शहरं
Join us  
Trending Stories
1
कोलकाता नाईट रायडर्स अव्वल स्थानी! LSG ला नमवून प्ले ऑफची जागा जवळपास केली पक्की 
2
Sharad Pawar Health Update: शरद पवारांचे उद्याचे सर्व कार्यक्रम, सभा रद्द! घसा बसला, प्रकृती अस्वास्थ्यामुळे घेतला निर्णय
3
दारूची वाहतूक अन् वाटपावर 'एक्साईज'ची करडी नजर; रात्रंदिवस सोलापुरात पथके राहणार तैनात
4
ठाणे जिल्ह्यातील निवडणूक प्रक्रिया शांततेत पार पाडण्यासाठी गांभीर्यपूर्वक काम करण्याचे अधिकाऱ्यांना धडे
5
कर्तव्यावर असलेले पोलीस अंमलदार ३८ वर्षीय बाळासाहेब नंदुर्गे यांचा पिंपरीत हृदविकाराने मृत्यू
6
रामललाचे दर्शन घेऊन पंतप्रधान नरेंद्र मोदींचा अयोध्येत रोड शो! रॅलीला आला मोठा जनसमुदाय
7
सोलापुरात भाजपा, काँग्रेस, बसपाच्या  प्रचाराबद्दल आचारसंहिता भंगचे गुन्हे 
8
अजितदादांना वेळ मिळाला, प्रचार फिरवला, 'अजेंडा' दिला; 'सुनेत्रा वहिनीं'ना फायदा होणार?
9
युक्रेनचे राष्ट्राध्यक्ष झेलेन्स्की यांचा रशियाच्या Most Wanted यादीत समावेश; अहवालात करण्यात आलाय दावा
10
घसा बसला, कंठ दाटला अन् ७ मिनिटांत आवरलं भाषण; बारामतीतील सभेत पवारांनी काय आवाहन केलं?
11
सुनील नरीनची आतषबाजी, एकाना स्टेडियमवर KKR चा विक्रम; LSGच्या घरी जाऊन धुलाई
12
राजनाथ सिंह यांचा PoK बाबत मोठा दावा; अब्दुल्ला म्हणाले- 'पाकिस्तानने बांगड्या घातल्या नाहीत'
13
एक ऑस्ट्रेलिया, बाकी ३ कोण याची पर्वा नाही; वर्ल्ड कप विजेत्या पॅट कमिन्सचा कॉन्फिडन्स पाहा, Video 
14
कृष्णप्पा गौथम, KL Rahul यांच्या अफलातून झेलने सामना गाजला; जाँटी ऱ्होड्सही चकित झाला
15
मालवाहू जीप व मोटरसायकलचा भीषण अपघात, माय-लेकाचा जागीच मृत्यू
16
मागे रिकामे कॅरेट अन् समोर चंदनाच्या गोण्या, 'पुष्पा' स्टाईल चोरी उघडकीस, 2 कोटींचे चंदन जप्त
17
भाजपा, महायुतीच्या उमेदवारांची उमेदवारी रद्द करा, कारण...; काँग्रेसची निवडणूक अधिकाऱ्यांकडे तक्रार
18
श्रीराम मंदिरात गेल्यामुळे पक्षातून तीव्र विरोध; काँग्रेस नेत्या राधिका खेरा यांचा राजीनामा...
19
पक्षफुटीनंतर शरद पवारांचे 'ते' शब्द आठवून रोहित पवार गहिवरले; ढसाढसा रडताना पाहून सारेच स्तब्ध
20
अगं बाई तुला आम्हीच निवडून आणत होतो; प्रचाराच्या शेवटच्या दिवशी अजितदादांचा सुप्रिया सुळेंवर निशाणा

तरुण शेतकऱ्याच्या 'या' चॅलेंजमुळे नेते उतरले शेतात

By ऑनलाइन लोकमत | Published: July 05, 2018 3:42 PM

मोदींच्या फिटनेस चॅलेंजनंतर आता 'हे' चॅलेंज चर्चेत

पणजी: तरुण सरपंचानं दिलेल्या आव्हानामुळे गोव्यातील अनेक आमदार आणि मंत्री सध्या शेतात उतरले आहेत. शेतकऱ्यांच्या समस्या जाणून घेण्यासाठी राजकीय नेत्यांनी शेतात उतरावं, असं आव्हान गोव्यातील एका 25 वर्षीय तरुण सरपंचानं दिलं होतं. यामुळे गोव्यातील राजकीय नेते सध्या शेतात उतरुन घाम गाळताना दिसत आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदींनी काही दिवसांपूर्वीच भारतीय क्रिकेट संघाचा कर्णधार विराट कोहलीला फिटनेस चॅलेंज दिलं होतं. यानंतर देशभरात फिटनेस चॅलेंजची मोठी चर्चा होती. मात्र आता गोव्यात शेती चॅलेंजची चर्चा आहे.गोव्यातील एक्वेम-बॅक्सो ग्रामपंचायतीचे सरपंच सिद्धेश भगत यांनी शेतीच्या समस्यांविषयी राजकारण्यांना जागरुक करण्यासाठी मोहीम सुरू केली आहे. याला त्यांनी 'शेती आव्हान' असं नाव दिलं आहे. या मोहिमेच्या अंतर्गत त्यांनी सर्वपक्षीय आमदारांना शेतात उतरण्याचं आव्हान दिलं. त्यामुळे सर्वच नेते सध्या शेतात उतरल्याचं चित्र राज्यभरात दिसत आहे. महसूल मंत्री रोहन खौंते आणि काँग्रेस आमदार ऍलेक्सो रेजिनाल्डो लॉरेन्को यांनी भगत यांचं आव्हान पूर्ण केलं आहे. भगत यांचं आव्हान स्वीकारुन सर्वात आधी आमदार ऍलेक्सो रेजिनाल्डो लॉरेन्को शेतात उतरले. याशिवाय कृषीमंत्री विजय सरदेसाई यांनीही शेतात जाऊन घाम गाळला. गोव्यातील तरुणांनी यांत्रिक शेतीकडे वळावं, असं आवाहन त्यांनी यावेळी केली. 27 जून रोजी सिद्धेश भगत यांनी फेसबुक पोस्ट लिहून राजकारण्यांना शेतात उतरण्याचं आव्हान दिलं होतं. 'शेतकऱ्यांच्या समस्या वातानुकूलित कार्यालयांमध्ये बसून समजणार नाहीत. त्या शेतात उतरल्यावरच समजतील,' असं भगत यांनी फेसबुक पोस्टमध्ये म्हटलं होतं.  

टॅग्स :goaगोवाFarmerशेतकरीBJPभाजपाcongressकाँग्रेस