देश नवे विक्रम प्रस्थापित करत होता, तेव्हा काही लोक सेल्फ गोल करत होते; मोदींचा विरोधकांवर जोरदार हल्लाबोल

By ऑनलाइन लोकमत | Published: August 5, 2021 03:49 PM2021-08-05T15:49:16+5:302021-08-05T15:52:59+5:30

"एकीकडे आपला देश, आपले तरुण भारताची मान अभिमानाने उंचावत आहेत. एका पाठोपाठ एक विजयी गोल करत आहेत. त्याच वेळी, काही लोक असेही आहेत, जे राजकीय स्वार्थापोटी एक प्रकारे सेल्फ-गोल करत आहेत."

Pradhan Mantri garib kalyan anna yojana pm Narendra Modi lashes out opposition for their conduct in parliament | देश नवे विक्रम प्रस्थापित करत होता, तेव्हा काही लोक सेल्फ गोल करत होते; मोदींचा विरोधकांवर जोरदार हल्लाबोल

देश नवे विक्रम प्रस्थापित करत होता, तेव्हा काही लोक सेल्फ गोल करत होते; मोदींचा विरोधकांवर जोरदार हल्लाबोल

Next

 
नवी दिल्ली - 'गरीब कल्याण अन्न योजने'अंतर्गत (Pradhan Mantri garib kalyan anna yojana ) उत्तर प्रदेशातील लाभार्थ्यांशी संवाद साधताना आज पंतप्रधान नरेंद्र मोदींनी विरोधकांवर जोरदार हल्ला चढवला. मोदी म्हणाले, जेव्हा देश नव-नवे विक्रम प्रस्थापित करत होता, तेव्हा काही लोक संसदेचे कामकाज थांबविण्याचा प्रयत्न करत होते. गेल्या काही आठवड्यांत आपण जे विक्रम पाहिले, त्यांत भारतीयांचे सामर्थ्य आणि यश सर्वत्र दिसून येते. संपूर्ण देश उत्साहाने ऑलिम्पिकमधील अभूतपूर्व कामगिरी पाहत आहे आणि संसदेत मात्र, विरोधकांनी केलेल्या गदारोळामुळे काम ठप्प झाले आहे. (Pradhan Mantri garib kalyan anna yojana pm Narendra Modi lashes out opposition for their conduct in parliament)

काही लोक राजकीय स्वार्थापोटी सेल्फ गोल करत आहेत -
विरोधकांवर हल्ला चढवताना पंतप्रधान मोदी म्हणाले, "एकीकडे आपला देश, आपले तरुण भारताची मान अभिमानाने उंचावत आहेत. एका पाठोपाठ एक विजयी गोल करत आहेत. त्याच वेळी, काही लोक असेही आहेत, जे राजकीय स्वार्थापोटी एक प्रकारे सेल्फ-गोल करत आहेत. देश काय साध्य करत आहे, याच्याशी त्यांना काही घेणेदेणे नाही. 

PM मोदी काही दिवसांतच 9 कोटी शेतकऱ्यांना वाटणार 19 हजार कोटी; जाणून घ्या योजना, कुणाला होणार फायदा

हे लोक देशाची भावना दुखावत आहेत -
मोदी म्हणाले, "देशाला काय हवे आहे, देश काय साध्य करत आहे, देश कसा बदलत आहे, याच्याशी त्यांना काही एक देणे-घेणे नाही. हे लोक देशाचा वेळा वाया घालत आहेत आणि देशाच्या भावना दुखावत आहेत. हे लोक त्यांच्या राजकीय स्वार्थापोटी भारतीय संसदेचा सातत्याने अपमान करत आहेत.

5 ऑगस्ट एक विशेष तारीख -
पंतप्रधान मोदी म्हणाले, "आजची 5 ऑगस्ट ही तारीख अत्यंत विशेष झाली आहे. दोन वर्षांपूर्वी याच तारखेला देशाने एक भारत, श्रेष्ठ भारतच्या भावनेला आणखी बळकटी दिले. 5 ऑगस्टलाच, कलम 370 हटवून, जम्मू-काश्मीरमधील प्रत्येक नागरिकाला प्रत्येक अधिकार आणि प्रत्येक सुविधेचा संपूर्ण लाभ देण्यात आला. एवढेच नाही, तर हीच 5 ऑगस्टची तारीख आहे, ज्या दीवशी कोटी-कोटी भारतीयांनी शेकडो वर्षांनंतर भव्य राम मंदिराच्या दिशेने पहिले पाऊल टाकले. आज अयोध्येत राममंदिराचे काम वेगाने सुरू आहे," असेही मोदी म्हणाले.

बायडेन यांचा पंतप्रधान मोदींना फोन; पाकिस्तान भडकला, अमेरिकेला दिली थेट धमकी!

Web Title: Pradhan Mantri garib kalyan anna yojana pm Narendra Modi lashes out opposition for their conduct in parliament

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.