शहरं
Join us  
Trending Stories
1
जसप्रीत बुमराहच्या खराब कामगिरीमुळे कसा झाला मुंबई इंडियन्सचा पराभव? पाहा विचित्र आकडेवारी
2
Top Marathi News Live: विधान परिषद निवडणुकीत काँग्रेस काय करणार? आज सगळेच स्पष्ट होणार...
3
मध्यस्थाच्या भूमिकेतून पाकिस्तानला डच्चू, ट्रम्प यांनी इराणला थेट लावला फोन, पुतीनसोबतही केली चर्चा  
4
इराणमुळे ट्रम्पसमोर नवे संकट, युद्ध संपवण्याची डेडलाइन जवळ; दुर्लक्ष केल्यास काय परिणाम?
5
काय वाईट दिवस आले याच्यावर! एकेकाळी बॉलिवूड गाजवणाऱ्या अभिनेत्याचा व्हिडीओ पाहून चाहते चिंतेत
6
१५ मिनिटाच्या अंतरासाठी ५-६ तास कोंडीत; प्रवाशांचे अताेनात हाल, विदारक स्थितीत मुंबईकर अडकले
7
तुमच्या खिशात असलेली नोट कोणत्या प्रिन्टिंग प्रेसमध्ये छापलीये? ९९% लोकांना माहीत नाहीये भारतीय करन्सीचं गुपित
8
बंगळुरूमध्ये संरक्षक भिंत कोसळून मोठी दुर्घटना; एका चिमुरडीसह ७ जण जागीच ठार, अनेकजण जखमी!
9
ठाकरेंच्या खेळीनं विधानपरिषद निवडणुकीत ट्विस्ट; काँग्रेस देणार उमेदवार, दोन्ही NCP साधणार डाव?
10
आजचे राशीभविष्य - ३० एप्रिल २०२६, लाभदायी दिवस, कौटुंबिक, व्यावसायिक वातावरण समाधानाचे राहील
11
बंगालची ‘ममता’ कमळावर, तामिळनाडूवर द्रमुकचीच सत्ता; एक्झिट पोलचा अंदाज, ४ मे रोजी मतमोजणी
12
"हे खूप भयंकर आहे.... कृपया मदत करा"; अभिनेत्री सोनाली कुलकर्णीही पाच तास कोंडीत
13
IPL 2026 : MI चा संघर्ष संपता संपेना! तरीही स्वबळावर Playoffs ची आशा जिवंत; जाणून घ्या समीकरण
14
२ वर्षांचं प्रेम, लग्नाला प्रेयसीच्या आईचा विरोध; संतापलेल्या प्रियकरानं दोघांना संपवलं, मग...
15
‘apk’ फाइलचे देशभरातील सर्व्हर मुंबई पोलिसांनी केले ‘शटडाउन’; १० वी नापास आरोपी निघाले मास्टरमाइंड
16
मुंबईतील दहशतवादी हल्लाप्रकरणी अन्सारीला हायकोर्टाचा दिलासा नाही; पोलिस क्लिअरन्सची मागणी फेटाळली
17
इराणने लवकर शहाणे व्हावे...; अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांचा पुन्हा इशारा
18
"अवघ्या दहा फुटांवर होता मृत्यू आणि मी जिवंत परत आलो...; विकासाच्या नावाखाली जातोय बळी" 
19
एकीची मेहंदीही निघाली नव्हती, तर दुसरीचे मेमध्ये होते लग्न, पण काळाने घातला घाला
20
मे डे... मे डे... मे डे...! हे उद्योगाचे आर्थिक गाऱ्हाणे नाही तर एका मोठ्या राष्ट्रीय संकटाची नांदी
Daily Top 2Weekly Top 5

देशात मागास जिल्ह्यांची गरिबी हटली, १०६ सर्वाधिक अविकसित जिल्ह्यांपैकी निम्म्या जिल्ह्यांत गरिबीत जलद घट

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 12, 2025 06:16 IST

Poverty In India: देशातील १०६ सर्वाधिक अविकसित जिल्ह्यांपैकी जवळजवळ निम्म्या जिल्ह्यांमध्ये आर्थिक वर्ष २०१५-१६ व आर्थिक वर्ष २०२०-२१ दरम्यान त्यांच्या राज्याच्या सरासरीपेक्षा गरिबीत जलद घट झाली आहे.

नवी दिल्ली -  देशातील १०६ सर्वाधिक अविकसित जिल्ह्यांपैकी जवळजवळ निम्म्या जिल्ह्यांमध्ये आर्थिक वर्ष २०१५-१६ व आर्थिक वर्ष २०२०-२१ दरम्यान त्यांच्या राज्याच्या सरासरीपेक्षा गरिबीत जलद घट झाली आहे.

नीती आयोगाच्या २०२३मधील गरिबी निर्देशांकाच्या अहवालानुसार १०६ अविकसित जिल्ह्यांपैकी ४६ टक्के जिल्ह्यांमध्ये गरिबीत जलद घट झाली आहे. मध्य प्रदेश, आंध्र प्रदेश, आसाम आणि तामिळनाडूतील जिल्ह्यांचा यात समावेश आहे. स्वच्छता, शिक्षण आणि आरोग्य यांसारख्या सामाजिक - आर्थिक घटकांवर आधारित वंचिततेच्या आधारे गरिबीचे मोजमाप केले जाते. तसेच यात उत्पन्नाचे निकषदेखील मोजले जातात. विजापूरमध्ये गरिबी  ४१.२ टक्केवरून ४९.७ टक्क्यांपर्यंत वाढली. यादरम्यान देशातील गरिबी २४.८५ टक्क्यांवरून १४.९६% पर्यंत कमी झाली. 

सरकारने १०० जिल्हे मागास म्हणून घोषित केले. त्यापैकी बरेच जिल्हे आदिवासी पट्ट्यातील होते. येथे मिशन मोडमध्ये योजना राबवल्या. त्याचा परिणाम दिसू लागला आहे.- नरेंद्र मोदी, पंतप्रधान

गरिबी कमी झालेले जिल्हेकोरापूट, पूर्णिया, चंबा, कुपवाडा, बहराइच, गडचिरोली, वाशिम, धाराशिव, रांची, छत्तरपूर, विदिशा 

अभ्यासात काय आढळले?भारतातील सर्वात गरीब जिल्ह्यांमधील सामाजिक - आर्थिक विकासाच्या प्रगतीचा मागोवा घेण्यासाठी सरकारने २०१८मध्ये अविकसित जिल्हा नियोजन कार्यक्रम सुरू केला. यानंतर जिल्ह्यांचा विकास गतीने सुरू झाला. 

राज्यांत काय घडले? २०१५-१६ मध्ये ११.७७ टक्के असलेला आंध्र प्रदेशातील गरिबी दर २०१९-२१ मध्ये घसरून ६.०६ टक्क्यांवर आला आहे. याच काळात राज्यातील वाय. एस. आर. कडप्पा जिल्ह्यात गरिबी दरात तब्बल ६४ टक्क्यांची घट झाली. तेथील गरिबी ३.३४ टक्क्यांपर्यंत खाली आली आहे. अविकसित जिल्ह्यांमध्ये सरासरी ५४.७ टक्क्यांची घट नोंदवली गेली असून, ती संपूर्ण राज्यांच्या ४८.५ टक्क्यांच्या सरासरीपेक्षा अधिक आहे. 

टॅग्स :Indiaभारत