राजस्थानात पुन्हा सत्तासंघर्ष; मुख्यमंत्री बदलण्याची मागणी
By ऑनलाइन लोकमत | Updated: November 22, 2022 11:05 IST2022-11-22T10:58:18+5:302022-11-22T11:05:32+5:30
राज्याचे वनमंत्री हेमाराम चौधरी यांनी मुख्यमंत्री बदलण्याची मागणी केली आहे. गेहलोतांच्याा नेतृत्वाखाली निवडणुका झाल्यास काँग्रेसला फटका बसण्याचा दावा त्यांनी केला.

राजस्थानात पुन्हा सत्तासंघर्ष; मुख्यमंत्री बदलण्याची मागणी
शरद गुप्ता -
नवी दिल्ली :राजस्थानकाँग्रेसमधील संघर्ष संपण्याचे नाव घेत नाहीये. गेहलोत यांचे निकटवर्तीय समजले जाणारे बंडखोर नेते धर्मेंद्र राठोड यांच्याकडे भारत जोडो यात्रेच्या आयोजनाची जबाबदारी दिल्याने प्रदेश प्रभारी अजय माकन यांनी पदाचा राजीनामा दिला. आता राठोड यांना यात्रेच्या आयोजनापासून दूर करण्यात आले आहे. दरम्यान, राज्याचे वनमंत्री हेमाराम चौधरी यांनी मुख्यमंत्री बदलण्याची मागणी लावून धरल्याने खळबळ उडाली आहे.
मागणीचे कारण काय?
राज्याचे वनमंत्री हेमाराम चौधरी यांनी मुख्यमंत्री बदलण्याची मागणी केली आहे. गेहलोतांच्याा नेतृत्वाखाली निवडणुका झाल्यास काँग्रेसला फटका बसण्याचा दावा त्यांनी केला.