Politics ignited by agricultural laws, Padma Vibhushan returned to Prakash Singh Badal | कृषी कायद्यांवरून पेटले राजकारण, प्रकाश सिंग बादल यांना परत केला 'पद्मविभूषण'

कृषी कायद्यांवरून पेटले राजकारण, प्रकाश सिंग बादल यांना परत केला 'पद्मविभूषण'

ठळक मुद्देकेंद्र सरकारने लागू केलेल्या कृषी कायद्यांविरोधात पंजाबसह देशातील इतर भागांमधील शेतकरी आक्रमक झाले आहेत केंद्राने केलेल्या कृषी कायद्याचा निषेध म्हणून, पंजाबचे माजी मुख्यमंत्री प्रकाश सिंग बादल यांनी त्यांना भारत सरकारने दिलेला पद्मविभूषण हा पुरस्कार परत केलाअकाली दलाचे सर्वेसर्वा असलेल्या प्रकाश सिंग बादल यांनी राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांना तीन पानी पत्र लिहून कृषी कायद्यांचा विरोध केला आहे

चंदिगड - केंद्र सरकारने लागू केलेल्या कृषी कायद्यांविरोधात पंजाबसह देशातील इतर भागांमधील शेतकरी आक्रमक झाले आहेत. या शेतकऱ्यांनी दिल्लीकडे कूच करत दिल्लीच्या सीमेवर ठाण मांडले आहे. आंदोलनकर्त्यां शेतकऱ्यांसोबत सरकारने चर्चेस सुरुवात केली आहे. मात्र या मुद्द्यावर अद्याप सकारात्मक तोडगा निघालेला नाही. दरम्यान, केंद्राने केलेल्या कृषी कायद्याचा निषेध म्हणून, पंजाबचे माजी मुख्यमंत्री प्रकाश सिंग बादल यांनी त्यांना भारत सरकारने दिलेला पद्मविभूषण हा पुरस्कार परत केला आहे.

अकाली दलाचे सर्वेसर्वा असलेल्या प्रकाश सिंग बादल यांनी राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांना तीन पानी पत्र लिहून कृषी कायद्यांचा विरोध केला आहे. तसेच शेतकऱ्यांवर करण्यात आलेल्या कारवाईचा निषेध केला आहे. त्यासोबत बादल यांनी त्यांना देण्यात आलेला पद्मविभूषण सन्मान परत केला आहे.

पद्मविभूषण पुरस्कार परत करताना पंजाबचे माजी मुख्यमंत्री प्रकाश सिंग बादल म्हणाले की, मी एवढा गरीब आहे की शेतकऱ्यांसाठी कु्र्बानकरण्यासाठी माझ्याकडे अन्य काही नाही आहे. मी जो काही आहे तो शेतकऱ्यांमुळे आहे. अशा परिस्थितीत जर शेतकऱ्यांचा अपमान होत असेल तर कुठल्याही प्रकारचा सन्मान ठेवण्यामुळे मला काही फायदा होणार नाही. शेतकऱ्यांचा ज्या प्रकारे विश्वासघात करण्यात आला आहे, त्यामुळे मला खूप दु:ख झाले आहे. शेतकऱ्यांच्या आंदोलनाला ज्याप्रकारे चुकीच्या पद्धतीने दाखवण्यात येत आहे, ती बाब खूप वेदनादायी आहे.

वाचकहो, 'लोकमत'ला टेलिग्रामवर फॉलो करताय ना?... अजून जॉईन केलं नसेल तर क्लिक करा ( @LokmatNews ) आणि मिळवा महत्त्वाचे अपडेट्स अन् ताज्या बातम्या!

Web Title: Politics ignited by agricultural laws, Padma Vibhushan returned to Prakash Singh Badal

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.