जेएनयू विद्यार्थ्यांच्या आंदोलनाविरोधात पोलिसात गुन्हा दाखल 

By ऑनलाइन लोकमत | Published: November 19, 2019 09:57 PM2019-11-19T21:57:07+5:302019-11-19T21:58:14+5:30

पुकारलेल्या आंदोलनाविरोधात दिल्ली पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. 

Police register case against JNU student protest | जेएनयू विद्यार्थ्यांच्या आंदोलनाविरोधात पोलिसात गुन्हा दाखल 

जेएनयू विद्यार्थ्यांच्या आंदोलनाविरोधात पोलिसात गुन्हा दाखल 

Next
ठळक मुद्देगेल्या काही दिवसांपासून हॉस्टेलच्या नियमात बदल यासोबतच फी वाढ, विद्यार्थी संघटनेच्या कार्यालयांना टाळे लावल्याविरोधात विद्यार्थ्यांकडून आंदोलन करण्यात येत होते. किशन गड पोलीस ठाण्यात भा. दं. वि. कलम १८६ आणि ३५३ हा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. 

नवी दिल्ली - जेएनयू विद्यार्थ्यांनी काल केलेल्या आंदोलनाविरोधात दिल्ली पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. किशन गड पोलीस ठाण्यात भा. दं. वि. कलम १८६ आणि ३५३ हा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.  दिल्लीतील जवाहरलाल नेहरु विद्यापीठातील सुविधासोबतच फी दरवाढीचा निर्णय लवकरात लवकर मागे घेण्यात यावा यासाठी जेएनयूच्या विद्यार्थ्यांकडून काल संसदेवर मोर्चा काढण्यात आला होता. मात्र दिल्ली पोलिसांनी हा मोर्चा विद्यापीठाजवळ रोखून ठेवण्यात आला होता. यानंतर विद्यार्थ्यांनी पोलिसांनी रस्त्यावर उभारलेले बॅरीकेट्स तोडून पुढे येण्याचा प्रयत्न केल्याने मोठ्या प्रमाणात विद्यार्थी व पोलिसांमध्ये धक्काबुक्की झाली. यानंतर विद्यार्थ्यांना हटविण्यासाठी पोलिसांना लाठीमार करवा लागल्याने यामध्ये अनेक विद्यार्थी जखमी झाले असल्याचे सांगण्यात येत आहे. या पुकारलेल्या आंदोलनाविरोधात दिल्ली पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. 

गेल्या काही दिवसांपासून हॉस्टेलच्या नियमात बदल यासोबतच फी वाढ, विद्यार्थी संघटनेच्या कार्यालयांना टाळे लावल्याविरोधात विद्यार्थ्यांकडून आंदोलन करण्यात येत होते. तसेच विद्यार्थ्यांना ड्रेस कोडचे देखील निर्बंध लादल्याने विद्यार्थ्यांकडून विरोध करण्यात येत होता. यानंतर विद्यापीठ प्रशासनानं शुल्कवाढीचा निर्णय मागे घेतला आहे. शिक्षण सचिव आर. सुब्रमण्यन यांनी ट्विट करुन याबद्दलची माहिती दिली. जेएनयूच्या प्रशासकीय समितीनं वसतिगृहाच्या शुल्कवाढीचा निर्णय मागे घेतल्याचं सुब्रमण्यन यांनी म्हटले होते. विद्यार्थ्यांनी आंदोलन स्थगित करुन पुन्हा वर्गांमध्ये जावं, असं आवाहन त्यांनी केलं होतं. तसेच केंद्र सरकारने तीन सदस्यीय समिती स्थापन करुन फी दरवाढीवर उपाय योजण्याचे आदेश देण्यात आले आहे. मात्र फी दरवाढीचा मागे घेण्यासाठी काल संसदेवर मोर्चा काढण्यात आला होता.

Web Title: Police register case against JNU student protest

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.