शहरं
Join us  
Trending Stories
1
“युद्धाची गरजच भासणार नाही, एक दिवस POKतील जनता म्हणेल की आम्ही भारतवासी आहोत”: राजनाथ सिंह
2
“आता रिकामे ठेवू नका, काहीतरी जबाबदारी द्या, चुकलो असेन तर...”; धनंजय मुंडेंची भरसभेत विनंती
3
Air India Plane Crash : अहमदाबाद विमान अपघातावर मोठी अपडेट; सुप्रीम कोर्टाने केंद्र सरकारला नोटीस पाठवली, AAIB अहवालाबाबत सांगितली ही बाब
4
VIDEO: आईची माया! सिंहीणने रेडकूवर घातली झडप, म्हशीने शिंगाने लावलं उडवून अन् पुढे...
5
बगरम हवाई तळावर अमेरिकेचा 'डोळा'; ट्रम्प यांना आता का हवंय अफगाणिस्तानचं 'एअरफील्ड'?
6
ज्या सुटकेसवर बसून रील बनवलं, त्यातच तिला भरून नदीत फेकलं; लव्हस्टोरीचा भयंकर शेवट
7
कहो ना कहो...! इमरान हाश्मीसमोर गाताना राघव जुयालच्या डोळ्यात आलेलं पाणी, म्हणाला...
8
आजपासून स्वस्त झालं Rail Neer; जीएसटी रिव्हिजननंतर रेल्वेनं कमी केली MRP
9
नेपाळ, फ्रान्सनंतर आता फिलिपिन्समध्येही भडका! लोक रस्त्यावर; धुमश्चक्रीत ९५ पोलीस जखमी, २१६ जणांना अटक
10
स्टार क्रिकेटपटूने निवृत्ती घेतली मागे, आता आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये करणार पुनरागमन  
11
५ कपन्यांमधील हिस्सा विकण्याच्या विचारात मोदी सरकार! लिस्ट मध्ये आहेत या सरकारी कंपन्यांची नावं
12
"५० हजार देतो, शरीरसंबंध ठेव", मुलाच्या वयाच्या निर्मात्याने अभिनेत्रीकडे केलेली धक्कादायक मागणी
13
इस्रायल-अमेरिकेचं टेन्शन वाढलं; इराणने १० हजार किमीपर्यंत मारा करणाऱ्या ICB मिसाईलची केली चाचणी
14
अशी धुलाई कधीच पाहिली नव्हती...; अभिषेक शर्माच्या फटकेबाजीनंतर पाकिस्तानी पत्रकाराची कबुली
15
परदेशी उपग्रहाच्या हालचालींवर भारताची करडी नजर; ५० बॉडीगार्ड उपग्रहांची तयारी
16
'मला बायको हवीय, माझं लग्न लावून द्या,कारण…’, तरुणाने थेट पंचायत समितीला दिलं पत्र, त्यानंतर...
17
Navratri 2025: नवरात्रीत अनवाणी चालण्याची प्रथा कशी सुरू झाली? खरंच लाभ होतो का?
18
भारतीय सैन्याने पाडलेले...श्रीनगरमधील डल सरोवरात सापडले पाकिस्तानचे 'फुसकी' क्षेपणास्त्र
19
"गेल्या कुंभमेळ्यात पालकमंत्री, यावेळी नाही; पण पुढे बघू...'; गिरीश महाजनांनी मनातील इच्छा केली व्यक्त
20
खळबळजनक! बंद फ्लॅटमध्ये ३ दिवसांपासून पडून होता आईचा मृतदेह, शेजारी बसलेला मुलगा

काँग्रेस-जेडीएसनं 'ती' खेळी केल्यास महाराष्ट्रासोबतच कर्नाटकातही निवडणूक!

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 17, 2019 12:55 IST

सर्वोच्च न्यायालयाने बंडखोर आमदारांना उद्याच्या बहुमत चाचणीवेळी हजर राहण्यासाठी जबरदस्ती करू शकत नसल्याचेही म्हटले आहे. यामुळे उद्याच्या चाचणीवेळी काँग्रेस-जेडीएसचे कुमारस्वामी सरकार पडण्याची दाट शक्यता आहे.

बेंगळुरू : कर्नाटकमधील सत्तेचे राजकीय 'नाटक' गेल्या दोन आठवड्यांपासून सुरूच आहे. आज सर्वोच्च न्यायालयाने बंडखोर आमदारांच्या याचिकेवर दिलेल्या निर्णयामुळे येत्या दोन दिवसांत सर्व परिस्थिती समोर येण्याची शक्यता आहे. मात्र, विधानसभा अध्यक्षांना 16 बंडखोर आमदारांचे राजीनामे मंजूर करण्यासाठी वेळेचे बंधन नसल्याने नवा पेच निर्माण झाला आहे. 

सर्वोच्च न्यायालयाने बंडखोर आमदारांना उद्याच्या बहुमत चाचणीवेळी हजर राहण्यासाठी जबरदस्ती करू शकत नसल्याचेही म्हटले आहे. यामुळे उद्याच्या चाचणीवेळी काँग्रेस-जेडीएसचे कुमारस्वामी सरकार पडण्याची दाट शक्यता आहे. मात्र, भाजपकडेही बहुमताचा 113 हा आकडा नसल्याने फेरनिवडणूक करण्याशिवाय पर्याय राहणार नाही. राज्यपाल भाजपाला बहुमत सिद्ध करण्याचा प्रस्ताव देवू शकतात. पण यामध्येही पेच निर्माण झाला आहे. 

कर्नाटकमध्ये काँग्रेसचे 79, जेडीएसचे 37 आणि बसपा 1 असे 117 बहुमत होते. तर भाजपाकडे 105, अपक्ष 1 आणि केपीजेपीचा 1 असे 107 मते आहेत. यापैकी काँग्रेसच्या 13 आणि जेडीएसच्या 3 आमदारांनी राजीनामे दिले आहेत. विधानसभा अध्यक्ष रमेश कुमार यांनी या बंडखोर आमदारांचे राजीनामे बहुमत चाचणीच्या आधी मंजूर केले नाहीत तर हे आमदार अनुपस्थित राहण्याची शक्यता आहे. चाचणीवेळी कुमारस्वामी सरकार अल्पमतात असणार आहे. भाजपा 107 विरुद्ध 101 मतांनी जेडीएस-काँग्रेसवर मात करेल. 

कुमारस्वामी सरकारला बहुमत सिद्ध करण्यात अपयश आल्यास राज्यपाल भाजपाला सत्तास्थापनेची संधी देऊ शकतात. जर बंडखोर आमदारांचे राजीनामे मंजूर झालेले नसतील तर भाजपाला बहुमताचा 113 आकडा गाठावा लागणार आहे. मात्र, बंडखोर आमदारांचे राजीनामे मंजूर झाल्यास भाजपाचा मुख्यमंत्री बसण्याची शक्यता आहे. कारण विधानसभेचा 224 चा आकडा 209 वर येणार आहे आणि बहुमतासाठीचा आकडा 113 वरून 106 वर येणार आहे. 

 

'ती' खेळी केल्यास पुन्हा निवडणूकभाजपाने जरी बंडखोर आमदारांना सुप्त पाठिंबा दिलेला असला तरीही कुमारस्वामी यांचे सरकार पाडून येडीयुराप्पांना मुख्यमंत्री होणे कठीण जाणार आहे. कारण उद्या बहुमत चाचणीच्या शेवटच्या क्षणापर्यंत सत्तेचे धागे काँग्रेस-जेडीएसच्याच हातात असणार आहेत. कुमारस्वामींकडे मंत्रिमंडळाची बैठक बोलावण्याचा मार्ग मोकळा आहे. या बैठकीत जर विधानसभा भंग करण्याचा निर्णय झाला तर भाजपचे सत्ता स्थापनेचे स्वप्न भंगणार आहे. असे झाल्यास येत्या काळात महाराष्ट्रासोबतच कर्नाटकमध्ये विधानसभा निवडणूक लागण्याची शक्यता आहे.  

 

टॅग्स :Karnatak Politicsकर्नाटक राजकारणkumarswamyकुमारस्वामीYeddyurappaयेडियुरप्पाcongressकाँग्रेसBJPभाजपाJanata Dal (Secular)जनता दल (सेक्युलर)Maharashtraमहाराष्ट्र