शहरं
Join us  
Trending Stories
1
'दबंग मॅम' निदा खान ऑफिसमध्ये सर्वांना बुरखा घालायला शिकवायची; काय होता HR हेडचा प्लॅन?
2
Latest Marathi News LIVE Updates: केंद्रीय कायदामंत्र्यांनी लोकसभेत सादर केले सीमांकन विधेयक; संसदेत गदारोळ
3
होर्मुझपेक्षाही मोठा जलमार्ग ब्लॉक करण्याच्या तयारीत चीन; सॅटेलाइट इमेजनं खुलासा, तणाव वाढणार
4
Ashok Kharat : 'अंक' गणितच भोंदू अशोक खरातच्या अंगलट; शुभांक ९ मानून मोटारींसाठी निवडायचा क्रमांक
5
"त्यांनी भोंदूबाबाचा सगळा प्रकार संवेदनशीलतेने हाताळला..."; प्राजक्ता माळीने मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचं केलं कौतुक
6
Rasikh Salam Dar: वय लपवलं, BCCI कडून २ वर्षांची बंदी; शिक्षकाचा मुलगा RCB साठी कसा बनला ‘कमबॅक किंग’?
7
इराणमध्ये पहिल्यांदाच महिलेला फाशीची शिक्षा; कोण आहे Bita Hemmati? तिच्यावर नेमका आरोप काय?
8
३ बायका, ५३ बँक खाती, ५ कोटींचा घोटाळा... सरकारी तिजोरीवर डल्ला मारणारा करोडपती शिपाई
9
१७३ वर्षांपूर्वी प्रथम धावली, ४०० जणांचा प्रवास; आजही सेवेत, भारतीय रेल्वेची ‘ती’ ट्रेन कोणती?
10
विराट कोहली सामना संपल्यावर स्वत:हून LSGचे मालक संजीव गोयंकांना भेटायला गेला, फोटो VIRAL
11
अक्षय्य तृतीयेपूर्वीच सोन्या-चांदीच्या दरात सातत्यानं तेजी; पाहा काय आहेत २४k, 22k, 18k सोन्याचा लेटेस्ट भाव
12
ट्रम्प यांचा मेसेज घेऊन मुनीर पुन्हा इराणमध्ये गेले, अमेरिकेशी शांतता चर्चा कधी सुरू होणार?
13
'प्रताप सरनाईक माझे ड्रायव्हर असते'; मेहतांच्या विधानाने वाद, सरनाईक म्हणाले, "दुर्लक्ष करतोय पण..."
14
स्टार क्रिकेटपटूची निवृत्तीची घोषणा! महिला अत्याचाराच्या आरोपाखाली जाऊन आलाय तुरुंगात
15
करण-तेजस्वीचं झालंय 'सीक्रेट वेडिंग?' सोशल मीडियावर चर्चा; अखेर अभिनेत्याने सोडलं मौन
16
Middle East Conflict: अमेरिकेचा कठोर निर्णय! जागतिक तेल पुरवठा विस्कळीत होण्याची भीती, भारतासाठीही धोक्याची घंटा
17
पत्नीच्या नावे Post Office मध्ये २ लाख गुंतवा, २ वर्षानंतर व्हाल मालामाल; किती मिळेल रिटर्न, पाहा कॅलक्युलेशन
18
8th Pay Commission: ₹६९,००० बेसिक सॅलरी, ६% वार्षिक इनक्रिमेंट आणि ५ प्रमोशन! ८ व्या वेतन आयोगात मोठे प्रस्ताव
19
नाशिक धर्मांतरण प्रकरणाचे 'टेरर' कनेक्शन? निदा खानचा बॉम्बस्फोटातील मास्टरमाइंडशी संबंध असल्याचा संशय
20
Share Market Today: तेजीसह शेअर बाजाराची सुरुवात, Sensex ४०० अंकांनी तर Nifty मध्ये १५० अंकांची तेजी, 'या' शेअर्समध्ये तेजी
Daily Top 2Weekly Top 5

सुनंदा पुष्कर यांच्या मृत्यूवरून राजकारण

By admin | Updated: July 3, 2014 04:54 IST

माजी केंद्रीय मंत्री शशी थरूर यांच्या पत्नी सुनंदा पुष्कर यांच्या मृत्यू प्रकरणाला अचानक नवी कलाटणी मिळाली आहे़

नवी दिल्ली : माजी केंद्रीय मंत्री शशी थरूर यांच्या पत्नी सुनंदा पुष्कर यांच्या मृत्यू प्रकरणाला अचानक नवी कलाटणी मिळाली आहे़ चुकीचा शवविच्छेदन अहवाल देण्यासाठी तत्कालीन आरोग्यमंत्री गुलामनबी आझाद आणि शशी थरूर यांचा प्रचंड दबाव होता, असा खळबळजनक दावा अखिल भारतीय आयुर्विज्ञान संस्थेचे (एम्स) वरिष्ठ फॉरेन्सिक डॉक्टरसुधीर गुप्ता यांनी केला आहे़ त्यातच भाजपा नेते सुब्रह्मण्यम स्वामी यांनीही सुनंदा यांना अतिशय ‘प्रोफेशनल’ पद्धतीने मारण्यात आल्याच्या आपल्या आरोपाचा पुनरुच्चार केला आहे़दरम्यान, एम्सने गुप्ता यांचा दावा खोडून काढला असून त्यात काहीही तथ्य नसल्याचे म्हटले आहे़ सरकारने मात्र गुप्ता यांच्या आरोपाची गंभीर दखल घेत, एम्सच्या संचालकांकडून सविस्तर अहवाल मागवला आहे़ डॉ़ सुधीर गुप्ता हे एम्सच्या फॉरेन्सिक विज्ञान विभागाचे प्रमुख आहेत़ सुनंदा यांचे शवविच्छेदन करणाऱ्या डॉक्टरांच्या चमूचे प्रमुख राहिलेल्या गुप्ता यांनी केंद्रीय आरोग्यमंत्री तसेच सेंट्रल अ‍ॅडमिनिस्ट्रेटिव्ह ट्रिब्युनलला (कॅट) पत्र लिहिले आहे़ यासंदर्भात गुप्ता यांच्याशी बोलण्याचा प्रयत्न केला असता त्यांनी प्रतिक्रिया देण्यास नकार दिला़गत १७ जानेवारीला शशी थरूर केंद्रीय मंत्री असताना त्यांच्या पत्नी सुनंदा थरूर या नवी दिल्लीतील एका पंचतारांकित हॉटेलात मृतावस्थेत आढळून आल्या होत्या़ तणाव कमी करणाऱ्या औषधांच्या अतिसेवनाने त्यांचा मृत्यू झाल्याचे शवविच्छेदन अहवालात म्हटले होते़ मृत्यूपूर्वी टिष्ट्वटरवर सुनंदा व पाकिस्तानी महिला पत्रकार मेहेर तरार यांच्यात वाद झाला होता़ शशी थरूर व मेहेर यांच्यात कथितरीत्या प्रेमसंबंध असल्याचा संशय सुनंदा यांना होता़ मेहेर यांनी मात्र हे आरोप फेटाळले होते़ (लोकमत न्यूज नेटवर्क)