शहरं
Join us  
Trending Stories
1
ते कुणालाच नको होते; एकनाथ शिंदेंच्या मुख्यमंत्रीपदाबाबत संजय राऊत यांचा नवा दावा
2
MS Dhoniचा मैदानाबाहेर मारलेला षटकार ठरला CSKच्या पराभवाचे कारण? RCBला मॅच जिंकण्यासाठी झाली मदत
3
काँग्रेसचे ज्येष्ठ नेते प्रतापराव भोसले यांचे निधन
4
४० कोटींची रोकड सापडली, मोजणी अजूनही पूर्ण नाही... बुटांच्या व्यापाऱ्यांची अफाट संपत्ती
5
राष्ट्रवादीकडे त्यावेळी मुख्यमंत्रीपदासाठी योग्य उमेदवार नव्हता; शरद पवारांनी सगळंच सांगितलं
6
मतदानाची टक्केवारी अचानक कशी वाढते? निवडणूक आयोगाने स्पष्ट केली बाजू
7
'छगन भुजबळांना मुख्यमंत्रिपद दिले असते तर पक्ष...'; शरद पवारांचा मोठा गौप्यस्फोट
8
पतंजलीची सोन पापडी गुणवत्ता चाचणीत फेल, सहाय्यक व्यवस्थापकासह तिघांवर कारवाई
9
आनंदवार्ता : यंदा धो-धो बरसणार; मान्सून आज अंदमानात तर ३१ मे रोजी केरळात धडकणार
10
गॅसच्या टँकरचा भीषण स्फोट, आगीत घरे व वाहने भक्ष्यस्थानी; शेलपिंपळगावातील घटना
11
काश्मीरमध्ये निवडणुकीपूर्वी दुहेरी हल्ला; भाजपच्या माजी सरपंचाची गोळ्या झाडून हत्या
12
दिल्लीत महाभ्रष्टाचाऱ्याला इंडी आघाडीने स्वीकारले; काँग्रेसला ४ जागाही लढवता आल्या नाहीत, मोदींचा हल्लाबोल 
13
आजचे राशीभविष्य - १९ मे २०२४, अचानक धनलाभाची शक्यता,व्यावसायिक क्षेत्रात लाभ होतील
14
'हार मानणार नाही..'; कार्तिक आर्यनच्या 'चंदू चँपियन'चा ट्रेलर, मराठमोळ्या हेमांगी कवीने वेधलं लक्ष
15
मविआ राज्यात ४६ जागा जिंकणार; काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांनी व्यक्त केला विश्वास
16
केजरीवाल यांचे माजी पीए बिभव कुमार अखेर अटकेत; स्वाती सहज बाहेर पडल्या, ‘आप’ने जारी केला व्हिडीओ 
17
'सिंघम 3' च्या सेटवरुन अजय देवगण-जॅकी श्रॉफचा फाईट सीन लीक, व्हिडीओ व्हायरल
18
आता भाजप सक्षम, सगळे निर्णय स्वबळावर; रा.स्व. संघाची मदत घेण्याबाबत जे.पी.नड्डा यांचे मत
19
RCBच्या रोमहर्षक विजयानंतर विराट कोहली रडला अन् अनुष्का शर्माही... Video Viral 
20
RCB चा प्ले ऑफमध्ये प्रवेश पक्का; रचीनचा Run Out अन् ड्यू प्लेसिसच्या स्टनर कॅचने फिरला सामना 

पोस्टमनकाका होणार चालती-फिरती बँक: पत्रांसोबत पैसेही वाटणार!

By ऑनलाइन लोकमत | Published: August 30, 2018 6:45 AM

१ सप्टेंबरपासून देशात पोस्टल पेमेंट बँक : ६५० शाखा, ३२५० अ‍ॅक्सेस पॉइंट सुरू करणार

संतोष ठाकूर 

नवी दिल्ली : टपाल विभागाची पोस्टल पेमेंट बँक १ सप्टेंबरपासून सुरू होत आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी दिल्लीतील तालकटोरा स्टेडियममध्ये या बँकेचा प्रारंभ एका क्लिकने करतील व त्याचवेळी देशातील ६५० जिल्ह्यांत पेमेंट बँक सुरू होईल. ६५० जिल्ह्यांत या कार्यक्रमाच्या वेळी स्थानिक खासदार, आमदार व भाजपाचे वरिष्ठ नेते उपस्थित राहतील. या सगळ्या ठिकाणी मोदी यांचे भाषण टेलिकॉन्फरसिंगच्या माध्यमातून दाखविले जाईल.

या उपक्रमाबाबत दूरसंचार मंत्री मनोज सिन्हा यांनी सांगितले की, पेमेंट बँक व्यवस्थित चालण्यासाठी केंद्रीय मंत्रिमंडळाने आधी मंजूर केलेल्या ८०० कोटी रुपयांशिवाय बुधवारी अतिरिक्त ६३५ कोटी रुपये मंजूर करण्यात आले आहेत. व्यवसाय करता करता येत्या तीन वर्षांत ही पेमेंट बँक ना नफा ना तोटा या टप्प्यापर्यंत पोहोचेल. त्यानंतर बँक नफा मिळवू लागेल, याची आम्हाला खात्री आहे. ही बँक आपल्या खातेदारांना चार टक्के दराने व्याज देणार आहे. सिन्हा म्हणाले, बँक डिजिटल असेल. आधार क्रमांकाने तिच्यात खाते सुरू करता येईल. कागदाचा वापर शून्य असेल. पोस्टल पेमेंट बँक पैसे घरी नेऊन देणारी पहिलीच बँकदेखील बनेल. यासाठी देशातील ४० हजार नियमित व २.४० लाख ग्रामीण टपालसेवकांना प्रशिक्षण दिले जात आहे. हे पोस्टमन चालती-फिरती बँक बनतील ते घरी जाऊन हँडहेल्ड मशीनच्या मदतीने खाते सुरू करतील, पैसे जमा करतील व रोख पैसेही देतील. यासाठी नाममात्र कमिशन ते घेतील. टपाल विभागाचे १७ कोटी बचत खातेधारक असून त्यांनाही या बँकेशी जोडण्याचे कार्य केले जाईल.प्रत्येक पोस्टात बँकेचा अ‍ॅक्सेस पॉइंटच्या बँकेची एक खिडकी (अ‍ॅक्सेस पॉइंट) देशातील सगळ्या १.५ लाख टपाल कार्यालयांत डिसेंबरपर्यंत सुरू केली जाईल. पेमेंट बँक कर्ज आणि विमा सेवा देऊ शकत नाही म्हणून पंजाब नॅशनल बँक आणि बजाज एलायंजशी यासाठी करार केला गेला आहे.च्केंद्रीय मंत्रिमंडळाने यातून मिळणाऱ्या कमिशनमधून २५ टक्के पोस्टमन-ग्रामीण टपाल सेवकांना व ५ टक्के रक्कम टपाल कार्यालयाला देण्यास बुधवारी मंजुरी दिली, असे सिन्हा म्हणाले.

टॅग्स :Post Officeपोस्ट ऑफिसPostal Groundपोस्टल ग्राऊंडbankबँकMONEYपैसा