pradyuman singh tomar falls into activist feet for election campaign video | मतांसाठी काय पण! भाजपाच्या मंत्र्याने काँग्रेस कार्यकर्त्याच्या पायावर ठेवलं डोकं; Video व्हायरल

मतांसाठी काय पण! भाजपाच्या मंत्र्याने काँग्रेस कार्यकर्त्याच्या पायावर ठेवलं डोकं; Video व्हायरल

नवी दिल्ली - निवडणुकीत निवडून येण्यासाठी प्रत्येक उमेदवार मतदारांना आकर्षित करण्यासाठी विविध प्रयत्न करत असतात. असाच एक व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर जोरदार व्हायरल झाला आहे. भाजपाच्या एका मंत्र्याने मतांसाठी काँग्रेस कार्यकर्त्याच्या पायावर डोकं ठेवल्याचं पाहायला मिळत आहे. यासोबत मंत्री कार्यकर्त्याला सातत्याने विनवणी करताना दिसत आहेत. भाजपाच्या मंत्र्याचा हा व्हिडीओ सोशल मीडियावर जोरदार व्हायरल होत आहे. 

मिळालेल्या माहितीनुसार, भाजपाच्या प्रद्मुम्न सिंह तोमर यांचा हा व्हिडीओ आहे. प्रद्मुम्न सिंह तोमर हे भाजपमधील दिग्गज मंत्री असून ज्योतिरादित्य शिंदे यांचे कट्टर समर्थक आहेत. शिंदे यांच्यासोबतच त्यांना काँग्रेस सोडून भाजपामध्ये प्रवेश केला आहे. भाजपामध्ये प्रवेश केल्यानंतर ते वारंवार काँग्रेस नेत्यांवर निशाणा साधताना दिसले. त्यानंतर आता त्यांचा हा व्हिडीओ जोरदार व्हायरल होत आहे. यामध्ये तोमर आपल्या जुन्या काँग्रेस कार्यकर्त्यासमोर मतांसाठी विनवणी करीत आहे. 

मतांसाठी मंत्र्यांनी कार्यकर्त्यांच्या पायवर डोकं ठेवण्याचाही प्रयत्न केला. मध्य प्रदेशातील काँग्रेस नेते अरुण यादव यांनी आपल्या ट्विटर अकाऊंटवरून हा व्हिडीओ ट्विट केला आहे. "पाहा कसं एका लाचार मंत्र्यांने काँग्रेसच्या टिकाऊ कार्यकर्त्यासमोर गुडघे टेकले. काँग्रेसचे काही नेते बिकाऊ असू शकतात, मात्र काँग्रेसचा प्रत्येक कार्यकर्ता टिकाऊ आहे" असं अरुण यादव यांनी आपल्या ट्विटमध्ये म्हटलं आहे. काँग्रेसचे नेते दिग्विजय सिंह यांनी देखील ट्विटरवरून निशाणा साधत जोरदार टीका केली आहे. एका हिंदी वेबसाईटने याबाबतचे वृत्त दिले आहे. 

'दहशतवादी मदरशांमध्येच वाढले आहेत', भाजपा मंत्र्याचं वादग्रस्त विधान

मध्य प्रदेशचे माजी मुख्यमंत्री आणि काँग्रेसचे ज्येष्ठ नेते कमलनाथ यांनी भाजपा उमेदवार इमरती देवी यांच्याबाबत उच्चारलेल्या आक्षेपार्ह शब्दावरून चांगलंच राजकारण तापलं आहे. हे असं असतानाच मध्य प्रदेश सरकारच्या कॅबिनेट मंत्री उषा ठाकूर यांनी मदरशांबद्दल एक वादग्रस्त विधान केलं आहे. दहशतवादी हे मदरशांमध्येच वाढले आहेत असं भाजपाच्या उषा ठाकूर यांनी म्हटलं आहे. "सर्व कट्टरवादी व सर्व दहशतावादी मदरशांमध्ये शिकले व वाढले आहेत. जम्मू-काश्मीरला दहशतवादाचा कारखाना बनवून सोडले होते. असे मदरसे जे राष्ट्रवादाशी समाजाच्या मुख्य प्रवाहाशी जोडले जाऊ शकत नाहीत, त्यांना आपल्याला योग्य शिक्षणाशी जोडून समाजाच्या प्रगतीसाठी पुढे आणले गेले पाहिजे. आसमने हे करून देखील दाखवलं आहे. आसामध्ये मदरसे बंद आहेत. राष्ट्रवादामध्ये जे अडचण निर्माण करत असतील अशा सर्व गोष्टी राष्ट्रहितासाठी बंद झाल्या पाहिजेत. शासकीय मदत बंद झाली पाहिजे" असं उषा ठाकूर यांनी म्हटलं आहे. 

English summary :
pradyuman singh tomar falls into activist feet for election campaign video

वाचकहो, 'लोकमत'ला टेलिग्रामवर फॉलो करताय ना?... अजून जॉईन केलं नसेल तर क्लिक करा ( @LokmatNews ) आणि मिळवा महत्त्वाचे अपडेट्स अन् ताज्या बातम्या!

Web Title: pradyuman singh tomar falls into activist feet for election campaign video

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.