The police officer was suspended for growing his beard without permission | विनापरवानगी दाढी लांब वाढवल्याने पोलीस अधिकाऱ्याचं केलं निलंबन 

विनापरवानगी दाढी लांब वाढवल्याने पोलीस अधिकाऱ्याचं केलं निलंबन 

ठळक मुद्देएसआय अंतसार अली म्हणतात की, नोव्हेंबर 2019 पासून ते परवानगी घेण्यासाठी पाठपुरावा करत होते,परंतु अद्याप त्यांना विभागाकडून परवानगी मिळाली नाही.

रमाला पोलिस ठाण्यात तैनात उपनिरीक्षक अंतसार अली यांना परवानगीशिवाय लांब दाढी ठेवल्यामुळे निलंबित करण्यात आले आहे. सहारनपूरचा रहिवासी अंतसार अली हे उत्तर प्रदेश पोलीस दलात एसआय पदावर कार्यरत होते. गेली तीन वर्षे ते जिल्ह्यात कार्यरत आहेत. लॉकडाऊन करण्यापूर्वी त्यांना रमाला पोलिस स्टेशनमध्ये तैनात केले होते. पोलिस विभागाच्या नियमांच्या विरोधात लांब दाढी ठेवण्याबाबत त्यांच्याबाबत चर्चा आहे.

एसपी अभिषेक सिंह म्हणाले की, मिश्या परवानगीशिवाय पोलीस विभागात ठेवल्या जाऊ शकतात, परंतु शीख समुदायाचे पोलिस वगळता प्रत्येकाने दाढी करण्याची विभागीय परवानगी घ्यावी लागेल. एसआय अंतसार अली यांना दोनदा विभागीय परवानगी घेण्याच्या सूचना देण्यात आल्या, पण तसे त्यांनी केले नाही. वारंवार विभागीय नियमांकडे दुर्लक्ष केल्यामुळे एसआय अंतसार अली यांना निलंबित केले गेले आहे. एसआय अंतसार अली म्हणतात की, नोव्हेंबर 2019 पासून ते परवानगी घेण्यासाठी पाठपुरावा करत होते,परंतु अद्याप त्यांना विभागाकडून परवानगी मिळाली नाही. विभागीय प्रक्रिया लवकरच पूर्ण होईल, अशी  माहिती अमर उजालाने दिली आहे. 

वाचकहो, 'लोकमत'ला टेलिग्रामवर फॉलो करताय ना?... अजून जॉईन केलं नसेल तर क्लिक करा ( @LokmatNews ) आणि मिळवा महत्त्वाचे अपडेट्स अन् ताज्या बातम्या!

Web Title: The police officer was suspended for growing his beard without permission

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.