प्रदीप कुरूलकर प्रकरण, पाकिस्तानमधून आलेल्या ई-मेलचा तांत्रिक तपास सुरू
By ऑनलाइन लोकमत | Updated: May 14, 2023 08:37 IST2023-05-14T08:36:20+5:302023-05-14T08:37:19+5:30
कुरूलकरला अटक करण्यात आल्यानंतर एटीएसकडून करण्यात आलेल्या तपासाबाबतचा माहिती अहवाल न्यायालयात सादर करण्यात आला आहे.

प्रदीप कुरूलकर प्रकरण, पाकिस्तानमधून आलेल्या ई-मेलचा तांत्रिक तपास सुरू
पुणे : ‘डीआरडीओ’चा संचालक डाॅ. प्रदीप कुरूलकर याला पाकिस्तानातून ई-मेल पाठवण्यात आले असून, या आलेल्या ई-मेलचा सखोल तांत्रिक तपास सुरू करण्यात आला आहे. कुरूलकर याने पाकिस्तानी गुप्तचर यंत्रणेतील हेरांना संवेदनशील माहिती तसेच छायाचित्रे ई-मेलद्वारे पाठवल्याचा संशय तपास यंत्रणेला आहे. राज्य दहशतवाद विरोधी विभागाच्या (एटीएस) कोठडीत असलेल्या कुरूलकरची चौकशी करण्यात येत आहे.
कुरूलकरला अटक करण्यात आल्यानंतर एटीएसकडून करण्यात आलेल्या तपासाबाबतचा माहिती अहवाल न्यायालयात सादर करण्यात आला आहे.