यक्षपदी वर्णी लावण्यात आली. मात्र अलीकडेच सीएए, एनआरसी मुद्द्यावरुन या दोघांचे बिनसले आहे. 

'आप'च्या आमदारकीचा राजीनामा देऊन राष्ट्रवादीतून लढलेल्या उमेदवाराला किती मते मिळाली?  

२०१६ मध्ये प्रशांत किशोर यांनी पंजाब विधानसभा निवडणुकीत काँग्रेसच्या प्रचाराची धुरा हाती घेतली होती. कॅप्टन अमरिंदर सिंह यांच्या नेतृत्वात काँग्रेसला मिळालेल्या विजयाच्या वाट्यात प्रशांत किशोर यांचा सिंहाचा वाटा आहे. २०१९ मध्ये आंध्र प्रदेशात झालेल्या निवडणुकीत वायएसआर काँग्रेससाठी त्यांनी काम केले. या निवडणुकीत जगमोहन रेड्डी यांना यश मिळालं, मुख्यमंत्री म्हणून ते सध्या विराजमान आहेत. आगामी काळात प्रशांत किशोर बंगालमध्ये ममता बॅनर्जी आणि तामिळनाडूत द्रमुकचा प्रचाराची जबाबदारी घेणार आहेत. 

महत्त्वाच्या बातम्या

पुन्हा एकदा नरेंद्र मोदींची शिवाजी महाराजांशी तुलना; भाजपा नेत्याने दिली 'छत्रपती' उपमा 

किमान शब्दांत कमाल टीका; पुण्यात शरद पवारांकडून राज ठाकरेंचा समाचार

भाजपाने द्वेषाचे राजकारण करण्याचा प्रयत्न केला - मनीष सिसोदिया

गोळी मारणाऱ्यांना 'झाडू'ने मारलं, निकालानंतर प्रकाश राजची सिंघम स्टाईल टीका

केजरीवालांना दहशतवादी म्हणणं महागात पडलं; जाणून घ्या 'त्या' तिघांच्या मतदारसंघात काय घडलं?

Web Title: Prashant Kishor team campaign in delhi for 'AAP' & Arvind Kejriwal in Delhi Election

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.