Farmers’ Tractor Rally : ...अन् पोलिसांनी चक्क रस्त्यावर बसून केला ट्रॅक्टर परेड रोखण्याचा प्रयत्न

By ऑनलाइन लोकमत | Published: January 26, 2021 02:38 PM2021-01-26T14:38:07+5:302021-01-26T14:47:29+5:30

Farmers’ Tractor Rally : पोलिसांनी परवानगी दिलेली असली तरीही काही ठिकाणी पोलिसांनी आंदोलक शेतकऱ्यांवर लाठीचार्ज केल्याचा प्रकार घडला आहे.

Police officials sit on road in Nangloi to block area where farmers holding tractor parade have reached | Farmers’ Tractor Rally : ...अन् पोलिसांनी चक्क रस्त्यावर बसून केला ट्रॅक्टर परेड रोखण्याचा प्रयत्न

Farmers’ Tractor Rally : ...अन् पोलिसांनी चक्क रस्त्यावर बसून केला ट्रॅक्टर परेड रोखण्याचा प्रयत्न

googlenewsNext

नवी दिल्ली - गेल्या काही दिवसांपासून कडाक्याच्या थंडीत शेतकऱ्यांचे आंदोलन सुरू आहे. आंदोलनकर्ते शेतकरी आणि सरकारमध्ये आतापर्यंत अनेक बैठका झाल्या असून शेतकरी मात्र आपल्या मागण्यांवर ठाम असलेले पाहायला मिळत आहेत. याच दरम्यान दिल्लीमध्ये प्रजासत्ताक दिनाच्या दिवशीच शेतकऱ्यांनी कृषी कायद्यांविरोधात ट्रॅक्टर मार्च काढला आहे. याला पोलिसांनी परवानगी दिलेली असली तरीही काही ठिकाणी पोलिसांनी आंदोलक शेतकऱ्यांवर लाठीचार्ज केल्याचा प्रकार घडला आहे. अनेक ठिकाणी पोलिसांनी बॅरिकेड लावून रस्ते अडविले आहेत. काही ठिकाणी पोलीस आणि शेतकऱ्यांचे जत्थे आमने-सामने आले आहेत.

पोलिसांनी शेतकऱ्यांची ट्रॅक्टर परेड रोखण्याचा प्रयत्न केला. त्यामुळे परिस्थिती आणखी चिघळली आहे, याच दरम्यान आता ही ट्रॅक्टर परेड रोखण्यासाठी पोलीस चक्क रस्त्यावरच बसलेले पाहायला मिळत आहे. मिळालेल्या माहितीनुसार, नांग्लोई भागातील मुख्य रस्त्यावरुन शेतकऱ्यांची नियोजित ट्रॅक्टर परेड जाणार होती. मात्र, पोलिसांनी सुरक्षेच्या कारणावरुन ही परेड रोखण्याचा प्रयत्न केला. मात्र यावेळी मोठा गोंधळ निर्माण झाला. त्यानंतर या मार्गावरुन जाणारी ट्रॅक्टर परेड रोखण्यासाठी पोलीस बळाचा वापर न करता पोलीस रस्त्यावर बसलेले आहे. एएनआय या वृत्तसंस्थेने याचे काही फोटो ट्विट करून माहिती दिली आहे. 

अक्षरधामच्या आधी एनएच 24 वर शेतकऱ्यांनी पोलिसांकडून लावण्यात आलेले बॅरिकेड तोडले आहेत. यामुळे पोलिसांनी तिथे लाठीचार्ज केला. दिल्लीच्या अक्षरधाम मंदिराजवळचा व्हिडीओ व्हायरल झाला आहे. अक्षरधामच्या आधी पोलिसांनी बॅरिकेड लावले होते. मात्र, काही शेतकऱ्यांनी ट्रॅक्टरच्या मदतीने बॅरिकेड तोडून दिल्लीकडे घुसण्याचा प्रयत्न केला. यामुळे पोलिसांनी अश्रूधूराच्या नळकांड्या फोडल्या आणि लाठीचार्ज करत या शेतकऱ्यांना माघारी जाण्यास भाग पाडले. 

आजचा दिवस देशासाठी खूप महत्वाचा आहे. एकीकडे 72 वा प्रजासत्ताक दिन साजरा होत असताना दुसरीकडे कृषी कायद्यांविरोधात शेतकरी दिल्लीमध्ये ट्रॅक्टर रॅली काढली आहे. दिल्लीच्या सीमेवर सध्या 60000 हून अधिक ट्रॅक्टर उभे ठाकले आहेत. परंतू, सिंघू आणि तिक्री बॉर्डरवर पोलिसांनी रातोरात बॅरिकेड टाकून रस्ते अडविल्याने शेतकरी संतप्त झाले आहेत. यामुळे दोन्ही सीमांवरील बॅरिकेड हटवून शेतकऱ्य़ांनी दिल्लीकडे कूच केली आहे. दिल्लीला जाण्यासाठी केएमपी-केजीपीवर जवळपास 25 ते 30 किमीच्या रांगा लागल्या होत्या. 


 

Web Title: Police officials sit on road in Nangloi to block area where farmers holding tractor parade have reached

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.