शहरं
Join us  
Trending Stories
1
हिंदीचे दोन्ही जीआर रद्द, त्रिभाषा सूत्राचा निर्णय घेण्यासाठी नवी समिती स्थापन
2
हिंदी भाषेसंदर्भातील दोन्ही शासन निर्णय रद्द; राज-उद्धव यांच्या मोर्चाआधीच CM फडणवीसांची मोठी घोषणा
3
एअर इंडियाच्या विमानात समस्या, टोकियोहून दिल्लीला जाणाऱ्या विमानाचे कोलकात्यात इमरजन्सी लँडिंग
4
रेल्वे प्रवाशांसाठी आनंदाची बातमी! आता रिझर्वेशन चार्ट तयार होणार रेल्वे सुटण्याच्या 8 तास आधी; हे नियमही बदलणार
5
"...म्हणून सरकारने हिंदीचा GR रद्द केला"; उद्धव ठाकरेंचा राज्य सरकारवर हल्लाबोल, स्पष्टच बोलले
6
"ती समिती उच्च शिक्षणासाठी होती, खोटं कशाला बोलता"; उद्धव ठाकरेंचे CM फडणवीसांना प्रत्युत्तर
7
"हनिमूनवरून थेट माझ्यासोबत भांडायला आल्या..."; कोलकाता सामूहिक बलात्कार प्रकरणावरून आपसातच भिडले TMC खासदार! 
8
नागपूर-रत्नागिरी राष्ट्रीय महामार्गावर अपघात; कारचे टायर फुटले, आठ जण जखमी, एअर बॅगमुळे भाविक बचावले
9
केबिनचे तापमान वाढले; Air India च्या टोकियो-दिल्ली विमानाची कोलकात्यात आपत्कालीन लँडिंग
10
मराठी जनतेच्या रेट्यामुळेच 'हिंदी सक्ती' मागे, ही भीती असली पाहिजे; राज ठाकरे स्पष्टच बोलले
11
हिंदी सक्तीचा निर्णय मागे घेतल्याने ५ जुलैला होणारा ठाकरे बंधूंचा मोर्चा रद्द, संजय राऊतांची माहिती
12
आरजी कार प्रकरणात केलेली आरोपीला फाशीची मागणी; आता स्वतःच केला तरुणीवर बलात्कार...
13
"कुठल्या तोंडाने आंदोलन करता हे राज ठाकरेंनी उद्धव यांना विचारलं पाहिजे"; CM फडणवीसांची टीका
14
कर्नाटकात मोठी 'उलथापालथ' होणार, आता 'हा' बडा नेता मुख्यमंत्री बनणार? आमदारानंच बोलता-बोलता 'लिक' केला काँग्रेसचा 'बिग प्लॅन'!
15
आमिर खानने नाकारलं अंडरवर्ल्ड पार्टीचं निमंत्रण, घाबरलं कुटुंब, म्हणाला - "मला जसं जगायचंय तसं... "
16
"हिंदीला विरोध नाही, पण..." उद्धव ठाकरे स्पष्टच बोलले; जीआरच्या प्रतिकात्मक होळीनंतर नेमकं काय म्हणाले?
17
Shefali Jariwala Death: अँटी एजिंग औषधं बनलं मृत्यूचं कारण? शेफाली जरीवाला प्रकरणात मोठा खुलासा
18
"नारायण राणेंनी भानगडी, मारामाऱ्या केल्या"; गोगावलेंच्या विधानावर नितेश राणे म्हणाले, "माझ्या खांद्याला खांदा लावून..."
19
"अपनी औकात में रहो, अगर अब..."; अरविंद केजरीवाल यांचा भाजपला थेट इशारा, नेमकं प्रकरण काय?
20
आता आरपारची लढाई; 29 ऑगस्टला मुंबई गाठायची अन्...जरांगे पाटलांचा सरकारला इशारा

सत्तेचे वारे..7 सद्गुरू

By admin | Updated: March 8, 2015 00:30 IST

मिकी व भाजप

मिकी व भाजप
...............
भारतीय जनता पक्षाला गोवा विकास पक्षाचे मंत्री मिकी पाशेको हे कितपत लाभदायी ठरतात हे जिल्हा पंचायत निवडणुकीच्या निकालातून दिसून येणार आहे. पाशेको यांचा वापर करून सासष्टीत काँग्रेसची मते कमी करावी ही भाजपची खेळी राजकीयदृष्ट्या व्यवहार्य आहे. मात्र पाशेको यांच्याकडे काँग्रेसची मोठी हानी करण्याएवढे बळ आहे का हा संशोधनाचा विषय आहे. गेल्या लोकसभा निवडणुकीवेळी पाशेको यांनी भाजपची उघडपणे साथ दिली. आपल्या नुवे मतदारसंघातून त्यांनी भाजपला मते मिळवून दिली. चर्च संस्था त्यावेळी भाजपच्या विरोधात उभी ठाकली होती. नरेंद्र मोदी पंतप्रधान बनणार ही गोष्ट ख्रिस्ती धर्मगुरुंना छळत होती. त्यामुळे अनेक फादर्स हे उघडपणे भाजपविरुद्ध प्रचार करत होते. त्यावेळी पाशेको यांनी ख्रिस्ती धर्मगुरुंना व चर्च संस्थेलाही आव्हान दिले. पाशेको यांच्या गोवा विकास पक्षाचे दुसरे आमदार कायतू सिल्वा यांनीही त्यावेळी भाजपला साथ देत चर्च संस्थेवर टीका केली होती. याला मते द्या, त्याला देऊ नका, अशी भाषा ख्रिस्ती धर्मगुरुंनी करू नये, असे पाशेको व कायतू यांनी त्यावेळी स्पष्टपणे सांगितले होते. आज जिल्हा पंचायत निवडणुकीवेळी मिकी व कायतू हे दोघेही एकमेकांच्या उरावर बसले आहेत. पाशेको यांचे बाणावलीचे आमदार कायतू सिल्वा यांच्याशी पटत नाही. मार्च 2012 मध्ये झालेल्या विधानसभा निवडणुकीत पाशेको यांच्या गोवा विकास पक्षाच्या तिकीटावर केवळ दोन आमदार निवडून आले. एक स्वत: मिकी व दुसरे कायतू सिल्वा. वास्तविक कायतू ही लो प्रोफाईल व्यक्ती. त्यांना पाहिल्यावर कुणी ते आमदार आहेत असे सहसा म्हणणार नाही, एवढे त्यांचे वागणे व पोषाखही साधा आहे. भाजपचे नेते मनोहर र्पीकर यांच्याशी त्यांची नाळ जुळली. मात्र पाशेको यांच्याशी त्यांचे गेल्या दोन वर्षांपासून पटत नाही. आता तर दोघांमधील संबंध एकदम ताणले गेले आहेत. बाणावली जिल्हा पंचायत मतदारसंघात कायतू यांनी स्वत:च्या पसंतीचा अपक्ष उमेदवार उभा केला. भाजप-मगो-गोविपाच्या आघाडीने ठेवलेला उमेदवार त्यांना मान्य नाही. याबाबत पाशेको यांनी कायतू यांना कडक शब्दांत समज देण्याचा प्रयत्न केला आहे. कायतू यांनी वाटल्यास पक्ष सोडून जावे, त्यांची पक्षविरोधी कृती आम्ही सहन करणार नाही, असे पाशेको यांचे म्हणणे आहे.